मधूमेहींना आहारात अनेक पथ्यपाणी सांभाळावी लागतात. मधूमेहींना त्यांच्या कॅलरीजच्या गरजेनुसार, आहारात कोणता पदार्थ आणि किती प्रमाणात घ्यावा याकडे काटेकोरपणे लक्ष देणं गरजेचे आहे. सामान्य लोकांच्या मनातही तूप खावं की नाही याबाबत अनेक समज गैरसमज आहेत. तूपामुळे फॅट वाढते, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते असेदेखील अनेकांना वाटते. पण हा केवळ गैरसमज आहे.तुपाचे खाणार.. ते खरचं लठ्ठ होणार ? जाणून घ्या एक्सपर्ट सल्ला! नॅचरोपॅथिक न्युट्रिशनिस्ट ध्वनी शहा यांनी मधूमेहींच्या आहारात तेलापेक्षा तूपाचा वापर करणं कसे फायदेशीर आहे. याबाबत दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
अनेकांना असे वाटते की, स्वादूपिंड (pancreas) मधील पेशींचे नुकसान झाल्याने मधूमेहाचा त्रास बळावतो. पण मधूमेहामुळे केवळ स्वादूपिंडाचे नुकसान होत नाही. यकृताचेही नुकसान होते. यामध्ये अतिरिक्त साखर साठवली जाते. glycogen च्या स्वरूपात साठवलेली साखर ब्लड ग्लुकोज खालावल्यानंतर वापरली जाते.तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ? हे देखील जरुर वाचा.
यकृताचे कार्य खालावले तर ग्लुकोज साठवण्याची क्षमताही कमी होते. यासोबतच डाएजेस्टीव्ह एन्झाईम्स शोषून घेण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे शरीरात अन्नपचनाचीक्षमतादेखील खालावते. तेलामध्ये लॉन्ग चेन फॅटी अॅसिड असतात त्यामुळे अन्न पचायलाही अधिक वेळ लागतो. तसेच त्याचे ब्रेकडाऊन होऊन अॅब्झॉप्शन होण्यासाठी अधिक वेळ लागतो. यामुळे मधूमेहींची नाजूक झालेली शक्ती, अवयवांची क्षमता अधिक बिघडते.
तूप, सुकामेवा, योगर्ट, अंडी यामध्ये आढळणारी नॅचरल फॅट्स मधूमेहींना फायदेशीर आहेत. यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. त्यामुळे मधूमेहींनी तेलाऐवजी तूपामध्ये जेवण बनवणं अधिक फायदेशीर आहे.मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !
- साजूक तूपामुळे कोलेस्टेरॉलवर कसे नियंत्रण राहते ?
मधूमेहींमध्ये कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका अधिक असतो. मधूमेहींमध्ये गुड कोलेस्ट्रेरॉल कमी होतात आणि triglycerides म्हणजेच घातक कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढते. यामुळे मधूमेहींना हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका अधिक असतो. कोलेस्ट्रेरॉलमुळे केवळ फॅट्स साचून राहत नाहीत तर रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम घटक साचून राहण्याचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तप्रवाहाच्या कार्यामध्ये बिघाड होतो.
मधूमेहींच्या आहारात साजूक तूपाचा वापर असल्यास रक्तवाहिन्यांना ल्युब्रिकंट मिळते तसेच रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारते. तेलाऐवजी तूपाचा वापर केल्याने अनेक रुग्णांची कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात आल्याचे ध्वनी सांगते.
- तूपाचे प्रमाण किती असावे ?
तूपाचा वापर आरोग्यदायी असला तरीही त्याचा आहारात समावेश करताना प्रमाणाकडेही लक्ष द्यावे. तूपाचा अतिवापर करू नका. प्रत्येक जेवणात 1 टीस्पून तूप पुरेसे आहे. डाळींमध्ये तूप अधिक फायदेशीर आहे. मग जाणून घ्या घरगुती साजूक तूपाची खास रेसिपी !
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock