Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

तुम्ही एकुलते एक आहात का? भावंडांशिवाय वाढणा-या मुलांबाबत या आश्चर्यकारक गोष्टी जरुर जाणून घ्या.

$
0
0

एकुलते एक मुल हे हट्टी,अतिलाडाचे,स्वार्थी व वाया गेलेले असते असे अनेकांचे मत असते.सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर लोक लगेच तुम्हाला काही विशिष्ट लेबल लावून मोकळे होतात.”तु एकुलता एक आहेस म्हणजे तुला शेअर करायची सवयच नसेल.” किंवा “तु एकलकोंडीच असशील.” किंवा काही लोकांना वाटते की “एकुलते एक मुल असल्यामुळे तुझे पालक तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीत असणार.”खरेतर एकुलते एक मुल असणे हे नेहमी फायद्याचेच असते.प्रत्येक एकुलते एक मुल मग तो असो अथवा ती वाया गेलेलीच असेल या दृष्टीने पहाण्याची मुळीच गरज नाही.मुंबईतील मसिना हॉस्पिटलमधील मानसशास्त्राचे प्रोफेसर व प्रसिद्ध सायक्रायटीस्ट डॉ.युसूफ मॅचेसवाला यांच्याकडून जाणून घेऊयात एकुलत्या एक मुलांची काही वैशिष्ट व अशा मुलांना कसे घडवावे.तुम्ही एकुलते एक मुल असाल अथवा तुम्हाला एकुलते एक मुल असले असे काहीही असले तरी ही माहिती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.

एकुलत्या एका मुलांना तडजोड करणे कठीण जाते का?

डॉ.मॅचेसवाला यांच्या मते Toni Falbo या सायकॉलॉजी प्रोफेसरच्या एका अभ्यासानूसार एकुलती एक मुले ही प्रेरीत होणारी व वैयक्तिक दृष्या एकमेंकासोबत जुळवून घेणारी असतात.त्यामुळे एखाद्या परिस्थितीमध्ये तडजोड करण्यामध्ये एकुलती एक मुले ही भावंड असणा-या मुलांपेक्षा फार वेगळी नसतात.

एकुलती एक मुले वाया गेलेली असतात का?

अनेकांच्या मनात असलेला हा एक फार मोठा गैरसमज आहे. एकुलती एक मुले ही गैरवर्तन करणारीच असतात या गैरसमजातून लोक अशा मुलांकडून असभ्यपणाची अपेक्षा करतात.त्यामुळे डॉ.मॅचेसवाला यांच्या मते एकुलते एक आहे म्हणून एखादे मुल असभ्य असेल असे म्हणणे चुकीचे आहे.

एकुलत्या एक मुलांची शैक्षणिक प्रगती खराब असते का?

अनेकांचे असे मत असते की एकुलते एक असल्यामुळे पालक त्यांच्या मुलांना बिघडवतात.असे पालक मुलांच्या अभ्यासासाठी त्यांच्या जास्त पाठी लागत नाहीत.त्यामुळे एकुलते एक मुल अभ्यासामध्ये विशेष प्रगती करु शकत नाही.

मात्र १९९५ साली Douglas Downey ने केलेल्या एका अभ्यासानूसार मुलांच्या शैक्षणिक कामगिरीचा व त्यांच्या कौटुंबिक आकाराचा काहीही सबंध नसतो.याचाच अर्थ भावंडे नसलेली मुले देखील उत्तम शैक्षणिक प्रगती करु शकतात.डॉ.मॅचेसवाला यांच्यामते एकुलत्या एक मुलांचे संवाद कौशल्य त्यांच्या समवयस्करांपेक्षा अधिक चांगले असते.विश्वास वाटत नसेल तर बराक ओबामा,इलेनॉर रुझवेल्ट,आयझॅक न्यूटन,महात्मा गांधी किंवा मारिया शारापोवा यांची चरित्रे पहा या महान व्यक्ती एकुलत्या एक आहेत.तसेच या ’4′ फायद्यांसाठी मुलांना व्हिडियो गेम खेळू द्या ! हे देखील जरुर वाचा.

एकुलत्या एक मुलांना सामाजिक अडचणी येतात का?

भावंडांसोबत वाढलेल्या मुलांपेक्षा अशी एकुलती एक मुले त्यांचे नातेवाईक,चुलत किंवा मावस भावंडे यांच्यामध्ये मिसळत नाहीत.पण याचा अर्थ एकुलती एक मुले कुटूंब वत्सल नसतात असा मुळीच होत नाही.मात्र डॉ.मॅचेसवाला यांच्या मते यामुळे त्यांना समाजामध्ये कसे वागावे हे समजत नाही.अशा मुलांना त्यांच्या समवयस्क मुलांसोबत संवाद साधणे कठीण जात असल्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनामध्ये संवाद साधण्यास अडचणी येतात.त्यामुळे अशी मुले त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारण्यापेक्षा चर्च,मंदीर,व्यावसायिक अथवा शैक्षणिक कार्यक्रम अशा ठिकाणी अधिक वेळ रमतात.पण त्यांचे हे वागणे त्यांच्या वाढत्या वयासोबत कमी देखील होऊ शकते.यासाठी वाचा या ‘५’ कारणांसाठी मुलांना अवश्य घराबाहेर पडून खेळू द्या !

एकुलती एक मुले स्वार्थी असतात का?

खरेतर नाही एकुलती एक मुले त्यांच्या मित्रमंडळींसोबत चांगली वागतात.मित्रांना मदत करण्यासाठी अशी मुले फार कष्ट घेतात.मात्र इतरांना अशी मुले स्वार्थी आहेत असे वाटत असते कारण अशा मुलांचे कुटूंबिय त्यांना त्यांच्या समवयस्क मित्रमैत्रिणींसोबत जास्त जवळीक करु देत नाहीत.

एकुलती एक मुले परिपक्व किंवा समजूतदार नसतात का?

एकुलत्या एक असलेल्या मुलांचे फार लाड होत असल्यामुळे असे वाटणे सहाजिक आहे पण हा त्यांच्याबद्दल असलेला एक गैरमसज आहे.उलट डॉ.मॅचेसवाला यांच्या मते अशा मुलांचा वाढीच्या काळात त्यांचा सतत मोठ्यांशीच सबंध आल्यामुळे अशी मुले आपोआप परिपक्व होतात.त्यामुळे एकुलती एक मुले सहज मैत्री करू शकतात किंवा त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांसोबत देखील ती सहज जुळवून घेतात.

एकुलती एक मुले कंटाळवाणी असतात का?

अनेकांना वाटत असते की संगीत,कला व छंद अशा आवडींबाबत मुलांवर त्यांच्या मोठ्या भावंडांचा नेहमीच प्रभाव असतो.त्यामुळे भावंडे नसलेली एकुलती एक मुले कंटाळवाणी असू शकतात किंवा त्यांचे जीवन निरस असू शकते वाटू शकते.मात्र हे खरे नसून एकुलती एक मुले प्रामाणिक,महत्वाकांक्षी व अधिक नेतृत्व गुण असलेली असतात.अशी मुले स्वाभिमानी असतात व भावंड नसलेल्या या मुलांमध्ये देखील एखादे चांगले व्यक्तिमत्व दडलेले असू शकते.यासाठी वाचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ५ टीप्स

References:
1. Trent, K., & Spitze, G. (2011). Growing up without siblings and adult sociability behaviors. Journal of family issues, 32(9), 1178-1204.
2. Eischens, A. D. (2002). The dilemma of the only child.
3. Johnson, G. R. (2000). Science, Sulloway, and birth order: An ordeal and an assessment. Politics and the Life Sciences, 19(2), 221-246.
4. Koontz, K. (February 1989). Just me. Health, 21, 38-39.

 Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>