जर तुम्ही ब्लड थिनर्स घेत असाल तर इतर औषधोपचारांप्रमाणेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला तंतोतंत पाळणे गरजेचे आहे.ब्लड थिनर्स घेणा-या लोकांना आहाराबाबत पथ्ये पाळावी लागत नाहीत.मात्र ब्लड थिनर्स सुरु करताना तुम्हाला इतर आरोग्य समस्यांवर औषधोपचार सुरु असतील तर त्यांची माहिती तुमच्या डॉक्टरांना आधीच देणे फार गरजेचे आहे.कारण अगदी सर्दी-तापावरच्या औषधांपासून ह्रदयविकार व क्षयरोगावरची औषधे देखील ब्लड थिनर्सची कार्यक्षमता बदलू शकतात.तसेच वाचा ब्लड थिनर्सच्या गोळ्या घेणं विसरणं केव्हा ठरतं सर्वाधिक धोकादायक ?
यासाठी एशियन हार्ट इन्स्टिट्युटचे Cardiac Electro Physiologist डॉ.संतोष कुमार डोरा यांच्याकडून जाणून घेऊयात कोणत्याही आरोग्य समस्येवर उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे का आवश्यक आहे.
डॉ.डोरा यांच्यामते औषधे विशेषत: ब्लड थिनर्स विचारपूर्वक देण्यात येतात.हार्ट वॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांचा सल्ला पाळणे गरजेचे असते. ब्लड थिनरचा डोस व प्रमाणामध्ये बदल झाल्यास रुग्णाला त्रास होऊ शकतो.कारण काही औषधे Anticoagulant ची क्रियाशीलता वाढवतात तर काही औषधे Anticoagulant क्रियाशीलता कमी करतात.त्यामुळे डॉक्टरांना तुमच्या इतर औषधांनूसार ब्लड थिनर्सचा डोस ठरवावा लागतो.ज्याचा Anticoagulant च्या क्रियेवर प्रभाव पडू शकत नाही.डॉक्टरांनी तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये ब्लड थिनरचे प्रमाण द्यावे यासाठी तुम्ही आधीपासून घेत असलेल्या सर्व औषधउपचारांची अचूक माहिती तुमच्या डॉक्टरांना वेळीच द्या.
जर एखाद्या व्यक्तीला क्षयरोग असेल व त्याची हार्ट वॉल्वची सर्जरी देखील झाली तर त्याला ब्लड थिनर्स देताना डॉक्टर त्या व्यक्तीला अॅन्टीबॅक्टेरियल औषधे देऊ शकतात.तसेच Rifampicin औषधासोबत ब्लडथिनर घेतले गेले तर Anticoagulant क्रिया कमी होते ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीमध्ये तुमच्या डॉक्टरांना तुमच्यावर सुरु असलेल्या औषधोपचारांची माहिती दिल्यास डॉक्टर तुमच्या ब्लड थिनरचा डोस वाढवू शकतात ज्यामुळे Anticoagulant क्रिया सुधारते.
अॅन्टी फंगल औषधे घेतल्यास Anticoagulant क्रिया वाढते.त्यामुळे जर तुम्ही ब्लड थिनर घेत असाल व तुम्हाला फंगल इनफेक्शन झाले तर तुमच्या डॉक्टरांना याची माहिती वेळीच द्या त्यामुळे डॉक्टर तुमच्या अॅन्टीफंगल औषधांचा डोस वाढवतील व त्यामुळे तुमच्या ब्लड थिनरचा प्रभाव नियंत्रित राहील.Anticoagulant क्रिया वाढल्यामुळे रक्ताच्या प्रमाणात घट होऊन अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो.तर Anticoagulant क्रिया कमी झाल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढू शकते.यासाठी ब्लड थिनर योग्य प्रमाणात घेणे आवश्यक असते कारण Anticoagulant क्रियेमध्ये बदल झाल्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.एवढेच नाही तर ब्लड थिनर वेळेत व न चुकता घेणे देखील तितकेच आवश्यक आहे.यासाठीया ’7′ उपायांनी लक्षात ठेवा तुमच्या औषधांच्या वेळा !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock