अनेकांना डिटॉक्सिफीकेशन म्हणजे कठीण डाएट करणे,कच्चे खाद्यपदार्थ खाणे,केवळ फळांचा रस पिणे किंवा चक्क उपाशी रहाणे असे वाटत असते.मात्र हे मुळीच खरे नाही.खरेतर डिटॉक्सिफीकेशन म्हणजे शरीराला आराम देण्यासाठी व शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी योग्य आहार घेणे.कधी कधी डिटॉक्सिफीकेशन करताना मळमळ,उलटी,डोकेदुखी,घाम येणे व इतर काही लक्षणे आढळून शकतात.पण यात घाबरण्याचे काहीच कारण नाही उलट याचा अर्थ असा की तुमचे शरीर तुमच्या डिटॉक्स प्लॅनला प्रतिसाद देत आहे. एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार करा हा ‘७’ दिवसांचा डिटॉक्स डाएट प्लॅन
यासाठी Insta Sculpt च्या वेट लॉस एक्सपर्ट डॉ.मंजिरी पुराणिक यांच्याकडून जाणून घेऊयात वजन कमी करण्यासाठी व शरीर डिटॉक्स करण्यासाठी काही साध्या टीप्स.
सकाळी-
१.दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने करा यासाठी एक ग्लास सामान्य तापमान असलेल्या पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळा.लिंबू पाणी घेतल्यावर १५ ते ३० मिनीटे काहिही खाऊ नका.लिंबामध्ये व्हिटॅमिन सी,पोटॅशियम व पेक्टीन फायबर असतात.ज्यामुळे भुक सहन करता येते.ज्यामुळे इन्झायमी कार्याला गती मिळते व यकृत उत्तेजित झाल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.त्यामुळे हा दिवसाची सुरुवात करण्याचा व डिटॉक्सिफीकेशन प्रक्रियेचा एक हेल्दी मार्ग आहे. यासाठी जाणून घ्या शरीर डीटॉक्स करण्याचे ७ सहज सोपे पर्याय !
२.सकाळी अति उर्जेचे व्यायाम प्रकार करा.चालणे,योगा व Pilates हे व्यायाम प्रकार शरीराला आराम देतात व डिटॉक्सिफीकेशनला मदत करतात.जर तुम्हाला सकाळी व्यायाम करणे शक्य नसेल तर लंचनंतर अथवा संध्याकाळी थोडावेळ चाला.
जेवणाचे नियोजन-
३.तुमच्या प्रत्येक मोठ्या जेवणामध्ये भाज्या,तृणधान्ये,सुकामेवा व शेंगांचा समावेश करा ज्यामुळे तुमचे शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होईल.शरीर शुद्ध करण्यासाठी तुमच्या स्नॅक्समध्ये हंगामी फळे व सीड्स चा समावेश करणे फायद्याचे ठरेल.जाणून घ्या आयुर्वेदीक डिटॉक्स डाएटने कसे कराल शरीर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी !
४.तुमच्या आहारामध्ये प्रोबायोटिक्सचा समावेश करा.Lactobacillus Acidophilus या गुड बॅक्टेरियामुळे आतड्यांना टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.तुम्हाला हे मेडीकल मध्ये पावडर स्वरुपात मिळू शकते.या पावडरचा ज्युस व शेक मध्ये मिसळून वापर करा.तसेच योगर्ट व ताकामधून देखील तुम्हाला हे प्रोबायोटीक मिळू शकते.कॉटेज चीजचा देखील तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.प्रोबायोटीक्स समृद्ध खाद्यपदार्थांमधील बॅक्टेरियामुळे पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्टता टाळता येते.या पदार्थांमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास देखील मदत होते.
५.सुकामेवा व सीड्स मुळे तुमच्या शरीराला आवश्यक फॅट्स मिळतात.या पदार्थांमुळे तुमची प्रचनक्रिया संथ होते व तुमच्या शरीरातील उर्जा वाचल्यामुळे तुम्हाला अति प्रमाणात भुक लागत नाही.
६.आहारामधून जास्त प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट घ्या.हिरव्या पाले भाज्या व बेरीज मध्ये ते मोठ्या प्रमाणावर असते.Kale,wheatgrass, seaweed या पदार्थांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो व शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.स्टॉबेरी,ब्लूबेरी व रसबेरीमधील अॅन्टीऑक्सिडंट घटकामुळे निरानिराळ्या आजारांवर मात करता येते.
७.डिटॉक्सिफीकेश करण्यासाठी आहारात निरनिराळ्या सीड्सचा वापर करणे फायदेशीर ठरते.बडीशेपच्या ऐवजी सुर्यफुलांच्या बीयांचा वापर करा.या बीयांमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात त्यामुळे या बीया चघळल्यामुळे पचन सुधारते व रक्तातील साखर नियंत्रित रहाते.चीया सीड्समध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड व प्रोटीन असल्यामुळे त्या लवकर पचल्या जातात.
८.आलं,दालचिनी,लाल मिरची,जिरे व हळद यासारखे मसाल्याचे पदार्थ सूपर क्लिनजर म्हणून ओळखले जातात व त्यामुळे अति खाण्यावर नियंत्रण रहाते.
९.बॉक्स,बॅग किंवा कॅन मध्ये पॅक केलेले कोणतेही पदार्थ खाणे टाळा.कारण अशा पदार्थांमध्ये मीठ व साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यामध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात.असे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्ही डिटॉक्सिफीकेशनसाठी घेतलेली सर्व मेहनत वाया जाऊ शकते.
पेयांची निवड-
१०.चहा,कॉफी किंवा Aerated drinks सारखी अल्कोहोल व कॅफेनचे घटक असलेली पेय घेणे टाळा.यामुळे तुमचे शरीर डी-हायड्रेट झाल्यास तुमच्या शरीरातील डिटॉक्सिफीकेशन प्रक्रियेमध्ये अडथळा येईल.
११.रात्री झोपताना Chamomile चा चहा घ्या.यामुळे तुम्हाला शांत झोप तर लागेलच शिवाय तुमची पचनक्रिया देखील सुधारेल.
जीवनशैली कशी नियंत्रणात आणाल-
१२.डिटॉक्सिफीकेशन ही एक होलिस्टीक प्रक्रिया असून आहारावर नियंत्रण ठेवणे हा त्याचा एक भाग आहे.जीवनशैलीवर नियंत्रण ठेवल्यामुळे तुम्ही निरोगी रहाता. तुमच्या जीवनातील ताण-तणाव दूर करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट तंत्राचा वापर करा.कोर्टिसोल हे स्ट्रेस हॉर्मोन तुमच्या आरोग्यावर परिणाम करते व डिटॉक्सिफीकेशन प्रक्रियेमध्ये अडथळा आणते.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगा व मेडीटेशन करा.
१३.पंधरावड्यातून एकदा मसाज करा.मसाज हे केवळ बरे वाटावे म्हणून नाही तर शरीर डिटॉक्स करण्यासाठी देखील गरजेचे आहे.मसाज केल्यामुळे ताण-तणाव तर दूर होतोच शिवाय तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास देखील मदत होते.
१४.निरोगी जीवनशैलीसाठी व ताण-तणाव कमी करण्यासाठी दररोज रात्री आठ ते नऊ तास शांत झोप घ्या.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock