जानेवारी २०१४ साली John Hopkins University मध्ये Baltimore संशोधकानी केलेल्या अभ्यासानूसार प्राचीन काळापासून परिचित असलेल्या मेडीटेशन अथवा ध्यानामुळे तुमच्या सर्व चिंता व डिप्रेशन दूर होण्यास मदत होते.
माईंडफुलनेस मेडीटेशन म्हणजे नेमके काय?
विपश्यना हा ध्यानाचा सर्वात जुना प्रकार आहे.आजकाल हेच ध्यान जगभरात माईंडफुल मेडीटेशन नावाने प्रसिद्ध आहे.या ध्यानाचा सराव करणे सोपे असून मन:शांती हवी असलेली कोणतीही व्यक्ती हे ध्यान करु शकते.
University of California Center for Mindfulness च्या मते माईंडफुलनेस म्हणजे आपल्या विचारांबाबत जागरुक रहाणे व आपल्या पहाणे,गंध घेणे,ऐकणे,स्पर्श करणे व चव घेणे या संवेदनाची जाणिव घेणे.थोडक्यात एखाद्याने त्याच्या आतमधील व बाहेरील विश्वातील सर्व गोष्टींबाबत कोणताही निर्णय न घेता केवळ त्या गोष्टींकडे लक्ष देणे.या ध्यानामुळे माणसाला भूतकाळ व भविष्याची चिंता न करता वर्तमानकाळात जगणे शक्य होते.यासाठी वाचा मेडीटेशन – अवधूत गुप्तेचा चाबूक फिटनेस फंडा !
मेडीटेशनचा सराव कसा करावा?
तुम्ही तुमच्या रुममध्ये किंवा रुमच्या एखाद्या विशिष्ट जागी हे ध्यान करु शकता.ध्यानासाठी तुम्ही निवडलेली जागा शांत व तुम्हाला निवांतपणा देणारी असेल याची मात्र काळजी घ्या.ध्यानामुळे ती जागा अगदी देव्हा-याप्रमाणे पवित्र होते.आरामदायक आसनासाठी एखादी उशी अथवा खुर्चीचा आधार घ्या.आसनावर तुमच्या सोयीनूसार ताठ बसा व तुमचे तळहात तुमच्या मांड्यावर खालच्या दिशेने वळवून ठेवा.
नजर समोर असू द्या व डोळ्यांनी कोणतीही गोष्ट जाणिवपूर्वक पहाण्याचा प्रयत्न करु नका.तुमचे लक्ष तुमच्या शरीराकडे व तुम्ही बसलेल्या ठिकाणी आणा.हळूहळू तुमचे लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रीत करा.तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा मुळीच प्रयत्न करु नका फक्त तुमच्या श्वासाकडे,शरीराकडे व तुमच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाकडे शांतपणे लक्ष देण्याचा प्रयत्न करा.या सरावातून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तुमच्या मनात सतत विचार येत असून त्यातील कोणत्याही दोन विचारांमध्ये संधी अथवा जागा नाही.या विचारांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा जर तुमचे लक्ष विचलित होत असेल तर पुन्हा तुमच्या श्वास व शरीराकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा.यासाठी वाचा ध्यान करण्यास उपयुक्त ठरतील ही योगासनं !
माईंडफुलनेस मेडीटेशनचा काय फायदा होतो?
जर तुम्ही नियमित ध्यानधारणेचा सराव केला जर तुम्हाला मनशांती मिळते व तुमच्या आतील-बाहेरील विश्वातील गोष्टींना कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांच्याकडे शांतपणे केवळ लक्ष देण्याची क्षमता विकसित करता येते.एकदा का तुम्हाला जीवनातील विपरित परिस्थितीमध्ये घडणा-या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे कमी करता येऊ लागले की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीला तोंड देणे सहज जमू लागते.माईंडफुलनेस मेडीटेशनच्या नियमित सरावाने तुम्ही स्थिर होता व तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी त्यांच्या गरजांनूसार मोकळा संवाद साधणे सोपे जाते.तसेच गायत्री मंत्र पठणाचे हे 10 आरोग्यदायी फायदे देखील जरुर वाचा.
ध्यानधारणेत श्वासावर लक्ष दिल्यामुळे व तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा वेध घेल्यामुळे तुम्हाला वर्तमानकाळामध्ये जगणे सोपे जाते.भविष्याची चिंता न करता तुम्ही तो क्षण आनंदाने जगू लागता.ध्यानामुळे तुम्हाला भूतकाळाच्या चिंता व भय सतावत नाहीत.ध्यानाचे अनेक प्रकार आहेत.त्यापैकी काही प्रकार हे मुळातच आगळेवेगळे असल्यामुळे काही जणांना या ध्यानाच्या प्रकारांचा सराव करणे कठीण जाते.मात्र माईंडफुलनेस मेडीटेशन या प्रकारामध्ये विशिष्ट ध्येय गाठणे फार कठीण नक्कीच नाही.विचाररहित अवस्था प्राप्त करुन घेण्यासाठी अतिशय कष्ट घ्यावे लागत नाहीत.या ध्यानासाठी तुम्ही केवळ त्या क्षणाबाबत जागृत असणे गरजेचे असते व त्या वर्तमान क्षणात येणा-या प्रत्येक विचारांवर लक्ष देण्याची गरज असते.जीवन आनंदी व अर्थपूर्ण करण्यासाठी नियमित या मेडीटेशनचा सराव करीत रहा
संदर्भ-
Study published in JAMA available at http://archinte.jamanetwork.com/article.aspx?articleid=1809754
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock