वजन घटवण्याचं मिशन म्हणजे व्यायामाबरोबरच तुमच्या खाण्या पिण्यावरही नियंत्रण ठेवायला हवे. प्रामुख्याने गोडाच्या पदार्थांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कारण गोडाच्या पदार्थांमधून अधिक कॅलरीज वाढतात. पण पूर्णपणे गोड खाणं सोडण्याची सवय होणं शक्य नाही. अशावेळी चीट डे ला किंवा क्वचित प्रसंगी गोड खाणं ठिक आहे. मग हे क्वचित म्हणजे नेमके तुमचे आवडीचे गोडाचे पदार्थ किती प्रमाणात खावेत याबाबतचा हा खास सल्ला आहारतज्ञ डॉ. रक्षा प्रसाद यांनी दिला आहे.
- आठवड्यात किती वेळा गोडाचे पदार्थ खाऊ शकता ?
डोनट्स, कुकीज, आईस्क्रीम या तुमच्या आवडीच्या गोडापदार्थांना कायमचे तुमच्यापासून लांब करायची काही गरज नाही. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही या गोडाच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. पण नियमित थोड्याफार प्रमाणात गोडाचे खाणं ही तुमची सवय असेल तर ते मात्र त्रासदायक ठरू शकते. यामुळे कॅलरीज वाढतात. क्वचित गोड खाण्याची सवय असेल तर कॅलरीजदेखील फार वाढत नाही सोबतच गोडाची चव तुमच्या मेंदूमध्ये रजिस्टर होण्यास मदत होते. हळूहळू तुमची अनहेल्दी पदार्थ खाण्याची सवय तुम्ही हेल्दी पदार्थांमध्ये वळवू शकता. किंवा गोडाच्या पदार्थांमधील अनहेल्दी पदार्थांचा पर्याय बदलून ते अधिक हेल्दी बनवा. सतत गोड खाण्याची इच्छा होत असल्यास त्यावर या ’7′ मार्गाने मात करा.
- जेवणानंतर गोड खाण्याची सवय आटोक्यात ठेवण्यासाठी काय कराल ?
तुम्हांला दुपारी जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय असेल तर त्याला काही हेल्दी ऑप्शन मिळतोय का ते पहा. एखादे फळ खाण्याची सवय ठेवा. आहारासोबत खाऊ शकाल ही ’5′ फळं !तुमची गोड खाण्याची सवय आटोक्यात ठेवायची असेल तर हर्बल टी पिण्याची सवय फायदेशीर ठरू शकते. जेवणानंतर गोड खाणे ही आरोग्यदायी सवय आहे का ?तसेच रात्रीच्या जेवणानंतर तुम्हांला गोड खायचे असेल तर गोड खाल्ल्यानंतर लगेजच दात अवश्य घासा.भारतीय खाद्यसंस्कृतीत भोजनाची सुरुवात मसालेदार पदार्थांने तर शेवट गोडाने का केला जातो? आठ्वड्यातून एकदा आईस्क्रिम किंवा आवडीचा केक खाऊ शकता. यामुळे तुम्ही त्याचा अधिक चांगल्याप्रकारे आस्वाद घेऊ शकता.आईस्क्रिमसारखी दिसणारी फ्रोझन डेझर्ट्स खरंच हेल्दी पर्याय आहे का ?
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock