आपल्या शरीरात गुड आणि बॅड असे दोन्ही प्रकारचे बॅक्टरीया असतात, याची माहिती तुम्हाला असेल. गुड बॅक्टरीयांची मदत अन्नपचनास होते. तसेच बॅड बॅक्टरीयांमुळे होणारे आजार, इन्फेकशन यापासून संरक्षण होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि संपूर्ण आरोग्य सुधारते. नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, गट फ्लोरा आणि गट बॅक्टरीया यांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समुळे काही आजार होऊ शकतात.
एखाद्या व्यक्तीमध्ये एका विशिष्ट्य प्रकारचे बॅक्टरीया खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाणात असू शकतात. केयर २४ च्या चीफ न्यूट्रिशन अॅडव्हायजर आणि डाएट कंन्सल्टंट Akansha Jhalani यांनी पोटातील बॅक्टरीया विविध आजारांना कसे कारणीभूत ठरतात, याबद्दल मार्गदर्शन केले.
- स्थूलता आणि मधुमेह: पोटातील बॅक्टरीयांवर तुमचे मेटॅबॉलिझम अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये बॅक्टरीयांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन असते आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचे मेटॅबॉलिझम वेगळे असते. अन्नातून किती प्रमाणात कॅलरीज आणि पोषकतत्त्व घ्यायची हे पोटातील बॅक्टरीयांवर अवलंबून असते. आतड्यांमधील बॅक्टरीयांचे अधिक प्रमाणामुळे फायबरचे फॅटी अॅसिडमध्ये रूपांतर होते आणि नंतर ते फॅट्सच्या स्वरूपात लिव्हरमध्ये साठून राहतात. यामुळे ‘metabolic syndrome’ होऊन परिणामी टाईप 2 डाएबिटीस आणि स्थूलता या समस्या उद्भवतात. अभ्यासानुसार Firmicutes या बॅक्टरीयांमुळे स्थूलता येते. तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
- कोलन कॅन्सर: पोटातील एका विशिष्ट प्रकारच्या बॅक्टरीयांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यास कोलन कॅन्सर होतो. आतड्यांंचा कॅन्सर – कोणत्या टप्प्यात त्याची गंभीरता किती ?
- डिप्रेशन: पोटातील बॅक्टरीया आणि मेंदू यांना जोडणाऱ्या नर्व्हस असतात. त्यामुळे बॅक्टरीया मेंदूशी संवाद साधू शकतात. नर्व्हस सिस्टीम संबंधित आजारांचा पोटातील बॅक्टरीयांशी संबंध असतो. त्यामुळे पोटातील बॅक्टरीयांमुळे डिप्रेशन, काळजी यांसारख्या समस्या होऊ शकतात. ताण तणाव सांभाळून डीप्रेशनवर मात करण्यासाठी खास टीप्स !
- आर्थ्राइटिस: ज्यांना आर्थ्राइटिसचा त्रास असतो, त्यांच्यामध्ये इन्फ्लाम्मेशनला कारणीभूत ठरणारे गट बॅक्टरीया असतात. या ५ गोष्टींमुळे भविष्यात तरुणांनाही आर्थ्राटीसचा धोका वाढू शकतो.
- लहान मुलांमधील पोटदुखी: अॅबनॉर्मल गट फ्लोरा मुळे लहान मुलांमध्ये पोटदुखीची समस्या उद्भवते. proteobacteria या बॅक्टरीयांमुळे मुलांच्या पोटात गॅस होतो. त्यामुळे मुलांचे पोट दुखू लागते. परिणामी मुलं रडतात, चिडचिड करतात. परंतु, proteobacteria चे आयुष्य तात्पुरते असते. त्यामुळे लहान मुलांमधील पोटदुखीचा त्रास काही महिन्यात दूर होतो. हिंग – लहान मुलांमधील पोटदुखी दूर करण्याचा रामबाण उपाय !
पोटातील बॅक्टरीयांचे प्रमाण नीट राखण्यासाठी काही टीप्स:
पोटातील बॅक्टरीयांचे प्रमाण नीट राखण्यासाठी आहारात फायबरयुक्त फळे, भाज्या यांचा समावेश करा. त्यामुळे आजारांची शक्यता देखील कमी होते. पोटातील बॅक्टरीयांचे प्रमाण वाढवण्यासाठी व्यायामाची देखील मदत होते. आतडे आणि कोलन मधील गट फ्लोरा सामान्य स्थितीला राहण्यासाठी तुम्ही प्रोबायोटिक्स देखील घेऊ शकता. प्रत्येकाचे गट बॅक्टरीयांचे प्रमाण, कॉम्बिनेशन वेगळे असते. म्हणून प्रत्येकाने आपल्या शरीराच्या स्वरूपाचा विचार करून आहार घ्यावा. ज्यामुळे गट फ्लोराचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढेल किंवा कमी होईल. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी या ‘५’ गोष्टी अवश्य करा !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock