Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदरपणात होणा-या अॅनिमियाची कारणं,लक्षणं,उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय !

$
0
0

भारत हा जगभरातील अॅनिमियाचे प्रमाण जास्त असलेल्या देशांपैकी एक देश आहे.समाजातील आर्थिक स्तर कमी असलेल्या लोकांमध्येच नाही तर अगदी उच्च व मध्यमवर्गीयांमध्येही चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी व अयोग्य जीवनशैलीमुळे अॅनिमियाचे प्रमाण अधिक आढळते.वर्ल्ड हेल्द ऑर्गेनायझेनच्या आकडेवारीनूसार भारतात ५८ टक्के महिला अॅनिमिक आहेत.तसेच असा अंदाज आहे की भारतात अॅनिमिया मुळे २० ते ४० टक्के महिला त्यांच्या प्रसूती दरम्यान मृत्यु पावतात.दक्षिण आशियायी भागातील अॅनिमियामुळे भारतात ८० टक्के मॅर्टनल डेथ होतात.ही आकडेवारी घाबरवणारी असल्याने गरोदरपणी होणा-या अॅनिमिया साठी आधीच प्रतिबंधनात्मक काळजी करणे हिताचे ठरते.

मुंबईतील Nova IVI Fertility Centre च्या Clinical Director & Consultant Reproductive Medicine विभागाच्या डॉ.रिचा जगताप यांच्यामते यासाठी गर्भधारणेसाठी प्रयत्न सुरु केल्यावर प्रत्येकाने ब्लड टेस्ट करावी.कारण यामुळे गर्भधारणेदरम्यान होणा-या अॅनिमियाची समस्या नियंत्रित ठेवणे व त्यावर उपचार करणे सोपे जाते.तसेच वाचा बेड रेस्टचा सल्ला दिलेल्या गरोदर स्त्रीयांसाठी खास टीप्स !

 अॅनिमियाची कारणे,लक्षणे,निदान व उपचार.

डॉ.जगताप यांच्यामते गरोदरपणाच्या तीन महिन्यामध्ये शरीरातील हिमोग्लोबिनच्या पातळीचे प्रमाण अचानक कमी होते.तसेच या काळामध्ये गर्भात वाढणा-या बाळाच्या पोषणासाठी आईच्या शरीरातील पोषणमुल्य वापरली जातात.अशा स्थितीत पुरेसे पोषण न झाल्यास त्या गर्भवती स्त्रीच्या गर्भारपणावर व स्तनपानाच्या काळात भयंकर समस्या निर्माण होऊ शकतात.त्यात जर गर्भधारणेपूर्वी ती स्त्री अॅनिमिक असेल तर त्याचेही तिच्या गरोदरपणावर दुष्परिणाम होऊ शकतात.ज्या मुली त्यांच्या किशोरवयात अथवा टीनएजमध्ये गरोदर होतात त्यांना या स्थितीला सामोरे जावे लागू शकते.डॉ.जगताप यांच्यामते ज्या स्त्रीयांच्या दोन प्रेगन्सीमध्ये तीन वर्षांपेक्षा कमी काळ असतो त्यांच्या शरीरात लोहाचे प्रमाण पुरेसे नसल्यामुळे त्यांना अॅनिमिया होऊ शकतो.तसेच वाचा अॅनेमिक असल्यास रक्तदान करणे योग्य आहे का ?

गरोदरपणी होणा-या अॅनिमियाचे काही प्रकार-

लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया-हा अशक्तपणाचा एक सर्वसामान्य प्रकार असून या मध्ये त्या स्त्रीचे शरीर लोहाच्या कमतरतेमुळे पुरेसे हिमोग्लोबिन निर्माण करु शकत नाही.हिमोग्लोबिन हे लाल रक्त पेशींमधील प्रोटीन असून ते फुफ्फुसांमधील ऑक्सिजन संपूर्ण शरीरात वाहून नेण्याचे कार्य करते.

