Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

साखरेऐवजी शुगर फ्री वापरणं खरंच आरोग्यदायी पर्याय आहे का ?

$
0
0

अनेकांना नियमित जेवणासोबत काही गोडाचा पदार्थदेखील हवा असतो. पण मधूमेहींना असे नियमित गोड खाणं शक्य नसते. अशावेळेस शुगर फ्रीची निवड केली जाते. पण मग अशा शुगर फ्री टॅबलेटसची निवड फक्त मधूमेहींनी करावी की मधूमेहाचा त्रास नसलेलेदेखील शुगर फ्री टॅबलेट्स घेऊ शकतात.तुमच्या मनातील याच प्रश्नाबद्दल Wockhardt Hospitals चे Head of Medicine, Dr Behram S. Pardiwalla यांनी सुचवलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

Dr Pardiwalla, च्या सल्ल्यानुसार, मधूमेहाचा त्रास नसलेले  देखील सहाजिकच शुगर फ्री चा पर्याय अगदी सहज निवडू शकतात. वेटलॉसच्या मिशनवर असणारे किंवा घटवलेले वजन आटोक्यात ठेवणारी अनेक मंडळी शुगर फ्रीचा पर्याय निवडतात. आहारातून साखरेचे प्रमाण कमी केल्यानंतर सहाजिकच कॅलरी शरीरात जाण्याचे प्रमाण कमी होते. शरीरात जितकी अनावश्यक कॅलरी जाईल तितके वजन वाढण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे मधूमेहाचा त्रास नसणारेदेखील साखरेला पर्याय म्हणून शुगर फ्री पर्यायांची निवड करू शकतात. पण अति तेथे माती हा नियम इथेदेखील लागूच पडतो. शुगर फ्री हा साखरेला पर्याय असला तरीही त्याचे अतिसेवन टाळा. कारण शुगर फ्री पर्यायांचादेखील आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

शुगर फ्री टॅबलेट्स किंवा पावडरचा अतिवापर करू नका. कारण हे पर्याय अति गोड असतात. कपभर चहासाठीदेखील एक गोळी पुरेशी असते. पण तुम्हांला खूप गोड चवीची सवय आहे म्हणून  4-5 गोळ्या घेत असाल तर ते आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. जर तुम्ही 5-6 कप चहा, कॉफी घेत असाल आणि त्यामध्ये प्रत्येकी 5 शुगर फ्री टॅबलेट्स मिसळत असाल तर हे शरीरासाठी धोकादायक आहे.

  •  शुगर फ्री च्या टॅबलेट्स मधूमेहींनीदेखील प्रमाणात घ्याव्यात का ?  

मधूमेहींसाठी शुगर फ्री पर्याय निवडणं फायदेशीर आहे. काही मधूमेहींना गोडाच्या चवीची गरज असते तर काहींना ती चव नसली तरीही चालते. त्यामुळे शुगर फ्री टॅबलेट्सची निवड किती प्रमाणात करावी हे तुम्हांला आवश्यक वाटणार्‍या चवीवरही अवलंबून असते. पण मधूमेहींनीदेखील अतिप्रमाणात शुगर फ्रीची निवड करणं त्रासदायकचं आहे. अति प्रमाणात शुगर फ्री खाणं हे यकृताचं कार्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते. यासोबतच शुगर फ्री पर्यायांचा वापर करून बनवला जाणारा डाएट सोडा मधूमेहींसाठी त्रासदायक आहे. डाएट सोड्याच्या अतिसेवनादेखील इन्सुलिनच्या पातळीमध्ये चढ उतार होतात. तसेच रक्तदाबाचे प्रमाणही अनियंत्रित होऊ शकते. म्हणूनच मधूमेहींनीदेखील साखरेला पर्याय म्हणून शुगर फ्री पावडर, टॅबलेट्स किंवा ड्रॉप्सचा पर्याय निवडत असाल तर पुरेशी काळजी घेणं गरजेचे आहे. त्याचा पदार्थांमध्ये अतिप्रमाणात वापर करू नका.

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>