दैनंदिन जीवनातील संघर्षामुळे मनामध्ये प्रचंड गोंधळ व संभ्रम निर्माण होतो.या चिंता काळजी पासून दूर रहाण्यासाठी दररोज काही वेळ ध्यानासाठी काढणे फार आवश्यक आहे. नियमित ध्यान करण्यासाठी ग्रुप मेडीटेशनचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.ग्रुप मेडीटेशन मुळे केवळ तुमच्या वेळेचे योग्य नियोजन करता येते असे नाही तर यामुळे तुम्हाला अनेक चांगले फायदे देखील होऊ शकतात.यासाठी आर्ट ऑफ लिव्हींगच्या ज्योती अग्रवाल यांच्याकडून जाणून घेऊयात ग्रुप मेडीटेशनचे काही फायदे.तसेच ध्यान करण्यास उपयुक्त ठरतील ही योगासनं ! देखील जरुर वाचा.
१.मेडीटेशनसाठी वेळ काढणे सोपे जाईल.
ध्यानासाठी वेळ व जागा शोधणे तुम्हाला कठीण जात असेल तर ग्रुप मेडीटेशनची तुम्हाला नक्कीच चांगली मदत होऊ शकेल. ग्रुप मेडीटेशनमुळे तुम्हाला नियमित ध्यानाचा सराव करण्यासाठी योग्य सोय होऊ शकेल.कारण घरी ध्यान करताना तुम्हाला टिव्हीचा आवाज किंवा रस्त्यावरील ट्राफीकचा आवाज यांचा त्रास होऊ शकतो.शांत ठिकाणी ध्यान केल्याने तुम्हाला ध्यान करताना कमी अडचणी येतात.
२.ग्रुप मेडीटेशनमुळे तुम्ही भयमुक्त व्हाल.
जेव्हा तुम्ही स्वत:च ध्यान करता तेव्हा तुम्हाला तुम्ही योग्य प्रकारे ध्यान करीत आहात ना याची चिंता सतावत असते.जर तुमच्या मनामध्ये अशी चिंता निर्माण झाली तर त्यावर उत्तर मिळणे गरजेचे अाहे.अशा चिंताग्रस्त मनाने तुम्ही नीट ध्यान करु शकत नाही.मात्र ग्रुप मेडीटेशन मुळे तुम्हाला ध्यानाची योग्य प्रकिया समजते.तुमच्या मनात आलेले प्रश्न तुम्ही तुमच्या प्रशिक्षक अथवा ग्रुप मेंबर्सना विचारू शकता व अचूक उत्तर मिळाल्यामुळे तुमचे मन निवांत होते.
३.तुम्ही उत्साही व्हाल.
एकत्र श्वासाचा सराव व जप केल्यामुळे तुमच्या श्वासावाटे टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात व तुम्हाला अधिक उत्साही वाटू लागते.ग्रुपसोबत सराव केल्यामुळे मिळणारा आनंद,उत्साह व उर्जा पुन्हा पुन्हा मिळावी असे तुम्हाला वाटू लागते.त्यामुळे सहाजिकच तुम्ही नियमित मेडीटेशन करण्याचा सराव करता.यासाठी वाचा गायत्री मंत्र पठणाचे 10 आरोग्यदायी फायदे.
४.लक्ष केंद्रित करणे सोपे होईल.
ग्रुपसोबत ध्यानाचा सराव करणे हे लक्ष विचलित न होता लक्ष केंद्रित करण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण एकत्र जप अथवा प्रार्थना केल्यामुळे निर्माण होणा-या व्हायब्रेशन तुम्हाला चिंता व ताण-तणावापासून दूर नेण्यास मदत करतात.ज्यामुळे तुमचे ध्यानावर अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करता येते.त्यामुळे तुम्ही एखाद्या कॉलेजचे विद्यार्थी असा अथवा नोकरी करणारे ग्रुप मेडीटेशनमुळे तुम्हाला कामावरच्या गोष्टी लक्षात ठेवणे,एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अथवा नकारात्मकता कमी करणे यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते.
५.तुम्हाला चिंता व ताण-तणावापासून आराम मिळेल.
तुमच्यामधील ताण-तणाव दूर करण्याचा ग्रुप मेडीटेशन हा एक उत्तम मार्ग आहे.ध्यानामुळे तुमची मज्जासंस्थेला आराम मिळतो व कोर्टीसोल सारखे स्ट्रेस हॉर्मोन्सची निर्मिती कमी होते.तुमचा रक्तदाब व हार्ट रेट नियंत्रित झाल्यामुळे तुम्हाला आराम वाटू लागतो.एवढेच नाही तर ग्रुप मेडीटेशन मुळे लोकांमध्ये मिसळल्यामुळे,तुमच्या समस्या इतरांसोबत शेअर केल्यामुळे तुमची चिंता व काळजी देखील कमी होते.तसेच वाचा मेडीटेशन – अवधूत गुप्तेचा चाबूक फिटनेस फंडा !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock