Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

एकदा सेक्स दरम्यान ऑर्गेझम मिळवल्यानंतर पुन्हा किती वेळाने सेक्स करु शकता?

$
0
0

सेक्स दरम्यान एकदा ऑर्गेझम मिळवल्यावर पुन्हा ऑर्गेझम मिळवणे कठीण होण्याचा कदाचित अनेकदा तुम्हाला अनुभव आला असेल.सेक्स करताना एकदा ऑर्गेझम मिळवल्यावर जर तुमच्या स्त्री जोडीदाराला तोच आनंद पुन्हा लगेच हवा असेल तर तुम्ही काय करता?तुम्ही पुन्हा सेक्स करण्यास लगेच तयार होता का? कदाचित तोच मूड पुन्हा मिळवणे तुम्हाला कठीण जाऊ शकते.पुन्हा सेक्सच्या मूडमध्ये येण्यास एकाद्याला नेमका किती वेळ लागू शकतो? या शंकेचे उत्तर जाणून घेऊयात Sexologist डॉ.व्ही.रैना यांच्याकडून.तसेच ब्लेन्डेड ऑर्गेझमचा आनंद घेण्यासाठी खास ४ सेक्स पोझिशन जरुर जाणून घ्या.

एकदा सेक्स केल्यावर पुन्हा सेक्स करण्यासाठी एखाद्याला किती वेळ लागतो?

कदाचित तुम्हाला माहित असेल की चित्रपटामध्ये दाखविल्याप्रमाणे एका सेशनमध्ये तीन ते चार वेळा स्खलन होणे हे वास्तवामध्ये मुळीच शक्य नसते.महिलांपेक्षा पुरुषांना एकदा सेक्स केल्यावर पुन्हा पेनिट्रेट करण्यासाठी Refractory period द्यावा लागतो.Refractory period म्हणजे एकदा ऑर्गेझम मिळवल्यानंतर पुन्हा ऑर्गेझम मिळवण्याच्या मध्ये असणारा काळ. हा Refractory period नेमका किती असावा याचा कोणताही अचूक डेटा उपलब्ध नसला तरी अंदाजे तो ३० मिनीटांपासून २४ तासांपर्यत कितीही असू शकतो.दी जर्नल ऑफ सेक्शुअल मेडीसिन मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानूसार हा Refractory period प्रत्येकाच्या वयोमानानूसार वाढण्याची शक्यता असू शकते.यासाठी वाचा सेक्सचा अधिक वेळ आनंद घेण्यासाठी ’10′ हॉट टीप्स !

एकदा सेक्स केल्यावर लगेच पुन्हा शिश्न(पेनिस) ताठ होणे कठीण का असते?

latency period ची कारणे शास्त्रज्ञांकडे खात्रीपूर्वक नसली तरी काही अभ्यासानूसार पुन्हा ऑर्गेझम मिळवण्यासाठी स्खलन व उत्तेजितपणा प्राप्त करण्यामध्ये अडथळा आणण्यासाठी प्रोलॅक्टीन हॉर्मोन्सची वाढ हे प्रमुख कारण कारणीभूत असू शकते.तसेच जीवनशैलीतील मद्यपानासारख्या काही सवयींमुळे पुरुषांना सेक्स झाल्यावर पुन्हा रिचार्ज होण्यास वेळ लागू शकतो.नियमित हस्तमैथून करणे हे देखील पुरुषांना पुन्हा ऑर्गेझम मिळवणे कठीण होण्याचे एक कारण असू शकते.यासाठी वाचा धुम्रपानामुळे होतात सेक्सलाईफवर गंभीर परिणाम !

पुरुषांनी याबाबत काळजी करण्याची केव्हा गरज अाहे?

जर तुम्हाला सेक्स साठी पुन्हा रिचार्ज होण्यास काही दिवस लागत असतील तर मात्र तुम्ही याबाबत काळजी करणे आवश्यक आहे.कारण हे Erectile dysfunction चे एक लक्षण असून याबाबत तुम्ही त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.तसेच तुमच्या या सेक्स समस्येसाठी तुमच्या जीवनातील ताण किंवा तुमच्या जीवनशैलीमधील इतर कोणते घटक कारणीभूत आहेत हे फक्त तुम्हाला तुमचे डॉक्टरच अचूकपणे सांगू शकतील.यासाठी वेळीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या व योग्य औषधोपचार करुन तुमच्या सेक्शुअल आयुष्याचा पुन्हा आनंद मिळवा.तसेच वाचा वयोमानानूसार पुरुषांमध्ये या 4 आजारांचा धोका वाढतो !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>