Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Erectile Dysfunction च्या समस्येवर 6 उपाय !

$
0
0

Erectile Dysfunction किंवा सेक्स दरम्यान इरेक्शन रोखून ठेवता न येणे हे निराशाजनक असू शकते.या समस्येमुळे जोडीदारासोबत असलेल्या नातेसंबधांमध्ये ताण-तणाव  निर्माण होऊ शकतो.मात्र ही समस्या ब-याचदा उपचार करुन बरी होऊ शकते.तसेच Erectile Dysfunction समस्येवर मात करण्यासाठी व लिबीडो वाढवण्यासाठी या १० सूपरफुड्स चा आहारामध्ये जरुर समावेश करा.

मुंबईच्या झेन हॉस्पिटलचे Urologist डॉ.संतोष पालकर यांच्यामते ब-याचदा या समस्येमागे सेक्स दरम्यान असणारी चिंता-काळजी अथवा सेक्सबाबत स्वत:कडून असणा-या काल्पनिक अपेक्षा अशा मानसिक कारणे असतात.किंवा कधीकधी एखाद्याला असणा-या मधूमेह अथवा उच्च रक्तदाब अशा आरोग्य समस्येमुळे देखील ही समस्या निर्माण होऊ शकते.ब-याचदा औषधोपचार करुन ही समस्या बरी करता येते.पण जर या औषधोपचारांचा काहीच फायदा झाला नाही तर यावर इतर काही उपचार उपलब्ध आहेत ज्यामुळे रुग्णाला आराम मिळू शकतो.

यासाठी जाणून घेऊयात Erectile Dysfunction या समस्येवर उपलब्ध असलेल्या उपचार पद्धती-

१.तोंडावाटे घेण्यात येणारी औषधे-   Erectile Dysfunction या समस्येवर तोंडावाटे घेण्यात येणारी औषधे देण्यात येतात.यासाठी ही समस्या असलेल्या रुग्णाला Sildenafil, Tadalafil, Vardenafil, Avanafil ही काही औषधे घेण्याचा सल्ला देण्यात येतो.ज्यामुळे त्या रुग्णाच्या पेनिसमधील रक्तप्रवाह सुधारतो व त्या भागातील स्नायू शिथिल होतात.पेनिसमधील रक्तप्रवाह सुधारल्यामुळे त्या व्यक्तीचे इरेक्शन चांगल्या पद्धतीने होते व त्याला  सेक्सचा आनंद घेता येतो.या औषधांचा डोस किती प्रमाणात घ्यावा हे तुमचे डॉक्टर तुमच्या समस्येची गंभीरता पाहून ठरवतात.ही औषधे सेक्स करण्यापूर्वी १५ ते ३० मिनीटे आधी घेण्यात येतात.मात्र जर एखाद्याला ह्रदय विकार अथवा प्रोस्टेटची समस्या असेल तर त्या व्यक्तीला ही औषधे न घेण्याचा सल्ला देण्यात येतो.कारण ह्रदयविकार अथवा प्रोस्टेट समस्या असलेल्या रुग्णांच्या औषधामध्ये Nitric oxide किंवा Alpha blockers हे घटक असतात ज्यांचा Erectile Dysfunction समस्येवर घेणा-या येणा-या औषधांवर दुष्परिणाम होऊन रुग्णाचा रक्तदाब कमी होऊ शकतो.याच कारणामुळे मधूमेहकमी रक्तदाबाची समस्या असलेल्या रुग्णांना देखील Erectile Dysfunction समस्येवर देण्यात येणारी औषधे न घेण्याचा सल्ला देण्यात येतो.Erectile Dysfunction या समस्येवर घेण्यात येणा-या औषधांमुळे मळमळ,डोकेदुखी व नाक चोंदणे असे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात.यासाठी जाणून घ्या वयोमानानूसार पुरुषांमध्ये कोणत्या 4 आजारांचा धोका वाढतो !

२.काउंसलिंग-जर एखाद्याच्या Erectile Dysfunction या समस्येमागे चिंता,काळजी,ताण-तणाव अथवा वैवाहिक समस्या कारणीभूत असतील तर त्याबाबत योग्य समुपदेशन केल्याने देखील ही समस्या कमी होऊ शकते.ब-याचदा यावर कपल थेरपी देणे फायदेशीर ठरते.तरुण पुरुषांना सेक्सचा कमी अनुभव असल्यामुळे चिंतेमुळे ही समस्या निर्माण होऊ शकते.

३.व्यायाम-आठवड्यातून तीनदा ब्रीस्क वॉक,स्विमिंग व ३० मिनीटे कार्डिओ केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते व पेनिसला पुरेश्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा होतो.रक्ताभिरण सुधारल्यामुळे सेक्स दरम्यान लैगिंक अवयवांना योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा होतो ज्यामुळे पुरुषांना इरेक्शन दीर्घकाळ रोखून धरणे सोपे जाते.त्यामुळे काऊंसलिंगमुळे एखाद्याचे सेक्शुअल लाईफ नक्कीच सुधारता येऊ शकते.

४.इंजेक्शन-वरील उपाय करुन कोणताच फायदा झाला नाही तर इंजेक्शन देऊन या समस्येला बरे करता येऊ शकते.या इंजेक्शनला Papaverine Injections असे म्हणतात.जो Vasodilator चा एक प्रकार अाहे.ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात.इरेक्शन सुधारण्यासाठी हे इंजेक्शन त्या पुरुषांच्या थेट पेनिसमध्ये देण्यात येते.या इंजेक्शनमुळे सौम्य रक्तस्त्राव,बराच काळ इरेक्शन रोखले जाणे असे दुष्परिणाम होऊ शकतात.कधीकधी तर चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्यामुळे त्या पुरुषांच्या पेनिसमध्ये कायमस्वरुपी बिघाड देखील होऊ शकतो.दुस-या प्रकारच्या इंजेक्शनला Prostaglandin Injections असे म्हणतात.ज्यामध्ये पेनिसमधील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी एक लहान Alprostadil Suppository त्या रुग्णाच्या Penile Urethra मध्ये इनसर्ट करण्यात येते.या इंजेक्शनचे दुष्परिणाम देखील Papaverine Injections प्रमाणेच असतात.

५.पेनिस पंप-Erectile Dysfunction या समस्येवर बाजारामध्ये पेनिस पंप नावाचे एक साधन उपलब्ध आहे.या उपकरणाचा आकार एखाद्या पोकळ नळीसारखा असून ते हाताने किंवा बॅटरीवर चालवता येते.त्या नळीमध्ये पेनिस घेऊन पंपाच्या सहाय्याने आतील हवा शोषून बाहेर काढण्यात येते.हवेच्या पोकळीमुळे पेनिसमधील रक्तप्रवाह वाढतो व इरेक्शन रोखता येते.इरेक्शन झाल्यावर टेन्शन रिंगच्या सहाय्याने काही काळ पेनिसचा आकार तसाच ठेवता येतो.मात्र या उपकरणामुळे Bruising हा दुष्परिणाम होऊ शकतो.

६.Penile implants किंवा प्रत्यारोपण-अर्थातच हा अगदी शेवटचा उपाय असतो.जेव्हा या समस्येवर इतर कोणत्याही उपायाने फरक पडत नाही तेव्हा त्या व्यक्तीला प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात येतो.त्यामुळे अगदी थोड्याच पुरुषांवर हे उपचार करण्यात येतात.ही एक शस्त्रक्रियेची प्रक्रिया असून ज्यामध्ये पेनिसच्या दोन्ही बाजूने इनफ्लॅटेबल किंवा बेन्डेबल रॉड इनसर्ट करण्यात येतात ज्यामुळे इरेक्शन दीर्घकाळ रोखता येऊ शकते.अनफ्लॅटेबल रॉडमुळे इरेक्शन रोखता येते व बेन्डेबल रॉडमुळे सेक्स करेपर्यंत पेनिसचा आकार तसाच रहाण्यास मदत होते.मात्र ही प्रक्रिया रुग्णाने स्वत:च्या जोखमीवर करावी.तसेच Erectile Dysfunction (ED) बाबतचे हे ’7′ समज गैरसमज आजच दूर करा !

 

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>