मी ३० वर्षांची महिला आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णांपासून लांब राहावे, असे मी कुठेतरी वाचले आहे. परंतु, मी क्षयरोग झालेल्या व्यक्तीला किस केले. किस करण्यापूर्वी त्या व्यक्तीला क्षयरोग असल्याचे मला ठाऊक नव्हते. मी असे ऐकले आहे की हा संसर्गजन्य रोग आहे. मग किस केल्याने क्षयरोग पसरू शकतो? मला खूप काळजी वाटत आहे. कृपया उत्तर देऊन मला मदत करा.
या प्रश्नाचे उत्तर मुलुंड आणि कल्याणच्या फोर्टीज हॉस्पिटलचे Infectious Disease Physician, डॉ. कीर्ती सबनीस यांनी दिले.
क्षयरोगाबद्दल वाटणारी ही अतिशय सामान्य शंका आहे. परंतु, क्षयरोग हा लैंगिक संबंधातून होणारा रोग नाही. त्याचा पसार लैंगिक संबंधातून होत नाही. तसंच क्षयरोगाचे बॅक्टरीया किस केल्याने किंवा स्पर्शाने पसरत नाहीत. तसंच लोकांचा असा समज असतो की, क्षयरोगाचा संसर्ग पाणी आणि अन्नातून होतो. परंतु, हे खरे नाही. त्याचबरोबर एकच टॉयलेट वापरल्याने किंवा अगदी टूथब्रश शेयर केल्याने देखील क्षयरोग होत नाही. परंतु, तरी देखील तुम्हाला शंका असल्यास डॉक्टरांना भेट द्या आणि क्षयरोगाची तपासणी करून घ्या. वेळीच जाणा क्षयरोगाची लक्षणं !
- मला क्षयरोगाचा धोका आहे का ?
क्षयरोग हा गंभीर आणि संसर्गजन्य रोग आहे. हा रोग ‘Mycobacterium Tuberculosis’ या बॅक्टरीयममुळे होतो. या बॅक्टरीयाचा परिणाम फुफ्फुसांवर होतो. तसंच मेंदू, स्नायू आणि इतर अवयवांवर होतो. क्षयरोग – एक गंभीर मात्र आटोक्यात येणारा आजार !
क्षयरोगाचा पसार हा हवेच्या माध्यमातून होतो. म्हणून जर क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने खोकलेल्या हवेत श्वास घेतल्यास क्षयरोगाचा संसर्ग होऊ शकतो. तसंच क्षयरोग झालेल्या व्यक्तीशी जवळून संबंध आल्यास इन्फेकशन पसरण्याचा धोका असतो. जर क्षयरोग झालेली व्यक्ती आणि तुम्ही एकाच घरात रहात असाल तर तुम्हाला देखील क्षयरोग होऊ शकतो. डॉट उपचार प्रणाली व क्षयरोग बरा करण्यासाठी ५ मूलभूत उपाय
या रोगाचे इन्फेकशन लहान मुलांना म्हणजेच चार वर्षांपेक्षा लहान असलेल्यांना अगदी लगेच होऊ शकते. कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या प्रौढांना देखील इन्फेकशनचा धोका असतो. जर तुम्हाला एचआयव्ही असेल किंवा मधुमेह, chronic renal failure यांसारखा इतर कोणता आजार असल्यास क्षयरोगाच्या इन्फेकशनचा धोका अधिक वाढतो. कशी वाढवाल तुमची रोगप्रतिकारशक्ती ?
म्हणून, जर क्षयरोग असलेल्या व्यक्तीशी जवळचा संबंध आल्यास आणि तुम्हाला क्षयरोगाची लक्षणे जाणवू लागल्यास वेळीच तपासण्या करणे योग्य ठरेल. क्षयरोगाचा धोका कमी करण्यासाठी या ’10′ गोष्टी वेळीच जाणून घ्या !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock