Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गर्भारपणात वजन नियंत्रित ठेवण्यासाठी करा घरच्या घरी सायकलिंग !

$
0
0

गर्भारपणात व्यायाम करण्याचे महत्त्व आपण सगळेच जाणतो. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते, रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते, शरीराला ऑक्सिजनचा चांगला पुरवठा होतो. तसंच गर्भारपणातील विविध समस्यांपासून तुम्ही सुरक्षित राहता. या ३ फायद्यांसाठी प्रत्येक महिलेने गरोदरपणानंतर करावा किगल व्यायाम

बाळ व माता दोघांच्या आरोग्यासाठी व्यायाम फायदेशीर ठरतो. परंतु, गर्भारपणात अनेक महिलांना व्यायामात सातत्य राखणे कठीण होते. त्याचबरोबर जर तुम्हाला बैठ्या जीवनशैलीची सवय असेल आणि व्यायाम करण्याची अजिबात सवय नसेल तर गर्भारपणात व्यायाम करणे अधिकच कठीण होते. प्रसुतीनंतर वजन कमी करण्यासाठी बाळासोबत करा हे ५ व्यायाम

जर गर्भारपणापूर्वी तुम्हाला व्यायामाची सवय नसेल तर गर्भारपणात चालणे उत्तम ठरेल. परंतु, तुम्ही गर्भारपणापूर्वी नियमित व्यायाम करत असाल, जिमला जात असाल पण गर्भारपणात होणाऱ्या मूड स्विंग्स आणि हार्मोनल बदलांमुळे आळसावल्यासारखे वाटत असेल तर घरच्या घरी सायकलिंग करा. या ‘९’ टीप्सने करा प्रेगन्सीमध्ये होणाऱ्या मूड स्विंग्सवर मात !

Shantah IVF Centre च्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF एक्स्पर्ट डॉ. अनुभा सिंग यांच्या सल्ल्यानुसार सायकलिंगमुळे शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते, लवचिकता, एकाग्रता वाढते आणि दीर्घ श्वसनाची सवय होते. घरच्या घरी सायकलिंग केल्यामुळे घोटे व गुडघे यावर अधिक ताण न येता व्यायाम होतो. तसंच पडण्याचा धोका नसतो. नक्की वाचा: सिझेरियननंतर वाढलेले वजन आणि नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !

कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रैनिंग एक्सरसाईजचा सायकलिंग हा चांगला प्रकार असून गर्भारपणात करण्यास उत्तम व्यायामप्रकार आहे. तसंच व्यायाम करताना इजा किंवा अपघात होण्याची शक्यता खूप कमी आहे. फक्त १५ मिनिटे सायकलिंग केल्याने सुमारे ३०० कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. गरोदरपणात दुस-या अथवा तिस-या तिमाहीमध्ये वजन कमी होणे चिंतेची बाब आहे का ?

परंतु, गर्भारपणात घरच्या घरी सायकलिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सायकल चालवून कसे घटवाल परिणामकारक वजन !

  • जर तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटत असेल तर सायकलिंग करणे थांबवा.
  • तुमच्या मदतीला आजूबाजूला एखादी व्यक्ती असू द्या.
  • पाणी पित रहा. त्यामुळे डिहायड्रेट वाटणार नाही.
  • खूप दमेपर्यंत व्यायाम करू नका.
  • resistance level कमी ठेवा.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>