संध्याकाळी सातच्या आत घरात या नियमाप्रमाणे रात्रीचे जेवणदेखील सातच्या आत घेण्याचा सल्ला अनेकांनी दिला असेल. पण मुंबई, पुण्यासारख्या धकाधकीच्या शहरांमध्ये सातच्या आत कामं आटपून घरी पोहचणंदेखील जिकरीचं आहे. पण मित्र-मैत्रिणींपासून ते अगदी आहारतज्ञांपर्यंत अनेकजण सातच्या आत जेवणाचा सल्ला देतात. यामुळे खरंच वजनावर नियंत्रण ठेवता येतं का ? याबाबतचा खास सल्ला आहारतज्ञ उर्वशी स्वाहनी यांनी दिला आहे.
आहारातून तुमच्या शरीरात जाणार्या कॅलरीज बर्न होणं गरजेचे आहे. तसेच खाल्लेलं अन्न पचण्यासाठीदेखील पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे संध्याकाळी सातच्या नंतर विनाकारण उपाशी राहणं आरोग्यासाठी फारसे हितकारी नाही. शरीराच्या चक्राप्रमाणे तुम्हीदेखील खाणं गरजेचे आहे. तुम्ही खूप कॅलरीज असलेले पदार्थ, खूप गोडाचे पदार्थ खाणं रात्रीच्या जेवणात टाळणंच फायाद्याचे आहे. जेवणानंतर गोड खाणे ही आरोग्यदायी सवय आहे का ?
रात्री 9 च्या नंतर काहीही न खाणं हेच आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. रात्री उशीरा जेवणाच्या सवयीमुळे पचनमार्गामध्ये बिघाड होतो.त्याचा गंभीर परिणाम सहाजिकच तुमच्या झोपेवरही होतो. यामुळे रात्री पित्ताचा त्रास, कफ़, हार्टबर्न ( छातीत जळजळणं) होऊन झोपेचे चक्रही बिघडते. दिवसभर उपाशी राहून रात्री भरपूर खाणे योग्य आहे का ? रात्री उशीरा जेवण्याच्या सवयीप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे सतत मूत्रविसर्जनाची इच्छा होऊन रात्रीची झोपमोड होते. या ५ गोष्टींचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो !
टीप -:
रात्री 9च्या नंतर जेवल्यानंतरही तुम्हांला भूक लागत असल्यास लिन प्रोटीन्स, व्होल ग्रेन्स यांची निवड करा.दिवसा शरीराला आवश्यक असणार्या कॅलरीज आणि एनर्जी तुमच्या आहारात येत नसल्यास तुम्हांला रात्रीच्या वेळी भूक लागू शकते.त्यामुळे दिवसभर भरपूर आणि आरोग्यदायी प्रमाणात खाण्याची सवय ठेवा. नाश्ता करून देखील भूक लागण्याची ही आहेत ‘५’ कारणे ! दिवसाची सुरवात भरपेट नाश्ताने कारावी.यामध्ये 20 ग्रॅम प्रोटीन आणि अन्य प्रोटीनरिच पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा.प्रत्येक जेवणातून किती प्रमाणात प्रोटीन घेणे गरजेचे आहे ? हे जाणून घेण्यासाठी हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock