Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्रवासादरम्यान मुलांना होणारा मळमळण्याचा त्रास कसा आटोक्यात ठेवाल ?

$
0
0

Motion Sickness ही प्रवासा दरम्यान होणारी एक समस्या आहे.ज्या समस्येमध्ये प्रवास करताना होणा-या हालचालीमुळे उलटी,मळमळ किंवा चक्कर येते.जर तुमच्या मुलाांना मोशन सिकनेसची समस्या असेल तर तुमचा प्रवास नक्कीच त्रासदाक होऊ शकतो.यासाठी लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करताना त्यांना त्रास कमी व्हावा यासाठी या टीप्स जरुर करा.

१.तुमच्या बॅगेत नेहमी Anti-emetic असू द्या-यासाठी तुमच्या Pediatrician (लहान मुलांचे डॉक्टर )  च्या सल्लानूसार बाळासाठी योग्य असे Anti-emetic घ्या व ते नेहमी तुमच्या बॅगेत ठेवा.लांब पल्ल्याचा प्रवास करताना तुमचे मुल उलटी करेल असे वाटत असेल तर त्याला सुरुवातीलाच २० मिनीटे आधी Anti-emetic द्या.

२.मुलांच्या खाण्या-पिण्याकडे नीट लक्ष द्या-काही अन्नपदार्थ खाल्लामुळे तुमच्या मुलांना उलटी होऊ शकते.यासाठी मुलांना प्रवासामध्ये दूध,द्रवपदार्थ,गोड पदार्थ व चिकट पदार्थ देणे टाळा.प्रवासाच्या दिवशी मुलांना साधे,कोरडे व घनस्वरुपातील पदार्थच खाण्यास द्या.तसेच प्रवासाला सुरुवात करताना कमीतकमी अर्धा तास आधी त्यांना भरवा.कार प्रवासात खाण्यासाठी कोरडे पदार्थ घेणेच योग्य ठरेल.तसेच वाचा रोड ट्रीप च्या प्रवासामध्ये आरोग्यदायी जेवणाची निवड कशी कराल ?

३.एक्स्ट्रा कपडे जवळच ठेवा-ब-याचदा प्रवासामध्ये आपण बाळासाठी एक्स्ट्रा कपडे सोबत घेतोच पण त्याचसोबत स्वत:साठी देखील काही कपडे जरुर घ्या.कारण प्रवासादरम्यान तुमचे मुल कदाचित तुमच्या अंगावरच उलटी करु शकते.त्यामुळे तुमच्यासाठी व तुमच्या बाळासाठी दोघांसाठी कपडे सोबत घेणे फायदेशीर ठरते.

४.उलटीसाठी डिस्पोजेबल प्लॅस्टिक बॅग सोबत ठेवा-मुले जेव्हा प्रवासात उलटी करतात तेव्हा त्या वासाने तुम्हाला देखील त्रास होऊ शकतो.त्या वासाने मुलांनाही पुन्हा पुन्हा मळमळल्या सारखे वाटत रहाते.यासाठी प्रवासात प्लॅस्टिकच्या डिस्पोजेबल बॅग सोबत ठेवा.बाळाने उलटी केल्यावर त्या बॅग तुम्हाला कच-याच्या डब्ब्यामध्ये फेकता येतील व बाळाच्या उलटीचा वास देखील कमी येईल.तसेच  या ’5′ मार्गाने मुलांना कचरा रिसायकल करायला शिकवा !

५.दर अर्ध्या तासाने गाडी थांबवा-सतत कारमध्ये बसल्यामुळे तुमच्या मुलांना मळमळ होऊ शकते.यासाठी दर अर्धा तास ते पाऊण तासामध्ये काही वेळासाठी गाडी एका ठिकाणी थांबवा.यामुळे तुमच्या प्रवासामध्ये व्यत्यय येऊ शकतो पण या उपायामुळे तुमचे बाळ उलटी नक्कीच करणार नाही.गाडी थांबवून थोडावेळ गाडीबाहेर चाला.तसेच गाडी सुरु असताना खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे देखील बाळाला बरे वाटू शकते.

६.प्रवासाची वेळ ठरवा-कारमधून प्रवास करताना वेळ फार महत्वाची ठरते.जर दूरचा प्रवास करणार असाल तर तो रात्रीच्या वेळी केला तर त्यावेळी तुमचे बाळ झोपू शकते त्यामुळे त्याला कमी त्रास होऊ शकतो.किंवा जर तुम्ही संध्याकाळी प्रवास करणार असाल तर बाळाला दुपारी झोपवू नका जेणेकरुन ते प्रवासामध्ये झोपी जाईल.

जर तुम्हाला देखील प्रवासादरम्यान मुलांना होणा-या मोशन सिकनेसला कसे हाताळावे याबाबत काही टीप्स माहित असतील तर त्या आमच्यासोबत जरुर शेअर करा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>