फॉलेटच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया-यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला फॉलिक अॅसिडच्या गोळ्या देतात.गर्भधारणेदरम्यान निरोगी लाल रक्त पेशींसह नवीन पेशी निर्माण करण्यासाठी फॉलेटची आवश्यक्ता असते.लाल रक्त पेशींकडून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास त्याचा तुमच्या शरीरावर व गर्भातील बाळावर याचा परिणाम होतो.

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया-निरोगी लाल रक्त पेशींच्या निर्मितीला मदत करण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन गरजेचे असतात.ज्या स्त्रीया दूधाचे पदार्थ,चिकन व मटण खात नाहीत त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आढळते.यासाठी वाचा गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’

गरोदरपणातील अॅनिमियाची लक्षणे काय असतात?

गरोदरपणातील अॅनिमियाचे निदान करण्यासाठी केवळ शारीरिक लक्षणे पहाणे योग्य ठरणार नाही कारण फक्त ब्लड टेस्ट केल्यावरच तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे अचूक प्रमाण समजू शकते.शिवाय अॅनिमियाची लक्षणे व गरोदरपणाची सामान्य लक्षणे सारखी असू शकतात.

यासाठी हिमोग्लोबिनच्या पातळीत झालेली घसरण दर्शविणा-या या लक्षणांपासून सावध रहा-

  • प्रचंड थकवा
  • वजन प्रमाणापेक्षा कमी वाढणे
  • गर्भधारणे दरम्यान होणारा उच्च रक्तदाब
  • चक्कर
  • धाप लागणे
  • ह्रदयाचे ठोके वाढणे
  • एकाग्रतेचा अभाव

डॉ.जगताप यांच्या मते जर तुम्ही गर्भधारणेपूर्वी अशक्त असाल तर तुम्हाला गर्भधारणेमधील लक्षणांचा फार त्रास होऊ शकतो.

गरोदरपणी अॅनिमिया होण्याची कारणे-

  • आहारामध्ये लोह-युक्त पदार्थांचा अभाव
  • चहा,कॉफी किंवा इतर कॅलशियम युक्त पदार्थ जे रक्तात लोहाचे प्रमाण शोषण्यास अडथळा निर्माण करतात.
  • जन्मापासून अथवा लहानपणापासून लोहाचे प्रमाण कमी असणे
  • टीनएज मध्ये होणारी गर्भधारणा
  • दोन प्रेगन्सीमध्ये दोन वर्षांपेक्षा कमी काळ असणे
  • मलेरिया किंवा पोटात जंत झाल्याने लोहाचे प्रमाण कमी होणे
  • गर्भधारणेपूर्वी स्त्री अशक्त असल्यास गर्भधारणेनंतर अॅनिमियाचा अधिक त्रास होतो.

अॅनिमियाचा तुमच्या गर्भधारणेवर काय परिणाम होतो?

गरोदरपणातील तीव्र अशक्तपणामुळे गर्भाला पुरेश्या ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.गर्भाशयाची आंतरिक वाढ कमी होते,गर्भाची वाढ मंदावते,मृत बाळ जन्माला येते,एलबीडब्लू व बाळाच्या जन्मादरम्यान मृत्यु होऊ शकतो.यासाठी अ‍ॅनिमियावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.डॉ,जगताप यांच्यामते अॅनिमिक माता बाळाचे वजन कमी असल्यामुळे बाळाला वेळेआधीच जन्म देते त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.तसेच बाळ उशीरा जन्माला येऊ शकते ज्यामुळे देखील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

गर्भधारणे दरम्यान मातेला अॅनिमिया असल्यास त्यावर कसे नियंत्रण ठेवावे?

