आजकाल अनेक लहान मुलांना चांगल्या पद्धतीने पोहता येत असतं.तुमच्या अगदी नवजात बाळामध्ये देखील पाण्यात सहज पोहण्याची क्षमता असू शकते.त्याचप्रमाणे लहान मुलांना पाणी देखील फार आवडते.ज्या मुलांना पोहता येत नाही त्यांना देखील पाण्यामध्ये हातवारे करुन पाण्यासोबत खेळणे आवडत असते.त्यामुळेच लहान मुलांच्या स्विमींग पुलचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.जर तुमचे बाळ मोठे असेल व तुम्हाला त्याला पोहता यावे असे वाटत असेल तर त्यांना स्विमींग जरुर शिकवा. कारण पोहण्यामुळे मुलांचा चांगला व्यायाम होतो शिवाय मुले उत्साहित देखील होतात.मात्र तुमच्या बाळाला स्विमींग शिकवण्यापूर्वी या काही दक्षता जरुर पाळा.तसेच या ‘५’ कारणांसाठी मुलांना अवश्य घराबाहेर पडून खेळू द्या !
योग्य साधने-मुलांनी स्विमींग शिकण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या मुलांच्या सुरक्षेसाठी योग्य फ्लोटी किंवा स्विमींग रींग तसेच चेस्ट व आर्म प्रोटेक्शन वापरण्याची काळजी घ्या.मोठ्या मुलांसाठी लेग होल्स असलेल्या स्लिपींग फ्लोटी वापरा ज्यामुळे तुमच्या मुलांचे शरीर पाण्याबाहेर राहू शकेल.तसेच मुलांसाठी स्विम गॉगल्स व स्विमींग कॅप देखील जरुर घ्या.
स्विमींग पुलचे स्वत: निरीक्षण करा-मुलांसाठी असलेले स्विमींगपुल सुरक्षित असतीलच असे नाही.कारण प्रत्येक किड पुल च्या पाण्याची पातळी निरनिराळी असू शकते.काही किडीपुल तर मोठयांसाठी असलेल्या स्विमींगपुलला जोडलेले असतात.त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसाठी निवडलेला स्विमींगपुल सुरक्षित असेल व त्या ठिकाणी लाईफगार्ड देखील असेल याची काळजी घ्या.मात्र जर असे नसेल तर तुम्ही किंवा एखादी जबाबदार मोठी व्यक्ती तुमचे मुल पोहत असताना त्याच्या जवळ असणे गरजेचे आहे.
सनस्क्रीन व बाथींगसुट-पाण्यात पोहत असताना तुमच्या मुलांच्या त्वचा व केसांची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे.कारण स्विमींगपुल मधील पाण्यामध्ये असलेल्या क्लोरीनमुळे तुमच्या बाळाच्या संवेदनशील त्वचेचे नुकसान होऊ शकते.तसेच जर स्विमींगपुल उघड्यावर असेल तर तुमच्या बाळाच्या त्वचेचे प्रखर सुर्यप्रकाशापासून देखील संरक्षण करणे गरजेचे आहे.यासाठी मुलांसाठी योग्य सनस्क्रीन व बाथिंग सुट वापरा जेणे करुन त्यांना या गोष्टींपासून जास्तीतजास्त संरक्षण मिळेल.लक्षात ठेवा लहान मुलांसाठी नेहमी चांगल्या क्वालिटीचे वॉटर रेसिस्टंट मॉर्श्चरायझर व योग्य प्रकारचेच बाथिंगच सुट वापरा.
मुलांसोबत बोला-सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मुलांसोबत याबाबत बोलून त्यांना पाण्यामध्ये काय सावधगिरी पाळावी हे सांगितले पाहिजे.स्विमींग करताना जर तुमचे मुल तुमच्या सूचना पाळणार असेल तरच त्याला किंवा तिला पाण्यात जाण्याची परवानगी मिळेल हे त्यांना सांगा.जर तुमचे मुल स्विमींग फ्लोटी अथवा रींग वापरणार असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ते त्यांने सोडून देऊ नये हे त्यांना शिकवा.जरी तुमचे मुल स्वतंत्रपणे पोहू शकत असेल तरी देखील त्यांना पाण्यात असताना कोणती सुरक्षा घ्यावी हे माहित असायलाच हवे.तुमच्या मुलांना जर डायव्हिंग बोर्डवरुन स्विमींग पुलमध्ये उडी मारायची असेल तर सुरुवातीला त्यांना स्विमींग रिंग जवळ बाळगणे किती महत्वाचे आहे हे जरुर सांगा.तसेच काळानुसार मागे पडलेले हे ’14′ खेळ आजच्या पिढीतील मुलांना नक्की शिकवा.
पालकांनी देखील ड्राय ड्राउंनींग शिकून घ्या-याला सेकेंडरी ड्राउंनींग असेही म्हणतात.तोंडावाटे किंवा नाकावाटे काही प्रमाणात पाणी श्वसनमार्गात गेल्यास श्वास घेणे कठीण होते.कधीकधी पाणी फुफ्फुसांमध्ये जाऊन त्याला सूज देखील येऊ शकते.यासाठी मुलांना त्यांचे डोके जास्तीत जास्त पाण्याबाहेर ठेवण्यास सांगा व व विचित्र पद्धतीने पाणी एकमेकांच्या अंगावर उडवण्यास परवानगी देऊ नका.तसेच वाचा या ’4′ फायद्यांसाठी मुलांना व्हिडियो गेम खेळू द्या !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock