Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लेप्टोस्पायरोसिसचा धोका नेमका कोणाला असतो ?

$
0
0

पावसाळा आणि आजारपण हे जोडीने येतं. ताप, सर्दी, खोकला, इन्फेकशन याबरोबरच पावसाळ्यात येणारा अजून एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. परंतु, अनेक लोकांना याबद्दल माहीती नाही. या आजाराचा पसार कुत्रा, उंदीर यांसारख्या प्राण्यांमुळे होतो. खूप पाऊस पडल्यावर पाणी साचतं. काही वेळा पूर येतो. अशा साचलेल्या पाण्यात प्राण्यांच्या  लघवीतील बॅक्टरीया मिसळतात व त्यामुळे इन्फेकशन पसरते. तर जाणून घेऊया लेप्टोस्पायरोसिसचा धोका कोणाला अधिक आहे ? पावसाळी आजार आणि त्यांपासून संरक्षण करण्याचे काही सोपे उपाय

परंतु, काही ठराविक गोष्टींमुळे इन्फेकशनचा धोका अधिक वाढतो. मुंबईचे  Infectious Disease and Immunology कॅन्सल्टंट डॉ. ओम श्रीवास्तव यांनी लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढवणाऱ्या घटकांविषयी माहिती दिली. त्याचबरोबर त्या आजाराला आळा घालण्याचे मार्ग सांगितले. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी 10 आयुर्वेदिक टिप्स !

सगळ्यांनाच लेप्टोस्पायरोसिसचा धोका आहे, असे डॉ. श्रीवास्तव म्हणाले. परंतु, जर तुम्ही रहात असलेल्या ठिकाणी आजूबाजूला उंदीरांचा प्रादुर्भाव असेल तर हा धोका अधिक वाढतो. कारण त्यामुळे पाणी, माती, अन्न प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित होऊन इन्फेकशन पसरण्याची शक्यता असते. पावसाळ्यात ‘जॉगिंग’ करताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

या बॅक्टरीयांचा त्वचेत शिरकाव झाल्यानंतर त्वचा फाटली गेल्यास, स्क्रॅचेस आल्यास धोका अधिक वाढतो.  Leptospira बॅक्टरीयामुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होतो. परंतु, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा आजार पसरण्याची शक्यता तशी कमीच असते.

पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. पशुवैद्य, प्राण्यांचे केयर टेकर यांना देखील हा धोका असतो. जर तुम्ही आऊटडोअर स्पोर्ट्स म्हणजेच राफ्टिंग, स्विमिन्ग दूषित पाण्यात करत असाल तर तुम्हाला इन्फेकशन होण्याची शक्यता असते. अवश्य वाचा: पावसाळ्यातील आजारपणांंपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स

  • लेप्टोस्पायरोसिसला आळा कसा घालावा ?

पाणी साठलेल्या जागेतून चालणे टाळा. चिखल, घाण असलेल्या जागी अधिक काळ राहू नका. बरं वाटत नसल्यास किंवा लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे दिसून आल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच जाणा लेप्टोस्पारोसीसची लक्षणं

स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांनाकडे जाणे योग्य ठरेल. कारण स्वतःहून औषधे केल्यास त्रास वाढून परिस्थिती गंभीर होऊ शकते. घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. फिरायला गेलेल्या ठिकाणी देखील स्वच्छता राखा. या 10 टीप्सनी टाळा लेप्टोस्पारोसीसचा संसर्ग.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>