Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Hypothyroidism नियंत्रित करण्यासाठी आयुर्वेद व योगाची कशी मदत होते?

$
0
0

Hypothyroidism या समस्येमुळे तुमची दिवसाची सुरुवातच प्रचंड निरुत्साही व थकल्यासारखी होऊ शकते.Hypothyroidism या स्थितीमध्ये निरुत्साही वाटणे,विस्मरण होणे,वजन वाढणे व सर्दीला प्रतिकार करण्याची क्षमता कमी होणे या समस्या देखील होऊ शकतात.या सर्व गोष्टींमागे तुमच्या थायरॉईड ग्रंथीचे बिघडलेले कार्य कारणाभूत असते.

Hypothyroidism या समस्येबाबत आयुर्वेदिक दृष्टीकोन काय आहे?

Allayurveda.com (world’s first natural wellness platform)च्या आयुर्वेदिक तज्ञ शिवांगी चॅटर्जी यांच्यामते आयुर्वेद शास्त्राचा या समस्येकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा ही समस्येमधील त्रास कमी करणे हा असतो.जेव्हा एखाद्याला Hypothyroidism ही समस्या होते तेव्हा प्रथम त्याला सर्दीची समस्या निर्माण होते.तसेच पचनशक्ती मंदावणे,निराश वाटणे व शरीरात टॉक्सिन्स जमा झाल्यामुळे जडपणा वाटणे ही लक्षणे देखील आढळतात.

डॉ.शिवांगी यांच्यामते या विकारामुळे एखाद्याला सर्दी,थकवा,जडपणा येणे,निरुत्साही व निराश वाटू शकते.या सर्व समस्या कफ दोषामुळे होतात.सहाजिकच तुमच्या थायरॉईड ग्रंथीला पूर्ववत करण्यासाठी तुम्हाला हलके,उष्ण,उत्साही व कोरडे वाटणे गरजेचे असते.

यासाठी तज्ञांच्या मते जाणून घेऊयात Hypothyroidism या समस्येला नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते मार्ग फायदेशीर ठरतील.पण त्या आधी जाणून घ्या थायरॉईडच्या पातळीमध्ये असतुंलन निर्माण होण्याची १० कारणे

आयुर्वेद शास्त्रानूसार Hypothyroidism या समस्येवर कोणाता आहार घ्यावा?

  • दूधाचे पदार्थ-दूध व चीज व पनीर सारखे दूधाचे पदार्थ थायरॉइड समस्येवर फायदेशीर ठरतात.यासाठी वाचा Hypothyroidism नियंत्रणात ठेवण्यासाठी 9 डाएट टीप्स !
  • हेल्दी फॅट-हेल्दी फॅट हे हॉर्मोन्सच्या निर्मितीचे प्रमुख घटक आहेत.नारळाचे तेल,तूप,फ्लॅक्स सीड्स ऑइल व फीश ऑइल हे हेल्दी फॅट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत.
  • ग्लायसेमिक कमी असलेले पदार्थ-ग्लायसेमिक कमी असलेली तृणधान्ये,डाळी व राजमा यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असून त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.
  • गरम मसाले-काळीमिरी,आले व हळद यासारख्या मसाल्याच्या पदार्थांचा आहारात व हर्बल टीमधून वापर केल्यामुळे तुमचे रक्ताभिरसण सुधारते व हार्ट रेट नियंत्रित रहातो.
  • कोणते पदार्थ खाणे टाळावे-आबंट व जड पदार्थ खाणे टाळा.तसेच ब्रोकोली,फ्लॉवर,कोबी,सलगम,Brussels sprouts यारख्या भाज्या Hyperthyroidism  या समस्येवर फायदेशीर ठरतात.या पदार्थांमुळे थायरॉईडचे कार्य कमी होते त्यामुळे थायरॉईड निष्क्रिय असलेल्या लोकांनी हे पदार्थ खाणे टाळावे.यासाठी जाणून घ्या Hyperthyroidism व Hypothyroidism मध्ये नेमका काय फरक आहे ?

Hypothyroidism या समस्येसाठी कोणती योगासने करावीत?

  • योग व प्राणायम-योग व प्राणायमामधील विश्रांती तंत्र तुम्हाला ताण-तणाव कमी करण्यासाठी व थायरॉईडचे कार्य वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते.
  • योगासने-सर्वांगासन रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व थायरॉईड ग्रंथींमधील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी फायदेशीर ठरते.तसेच मत्स्यासन व हलासनामुळे देखील थायरॉईड ग्रंथीवर पुरेसा योग्य ताण येतो.उष्ट्रासन व बिटीलासन करणे देखील थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी फायदेशीर आहे.
  • प्राणायम-उज्जायी प्राणायमचा सराव केल्याने रक्ताला पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो व थायरॉईड ग्रंथींच्या कार्याला चालना मिळते.तसेच यासाठी तुम्ही भ्रामरी,कपालभाती व भ्रस्रिका प्राणायमाचा देखील सराव करु शकता.यासाठी वाचा वात, कफ, पित्त दोषांना शमवण्यासाठी कसा कराल योगाभ्यास ?

Hypothyroidism या समस्येसाठी कोणती आयुर्वेदिक औषधे परिणामकारक ठरतात?

  • Punarnava-या औषधामुळे मेटाबॉलिजम सुधारल्यामुळे पचन चांगले होते.कफदोष कमी होतो त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी कमी झाल्यामुळे वजन कमी होते.
  • Vacha-मन मन प्रसन्न ठेवण्यासाठी हे टॉनिक आहे.या औषधामुळे जडपणा व उदासिनता कमी होते.
  • Trikatu-यामुळे पाचक अग्नीला चालना मिळते.मेटाबॉलिजम सुधारण्यासाठी एक चिमुट औषध जेवणाआधी घ्यावे.तसेच वाचा आयुर्वेदिक च्यवनप्राशाने दूर ठेवा या ’6′ समस्या !
  • Brahmi-ब्राम्ही मुळे देखील मनाची उदासिनता कमी होऊन उत्साह निर्माण होण्यास मदत होते.
  • Lemongrass-या औषधामुळे देखील पचन सुधारते व मेटाबॉलिजम वाढते.यायाठी वाचा थायरॉईडचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील हे ’5′ आयुर्वेदीक उपाय !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>