अॅनिमिया या समस्येचे गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वीच निदान करणे फार आवश्यक आहे.तसेच जर गर्भधारणेनंतर अॅनिमियाचे निदान झाले तर त्या मातेची प्रसूतीआधी योग्य काळजी घेणे आवश्यक असते.गरोदर महिलांना लोहाची अधिक गरज असते.गरोदर महिलेच्या शरीराला दुस-या तिमाही मध्ये १.९ mg/१००० Kcal व तिस-या तिमाही मध्ये २.७ mg/१००० Kcal इतक्या प्रमाणात लोहाची आवश्यक्ता असते.त्यामुळे तिच्या आहारामध्ये याचे नियोजन करणे गरजेचे आहे.गरोदर महिलेला गरोदरपणाच्या १०० दिवसांमध्ये दररोज १०० mg लोह व ५०० mcg फॉलिक अॅसिडची गरज असते.यासाठी वाचा गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?

तसेच तुमचा अॅनिमिया नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या हिमोग्लोबिनच्या पातळीला नियंत्रित ठेवणे गरजेचे अाहे.

  • जर तुमचे  ८-१० gm/dl असेल तर तुम्हाला तोंडावाटे औषध देण्यात येते.
  • गर्भधारणेच्या दुस-या अथवा तिस-या तिमाहीमध्ये जर त्या स्त्रीचे हिमोग्लोबिन ७-८ gm/dl असेल तर तिला इंजेक्शनच्या माध्यमातून लोहाचा डोस देण्यात येतो.
  • जर हिमोग्लोबिनचे प्रमाण ७ gm/dl पेक्षा कमी असेल तर त्या स्त्रीच्या प्रसूतीकाळानूसार तिला Injectable therapy किंवा Packed Blood Cell Transfusion करणे गरजेचे असते.
  • यासाठी दर महिन्याला हिमोग्लोबिनची टेस्ट करणे गरजेचे असून जर एखाद्या थेरपीचा फायदा होत असेल तर ती थेरपी पुढे सुरु ठेवण्यात येते.पण जर काहीच सुधारणा होत नसेल तर Hematologist च्या मदतीने पुढील उपचार करावे लागतात.
  • जर एखाद्या स्त्रीचा प्रसूतीचा काळ जवळ आला असेल व तिला तोंडावाटे घेण्यात येणा-या औषधांचा फायदा होत नसेल तर तिला Packed Blood Cell Transfusion उपचारांचा सल्ला देण्यात येतो.
  • गरोदरपणातील अॅनिमियाला नियंत्रित करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला जी औषधे देतात ती नियमित घेणे आवश्यक आहे.

गरोदरपणातील अॅनिमियाला नियंत्रित करण्यासाठी आहारामध्ये काय बदल केले जातात?

गरोदरपणातील अॅनिमिया हा फक्त औषधोपचारांनीच नियंत्रित केला जातो पण तरीही आहारामध्ये लोहाचे प्रमाण वाढवून फायदा होऊ शकतो.यासाठी अशा गरोदर महिलांना आहारामध्ये हे बदल सुचविण्यात येतात.यासाठी वाचा आहारातील या ‘१०’अन्नघटकांनी वाढवा तुमचे हिमोग्लोबिन

  • पालक व गडद रंगाच्या पालेभाज्या
  • टोफू
  • मटार,मसूर,पांढरे,लाल व भाजलेले बीन,सोयाबीन व चणे
  • सुकामेवा जसे की प्रून्स,मनूका,जर्दाळू,गुळ व शेंगदाणे
  • लोहयुक्त धान्ये व ब्रेड
  • मैद्याऐवजी गहू व गव्हाचे पीठ वापरणे
  • मांसाहारींनी आहारामध्ये चिकन,मटण,मासे व शेलफीश वाढवावे.मात्र लक्षात ठेवा मांसाहार करताना ते पदार्थ चांगले शिजवावे कारणे न शिजवता खाण्याने बाळाचे फायद्या ऐवजी नुकसान होऊ शकते.
  • त्याचप्रमाणे डॉ.जगताप यांच्यामते यासाठी गरोदर स्त्रीने चहा व कॉफीचे प्रमाण कमी करावे.

 

 Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>