दुपारच्या जेवणानंतर झोपणे ही तुमची सवयच झाली आहे का ? असे असेल तर मग तुम्हांला काळजी घेणे आवश्यक आहे. कारण दुपारच्या वेळी झोपणे हे फक्त तुमच्या वेटलॉस मिशनच्या आड येऊ शकते असे नाही, तर यामुळे काही आजारांना आमंत्रण देण्यासही कारणीभूत ठरू शकते. पण सकाळी लवकर उठून काम कराणार्या स्त्रिया थकून दुपारी थोडा वेळ आराम करतात. मग हा आरामदेखील त्रासदायक ठरतो का ? याविषयी आहारातज्ञ आणि स्पोर्ट न्युट्रीशनिस्ट दीपशिखा अग्रवाल यांनी दिलेला हा खास सल्ला -
- झोप नाही, आहार वजन वाढवते –
वजन वाढण्याच्या समस्येमध्ये झोपेपेक्षा तुमचा आहार फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे दुपारचे आणि रात्रीचे झोपणे दोन्ही वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. झोपल्यामुळे सहाजिकच कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण इतर अॅक्टिव्हीच्या तुलनेत कमी होते. मात्र निरोगी स्वास्थ्यासाठी पुरेशी झोपदेखील आवश्यक आहे. कारण अपुरी झोपदेखील लठ्ठपणा वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. तुम्हांला अजून किती तास झोप आवश्यक आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
- जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा -
जेवण आटपून लगेचच झोपणे ही सवय आरोग्यदायी नाही. जेवण आणि झोपण्यामध्ये किमान 1-2 तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो. या वेळेत पचनक्रिया सुधारण्यास तसेच फॅट बर्न होण्यास मदत होईल.
- पित्त वाढते -
जेवणानंतर ताबडतोब झोप घेतल्याने पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. कारण झोपल्यामुळे पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. परिणामी पित्त वाढते. त्यामुळे हा त्रास टाळून दुपारच्या वेळेत आराम करायचा असल्यास जेवल्यानंतर लगेचच झोपू नका. तसेच दुपारची झोप ही फार वेळ असू नये. ‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Why sleeping after lunch is an unhealthy habit
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.