Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बाळाला होणारा जुलाबाचा त्रास हा प्रत्येक वेळेस डायरिया नसतो !

$
0
0

सतत बाळाचे डायपर व दुपटी बदलणे कोणालाही विशेष आवडत नाही.पण जर तुमचे बाळ सतत शी करत असेल तर मात्र ही तुमच्यासाठी एक चिंतेची बाब नक्कीच असू शकते.कारण यामुळे तुमच्या मनात सर्वात आधी बाळाचे पोट बिघडून त्याला डायरिया तर झाला नाही ना? ही शंका येते.मात्र यावरुन स्वत:च काहीतरी निदान करण्यापेक्षा Paediatrician कडे जाऊन बाळावर योग्य उपचार करा.तसेच जाणून घ्या या ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड !

यासाठी परिस्थिती नॉर्मल आहे हे कसे ओळखाल?

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलचे Consultant Paediatrician डॉ.राजू खूबचंदानी यांच्या मते बाळाची शी निरनिराळ्या प्रकारची असू शकते.पातळ शी म्हणजे प्रत्येक वेळी डायरियाच असेल असे नाही.केवळ स्तनपानावर असणारे नवजात बाळ दिवसभरात पंधरा वेळा अथवा तीन ते चार दिवसातून एकदाच शी करु शकते आणि या दोन्ही परिस्थिती अगदी नॉर्मल आहेत.त्यांच्यामते जर तुमचे बाळ व्यवस्थित दूध पित असेल,निरोगी व आनंदी दिसत असेल,ते खेळत असेल,त्याचे वजन नियमित वाढत असेल तर बाळाला पातळ शी झाल्यास देखील काळजी करण्याचे मुळीच कारण नाही.अनेक माता असा गैरसमज करुन घेतात की स्तनपानामुळे बाळाला डायरिया होतो व यासाठी त्या बाळाला स्तनपान देणे लवकर बंद करतात.यासाठी वाचा स्तनपानामुळे लहान मुलांमधील कर्करोगाचा धोका कमी होतो का?

मात्र हीच गोष्ट फॉर्म्युला अथवा बाहेरचे दूध पिणा-या बाळासाठी निराळी असू शकते.डॉ.राजू खूबचंदानी यांच्या मते फॉर्म्युला दूध पिणा-या बाळाची शी घट्ट व कठीण असते.त्यामुळे अशा बाळाने पातळ शी केल्यास ती चिंतेची बाब असू शकते.तसेच स्तनपान घेणा-या बाळापेक्षा फॉर्म्युला दूध पिणा-या बाळाला पोटाचे इनफेक्शन होण्याची शक्यता तुलनेने दहापट अधिक असते.त्यामुळे अशा बाळाने पातळ शी केल्यास त्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे कारण बाळाच्या पोटातील पाणी कमी झाल्याने त्याच्या शरीरातील आवश्यक मीठ व द्रव कमी होऊन बाळाला डी-हायड्रेशन होण्याची शक्यता असू शकते.तसेच वाचा दात येताना बाळाला हे ‘५’ त्रास होतात !

डायरिया हा शरीराचा पोटातील अनावश्यक गोष्टी बाहेर टाकण्याचा स्वत:चा एक उपाय आहे.या काळात तुमच्या बाळाची शरीररचना विकसित होत असल्यामुळे प्रौढांच्या तुलनेत ते या गोष्टीला निराळ्या पद्धतीने प्रतिसाद देऊ शकते.त्यामुळे बाळाने पातळ शी करण्याचे कारण प्रत्येकवेळी तुम्हाला वाटते तसेच असेल असे नाही.अधिक माहितीसाठी वाचा बाळाने ढेकर दिल्याशिवाय त्याला का झोपवू नये ?

याबाबत काळजी करण्याची केव्हा गरज अाहे-

बाळाने सतत शी करणे प्रत्येकवेळी गंभीर असेलच असे नाही.पण त्याकडे दुर्लक्ष देखील करु नका.जर तुमचे बाळ पातळ शी करत असेल तर ते धोक्याचे केव्हा आहे हे समजून घेण्यासाठी खालील गोष्टी जरुर वाचा.

  • जर तुमच्या बाळाला जुलाबासह ताप असेल.तुमचे बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर ही चिंतेची बाब असून त्वरीत बाळावर योग्य उपचार करा.
  • जर बाळ अन्न तोंडातून बाहेर टाकत असेल.जुलाबासह बाळाला उलटी होत असेल तर त्याला पोटात इनफेक्शन झालेले असण्याची दाट शक्यता आहे.
  • जर बाळामध्ये डी-हायड्रेशनची लक्षणे आढळून आली.जसे की जास्त तहान लागणे,कोरडी जीभ,रडताना अश्रू न येणे.
  • लघवीला कमी होणे व लघवीचा रंग गडद होणे.
  • शौचावाटे रक्त पडण्यासह जुलाब व उलटी होत असल्यास बाळाला पोटात बॅक्टेरियल इनफेक्शन झालेले असू शकते ज्यासाठी त्याला त्वरीत वैद्यकीय मदतीची गरज असू शकते.यासाठी वाचा बाळाला उलटीचा त्रास होत असल्यास कशी घ्याल काळजी ?

वरील समस्या असल्यास काय कराल?

जर तुमच्या बाळाला सतत जुलाब होत असतील व त्यासह वरील लक्षणे देखील आढळून येत असतील तर त्वरीत तुमच्या Paediatrician ची भेट घ्या.तसेच या काही उपाययोजना देखील करा.

  • बाळाला होत असलेल्या डायरिया अथवा जुलाबावर उपाय करण्यासाठी घरी Rehydration Solution तयार करा.जसे की भाताची पेज तुम्हाला तयार करता येईल.यासाठी मूठभर भाताची भरडी पाण्यामध्ये मिक्स करुन ती घट्ट होईपर्यंत दहा मिनीटे शिजवा.त्यात मीठ व एक लिटर पाणी घाला.बाळाच्या पोटातील मीठ व द्रवपदार्थांची झीज भरुन निघण्यासाठी बाळाला ही पेज चमच्याने भरवा.
  • तसेच एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा साखर व एक चमचा मीठ घाला व ते पाणी बाळाला द्या.डायरियावर उपचार करण्याचा हा एक जुना उपाय आहे.
  • बाळाला स्तनपान देणे आवश्यक आहे कारण स्तनपानामध्ये अॅन्टी-इनफेक्टिव्ह घटक असतात ज्यामुळे बाळाचे इनफेक्शन अथवा डायरियापासून संरक्षण होते.
  • तुमच्या बाळाला जबरदस्तीने भरवू नका.डायरिया झालेल्या मुलांना अन्नापेक्षा द्रवपदार्थांची अधिक गरज असते.त्यामुळे त्यांना त्यांच्या मर्जीनूसार भरवा.डॉक्टरांच्या मते याकाळात बाळाला गिळण्यापेक्षा पिण्यासारख्या गोष्टी द्या.
  • जर तुमच्या बाळाची भूक मंदावली असेल तर काळजी करु नका बाळ बरे झाल्यावर त्याला पुन्हा भुक लागेल.
  • मुलांसाठी डालखिचडी हा उत्तम पर्याय असू शकतो विनाकारण त्यांचा आहार बदलण्याची गरज नाही.नवजात बाळाच्या खाण्याबाबतचे ‘७’ समज – गैरसमज ! जरुर जाणून घ्या
  • जर तुम्हाला घरी तयार करणे शक्य नसेल तर Commercial Oral Rehydration Solution चा वापर करा.
  • तुमच्या लहान बाळाला कोणतेही अॅन्टीबायोटिक अथवा शी बंद होण्याचे औषध देणे टाळा.डॉ.खूबचंदानी यांच्या मते लहान बाळाची डायरिया ही समस्या व्हायरल असून अॅन्टीबायोटिक्समुळे त्यावरचे उपचार बंद होतात.त्यामुळे बाळाला बॅक्टेरियल इनफेक्शचे निदान झाल्याशिवाय अॅन्टीबायोटिक्स देण्याचा सल्ला दिला जात नाही.तसेच तुमच्या डॉक्टरांना त्यांनी बाळासाठी सांगितलेल्या औषधोपचारांमुळे होणारे साईड इफेक्ट्स जरुर विचारा.जर बाळाला उलटीवर औषध दिले असेल तर औषधांनंतर बाळाला लगेच भरवू नका.आधी ते औषध त्याच्या पोटामध्ये जाऊ दे मग कमीतकमी एक तासाने बाळाला भरवा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock   


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>