Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लैंगिक आजारांवर मात करण्यासाठी योगा आणि आयुर्वेदीक उपचार ठरतील उपयुक्त !

$
0
0

लैंगिक आजार गंभीर असून ते झाल्यानंतर इन्फेकशन बरे करण्यासाठी अँटीबायोटिक्स आणि अँटीव्हायरल औषधे घ्यावी लागतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का ? की लैंगिक आजार बरे करण्यासाठी योगा आणि आयुर्वेदाची मदत होते. अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की लैंगिक आजारांवर मात करण्यासाठी योगा, आयुर्वेद आणि निसर्गोपचार या भारतीय उपचारपद्धती उपयुक्त ठरतात. सेक्स न करताही होऊ शकतात हे लैंगिक आजार !

  • लैंगिक आजार बरे करण्यासाठी योगा आणि आयुर्वेदाची कशी मदत होते?

आयुर्वेदिक डॉक्टर Rishi Manivannan, यांच्या सल्ल्यानुसार योगा आणि आयुर्वेदाची मदत लैंगिक आजार बरे करण्यासाठी होते. core immune system ची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी योगाची मदत होते. योगसाधनेमुळे आजार उत्पन्न करणाऱ्या घटकांशी लढण्याची क्षमता येते.

योगासनांमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. चांगले आरोग्य मिळवण्यासाठी शरारीराची स्ट्रेंथ वाढवणे गरजेचे आहे. योगसाधनेमुळे शरीरातील प्रत्येक संस्थेची स्ट्रेंथ वाढते. आजार, इन्फेकशन बरं करण्याची शरीराची नैसर्गिक क्षमता वाढते. म्हणून नियमित आसने, प्राणायाम, ध्यान केल्याने लैंगिक आजार झालेल्या व्यक्तीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. तसंच आयुर्वेदात विशिष्ट आजारासाठी ठराविक औषधे आहेत. त्याचबरोबर रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी औषधे आहेत.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आहारातील साधे बदल लैंगिक आजारावर मात करण्यास मदत करतात. अन्नपदार्थांच्या प्रकारानुसार त्यांचा लैंगिक आजारांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. gonorrhoea आणि syphilis यांसारखे लैंगिक आजार शरीराचे नैसर्गिक समतोल राखणाऱ्या पदार्थांमुळे बरे होतात. साखर, प्रोसेस्ड आणि रिफाईंड पदार्थ, अल्कोहोल आणि काही सायट्रस फळे यामुळे आजार अधिक लवकर पसरतात. त्यामुळे ते पदार्थ खाणे टाळावे.

  • लैंगिक आजार बरे करण्यासाठी निसर्गोपचाराची मदत होते का ?

Vitalife Clinic आणि Sri Ayurveda Hospital चे naturopathy consultant डॉ. सुरीया रमेश यांच्या सल्ल्यानुसार नैसर्गिक उपचारांचे दुष्परिणाम कमी असतात. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने अधिक चांगले परिणाम दिसून येतात. अधिकतर लैंगिक आजार विशेषतः HIV-AIDS मुळे पेशंटच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.

ज्या लैंगिक आजारांमध्ये रॅशेस येतात त्यावर निसर्गोपचाराचा सकारात्मक परिणाम होतो. कडूलिंबामध्ये अँटीबॅक्टरील आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असल्याने उपचारादरम्यान त्याचा इंटर्नल आणि एक्सटर्नल अशा दोन्ही पद्धतीने वापर होतो.

  • योगसाधना केल्याने लैंगिक आजारांना आळा बसण्यास मदत होते का ?

SriSri Yoga चे डिरेक्टर Dinesh Kashikar यांनी सांगितले की योगा म्हणजे आसनं आणि प्राणायामापेक्षा अधिक काही आहे. योगा ही एक जीवनशैली आहे. खरंतर अष्टांग योगाचा पहिला नियम आहे स्वच्छता. म्हणजेच लैंगिक आजारांना आळा घालण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. म्हणून जर योगाचा आपण जीवनशैली म्हणून स्विकार केला तर लैंगिक आजार पहिल्या टप्प्यातच आटोक्यात आणता येतील. ही ’7′ लक्षणं देतात लैंगिक आजारांचे संकेत !

  • लैंगिक आजार असलेल्या व्यक्तीची सत्यकथा:

योग्य आहाराने लैंगिक आजार बरे होतात. हे आश्चर्यकारक वाटेल पण खरे आहे. पत्रकार Charita V, ज्यांना Candida झाला होता त्या म्हणाल्या, मला थकवा, डोकेदुखी, अनियमित मासिक पाळी अशी लक्षणे दिसून येत होती. त्याचबरोबर पोटावर खाज येणारे रॅशेस झाले होते. तीन वर्ष ते कमी झाले नाहीत. मग तपासणी केल्यावर मला आजाराचे निदान झाले.

त्यावर अॅलोपॅथिक आणि होमियोपॅथिक औषधांचा काही परिणाम झाला नाही. आता त्या पूर्णपणे बऱ्या आहेत आणि त्याचे श्रेय त्या निसर्गोपचार आणि आयुर्वेदाला देतात. आहारात केलेल्या बदलांमुळे आणि आयुर्वेदीक हर्ब्समुळे त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. तसंच दुष्परिणामांची चिंता देखील नव्हती. नियमित योगसाधना आणि ध्यानधारणेमुळे आजारातून बाहेर पडण्यास मदत झाली, असे त्या म्हणाल्या. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या वापरामुळे युरिनरी इन्फेकशन व लैंगिक आजार होतात का?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>