Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

साप्ताहिक राशीभविष्य तुमच्या आरोग्याचे ! (२५ जून ते १ जुलै )

$
0
0

मेष-(२१ मार्च ते २० एप्रिल)- हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्य स्वास्थाचा असला तरी तुम्हाला अपचन व अॅसिडीटीचा त्रास होण्याची शक्यता आहे.तुमच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी व रात्री उशीरा रेस्टॉरंटमध्ये जेवणे यामुळे तुम्हाला हा त्रास होऊ शकतो.अपचनाची समस्या टाळण्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयी बदला.अपचन झाल्यास अॅन्टासिड घ्या व भरपूर पाणी प्या.

वृषभ-(२१ एप्रिल ते २१ मे)-या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्यस्वास्थ उत्तम राहील.त्यामुळे चिंतेचे काही कारण नाही.जर तुम्हाला अनियंत्रित रक्तदाबाची समस्या असेल तर मात्र सावध रहा व नियमित चेक-अप करा.

मिथुन-(२२ मे ते २१ जून)-अनियंत्रित रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांच्या राशीमधील गुरुचे स्थान अनुकूल नाही.त्यामुळे तुम्हाला या समस्येबाबत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची व औषधे बदलून बघण्याची गरज आहे.रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेशी काळजी घ्या.आहाराबाबत पत्थे पाळा.व्यायाम करा व नियमित चालण्यास जा.

कर्क-(२२ जून ते २२ जुलै)-या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा एखादा जूने आजारपण वर येण्याची शक्यता आहे.मात्र जर वेळीच लक्ष दिले तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही.आजारपण मुळापासून बरे करण्यासाठी पर्यायी थेरपी ट्राय करा.इतरांसाठी हा आठवडा आरोग्य स्वास्थाचा असेल.तुम्हाला आठवडाभर आनंदी व उत्साही वाटेल.

सिंह-(२३ जुलै ते २२ ऑगस्ट)-अपचनाची समस्या असलेल्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये.या समस्येवर अॅन्टासिइडच्या गोळ्या घेण्याऐवजी आहारामध्ये फायबरयुक्त भाज्या व तृणधान्यांचा समावेश करा ज्यामुळे ही समस्या आपोआप कमी होईल.उंचीवरुन पडून दुखापत होण्याची शक्यता आहे.त्यामुळे याबाबत दक्ष रहा.

कन्या-(२३ ऑगस्ट ते २२ सप्टेबर)-ग्रहदिशा अनुकूल असल्यामुळे या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील.तुम्हाला आरोग्यबाबत काळजी करण्याची गरज नाही.असे असले तरी काही छोट्या आरोग्य समस्या होण्याची शक्यता आहे मात्र वेळीच लक्ष देऊन व योग्य उपचार करुन त्या ब-या करता येतील

तूळ-(२३ सप्टेबर ते २२ ऑक्टोबर)-या आठवड्यामध्ये तुमच्या राशीमधील ग्रहांची दिशा आरोग्यासाठी अनुकूल आहे.या आठवड्यामध्ये तुम्हाला आरोग्य स्वास्थ लाभेल.कोणतीही गंभीर आरोग्य समस्या उद्भवणार नाही.त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये देखील यश मिळेल.असे असले तरी एखादी छोटी आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक-(२३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर)-या आठवड्यामध्ये अॅसिडीटीची समस्या असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो.आहारामध्ये बदल करा व भरपूर ताज्या पालेभाज्या व तृणधान्ये आहारात समाविष्ट करा.कोमट पाणी पिण्याने चांगला आराम मिळू शकतो.रात्री उशीरा जेवणे व चमचमीत पदार्थ खाणे टाळा.उच्च रक्तदाब असणा-या लोकांनी काळजी घ्यावी.

धनु-(२३ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर)-मधूमेहींच्या रक्तातील साखर कमी अथवा जास्त होण्याची शक्यता असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.डॉक्टरांच्या सूचना पाळा व नियमित चेक-अप करा.इतरांसाठी हा आठवडा आरोग्यदायी असेल.

मकर-(२२ डिसेंबर ते २० जानेवारी)-रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी ताण-तणावापासून दूर रहावे व शांत रहाण्याचा प्रयत्न करावा.नियमित चेक-अप करावे.तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला पाळावा.इतरांचे आरोग्य चांगले राहील.

कुंभ-(२१ जानेवारी ते १८ फेब्रुवारी)-ज्यांना अपचनाची समस्या असेल त्यांना अॅसिडीटीचा त्रास होण्याची शक्यता आहे.तज्ञ डॉक्टरांच्या सल्लानूसार योग्य ती काळजी घ्या.रात्री उशीरा जेवणे टाळा व दोन वेळ भरपूर प्रमाणात जेवण्यापेक्षा ठराविक वेळेनंतर थोडे थोडे अन्न खा.चमचमीत पदार्थ खाऊ नका.

मीन-(१९ फेब्रुवारी ते २० मार्च)-हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्याचा व उत्साहाचा असेल.तुमच्या राशीची ग्रहदिशा अनुकूल आहे.मात्र ज्यांना अपचनाची समस्या आहे त्यांना त्रास होऊ शकतो.त्वरीत आराम मिळण्यासाठी पर्यायी थेरपी घ्या.रात्री उशीरा जेवणे व चमचमीत पदार्थ खाणे टाळा.लहान  स्ट्रेचींग एक्सरसाइजचा देखील फायदा होईल.

GaneshaSpeaks-Logo11


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>