Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दात दिवसातून किती वेळ घासणं गरजेचे आहे ?

$
0
0

दिवसातून दोनदा दात घासावेत हा नियम लहानपणापासून शिकवला जातो. पण खूप जोर जोरात दात घासल्याने दातांमध्ये अडकलेले अन्नकण आणि कीटाणू दूर होतील हा तुमचा समज असेल  तर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. खूप जोर जोरात दात घासण्याच्या सवयीमुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते. म्हणूनच दातांचे आरोग्य जपण्यासाठी प्रसिद्ध डेन्टिस्ट डॉ. निकिता गोएल यांचा हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

खूप जोरजोरात दात घासण्याच्या सवयीमुळे काय नुकसान होते ?

खूप जोर जोरात दात घासण्याच्या सवयीमुळे दातांचे आरोग्य जपण्यास फारसा फायदा होत नाही. खूप वेळ दात घासण्याची सवयदेखील फारशी उपयुक्त नाही. जोर जोरात दात घासण्याच्या सवयीमुळे दातांवरील इनॅमलचे नुकसान होते. हिरड्यांच्या टिश्यूचे नुकसान होते. त्यामुळे जोर जोरात दात घासण्याच्या सवयीमुळे तोंडाचे आरोग्य सुधारते हा तुमचा गैरसमज आजच दूर करा. ब्रश करताना या ’7′ चुका टाळा

दात नियमित किती वेळ घासावेत ?

दात दिवसातून 2-3 वेळेस घासावेत. तसेच दात घासताना ते 2-3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आणि जोरजोरात घासत बसू नका. या ’7′ समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश कराच !

दात कशाप्रकारे घासणे अधिक फायदेशीर आहे ?

दात घासताना सगळीकडे एकाच वेळी ब्रश फिरवू नका. तोंडाचे वेगवेगळे भाग करा आणि प्रत्येकी 30 सेकंद तो प्रत्येक भाग स्वच्छ करा. दात घासताना बाहेरील भाग, दातांच्या आतील भाग आणि जीभेचा भाग स्वच्छ करा. हिरड्यांवर ब्रश करताना तो आडव्या स्वरूपात करू नका. यामुळे हिरड्यांचे नुकसान होऊ शकते. सोबतच दातांनाही त्रास होतो. दातांप्रमाणेच तोंडाचे आरोग्य जपताना जीभेलादेखील स्वच्छ करणं गरजेचे आहे. यामुळे बॅक्टेरियांची वाढ  रोखता येते. परिणामी तोंडाला येणारा वास कमी होतो. रात्रीही ब्रश करण्याची सवय कमी करेल या ’5′ समस्यांचा धोका !

ब्रश करताना कोणती काळजी घ्याल ?  

  • दर महिन्याला ब्रश बदलणं गरजेचे आहे. महिन्याभरापेक्षा अधिक दिवस वापरत असलेला ब्रश तुमच्या हिरड्यांचे नुकसान करू शकतात.कशी कराल योग्य टुथब्रशची निवड ?
  • मऊ दातांचे ब्रश वापरा. यामुळे दातांचे आणि हिरड्यांचे फार नुकसान होत नाही.
  • छोट्या आकाराचे ब्रश वापरा. यामुळे ते तोंडात मागच्या बाजुला अधिक सफाईदारपणे फिरु शकतात.
  • सॉफ्ट ब्रश गोलाकार दिशेने फिरवत ब्रश करा. सतत पुढे-मागे ब्रश करण्याची सवय दातांचे आणि हिरड्यांचे नुकसान करू शकतात.

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>