मी ३० वर्षांची महिला आहे. प्रत्येक वेळेस मासिक पाळीच्या काळात मला ओव्हुलेशन क्रम्प्स येतात. मी हे माझ्या काही मैत्रिणींना सांगितले. पण कोणालाच असा त्रास होत नाही. यात काही काळजी करण्याचे कारण आहे का ? हा आरोग्याच्या समस्येचा संकेत आहे का ? यासाठी मला डॉक्टरांची भेट घेण्याची गरज आहे का ? कृपया यासंदर्भात माहीती द्यावी.
या प्रश्नाचे उत्तर गोरेगांवच्या वेल वूमन क्लिनिकच्या Gynaecologist आणि obstetrician डॉ. नुपूर गुप्ता यांनी दिले.
ओव्हुलेशन क्रम्प्स हे मासिक पाळीत येणारे क्रम्प्स सारखे सामान्य असतात. परंतु, प्रत्येक स्त्री ला हा अनुभव येत नाही. ज्यांना पोटाच्या एका बाजूला खूप किंवा कमी दुखते त्यांना ओव्हुलेशन क्रम्प्स जाणवतात. म्हणून जर तुम्हाला एका महिन्यात पेल्विक भागाच्या उजव्या बाजूला आणि दुसऱ्या महिन्यात डाव्या बाजूला दुखत असेल तर हे ओव्हरीवर अवलंबून आहे. म्हणजे ज्या ओव्हरीतून अंड्याची निर्मिती होते, त्याठिकाणी दुखू लागते. ovulation cramps चा त्रास म्हणजे नेमके काय ?
परंतु. ओव्हुलेशन ही काही गंभीर समस्या नसून ती प्रक्रीया काही मिनिटं ते काही तासांपुरती मर्यादीत असते. काही वेळा थोडं ब्लीडींग आणि त्रास जाणवतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याला तुम्हाला थोडं ब्लीडींग किंवा क्रम्प्स जाणवतील. परंतु, यात काळजी करण्याचे काही कारण नाही. ओव्हूलेशन शिवाय मासिक पाळी येऊ शकते का ?
ओव्हुलेशन क्रम्प्स हे आपोआप कमी होतात किंवा प्रत्येक महिन्याला जाणवतात. जर तुम्हाला खूपच त्रास होत असेल तर पेनकिलर्स घेतल्याने त्रास कमी होण्यास मदत होईल. परंतु. औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका.
तसंच जर तुम्ही इतर कोणती औषधे घेत असाल तर डॉक्टरांना त्याबद्दल सांगा. काही वेळा ओव्हुलेशन कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या देखील दिल्या जातात. त्यामुळे ओव्हुलेशन क्रम्प्सला आळा बसतो. ओव्हूलेशन कीटमुळे गर्भधारणेचा निश्चित काळ ओळखता येतो का?
जर तुम्हाला त्यासाठी औषधं घेणे योग्य वाटत नसेल तर तुम्ही ओव्हुलेशन क्रम्प्स साठी घरगुती उपाय देखील करू शकता. गरम पाण्याची पिशवी किंवा हॉट बॅगने तुम्ही शेक देऊ शकता. अथवा दुखणं कमी करण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ केल्यास फायदा होईल. ओव्हुलेशन क्रम्प्स हे अगदी सामान्य आहेत आणि त्यातून कोणत्याही आरोग्याच्या समस्येचा संकेत मिळत नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता नाही. परंतु, तुम्हाला काही समस्या जाणवली किंवा खूप त्रास वा दुखत असेल तर स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. ovulation ही 6 लक्षणं तुम्हांला बाळाचं यशस्वी प्लॅनिंंग करायला मदत करतील !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock