Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

केसगळतीचे ’7′प्रकार !

$
0
0

तुमचे केस गळत आहेत का? असे असेल तर सर्वात आधी तुमच्या केसांच्या वाढीबाबत या मुलभूत गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे.साधारणपणे प्रत्येकाच्या स्कॅल्पवर एकूण एक ते दीड लाख केस असतात.निरोगी केसांचे जीवन चक्र साधारणपणे २ ते ३ वर्ष टिकते.प्रत्येक वेळी एकूण केसांच्या ९० टक्के केस हे वाढीच्या टप्प्यात असतात तर  १० टक्के केस हे रेस्टींग फेजमध्ये असतात.दोन ते तीन महिन्यांनी रेस्टींग हेअर गळून जातात व त्याजागी नवीन केस उगवतात.त्यामुळे दररोज काही प्रमाणामध्ये केस गळणे हे अगदी सामान्य आहे.साधारणपणे दररोज तुमचे सरासरी १०० केस गळू शकतात.पण काही लोकांना कधीकधी या प्रमाणापेक्षा अधिक  केस गळण्याचा अनुभव येतो.असे अर्धे अधिक किंवा संपूर्ण केस गळणे याला टक्कल पडणे अथवा Alopecia असे म्हणतात.यासाठी केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा

 पाहूयात केसगळतीचे हे काही प्रकार-

Involutional Alopecia -

वाढत्या वयोमानानूसार तुमचे केसही गळू लागतात.या प्रकारामध्ये केसांची जाडी व व्हॉल्युम कमी होतो.या केस गळण्याच्या प्रकाराला Involutional Alopecia  असे म्हणतात.ज्यामध्ये हेअर फॉलिकल्स हळूहळू रेस्टींग फेज मध्ये जातात.त्यामुळे उरलेल्या केसांची संख्या कमी होते,केसाची उंची कमी होते व कधीकधी असे केस ठिसूळ देखील होतात.

Telogen effluvium

बाळंतपण,ताप,गंभीर आजारपण,ताण-तणाव अथवा अचानक वजन कमी होणे यामुळे काही आठवडे अथवा महिन्यांसाठी केस अचानक तात्पुरते गळू लागतात व काही महिन्यांनंतर हे प्रमाण हळूहळू कमी होते.या केसगळती च्या प्रकाराला Telogen effluvium असे म्हणतात.केसांच्या वाढीच्या चक्रात बदल झाल्यामुळे असे घडते.ज्यामुळे मोठ्या संख्येमध्ये केस एकाच वेळी रेस्टींग फेजमध्ये जातात.

Male and female pattern baldness

पुरुषांमध्ये जेव्हा केसांचे प्रमाण कमी होऊन त्यांच्या डोक्यावर टक्कल पडते तेव्हा त्यांना केसगळतीची Androgenic alopecia ही समस्या झालेली असते.ज्या समस्येला Male Pattern Baldness असेही म्हणतात.या समस्येमुळे कधीकधी तुम्हाला अगदी वयाच्या विशीमध्ये अथवा टीनएजमध्ये देखील टक्कल पडू शकते.या प्रकारामध्ये मुख्यत: डोक्याच्या वरच्या भागापासून केस गळण्यास सुरुवात होते.मागील बाजूचे केस शिल्लक राहील्यामुळे तुमच्या केसांचा इंग्रजीमधील M या अक्षरासारखा आकार दिसू लागतो.हळूहळू केस मोठ्या प्रमाणावर बारीक व छोटे झाल्यामुळे तुमच्या केसांचा आकार इंग्रजीमधील  U या आकारासारखा दिसू लागतो.हॉर्मोन्सच्या प्रतिसादामुळे केसांची लांबी व प्रमाण कमी होणे हे Androgenic Alopecia चे लक्षण आहे.निरोगी केस निर्माण करणारे हेअर फॉलिकल्स लहान व पातळ केस निर्माण करु लागतात ज्यामुळे केस लवकर कमजोर होतात.ही एक आनुवंशिक स्थिती असून स्त्री व पुरुष या दोघांवर देखील याचा परिणाम दिसून येतो.

जर तुम्ही स्त्री असाल व तुमच्या स्कॅल्प वरचे केस पातळ झाले असती. तुमच्या डोक्यावरील केस हेअर लाईनसह पुढून मोठ्या प्रमाणावर गळत असतील तर तुम्हाला Female Pattern Baldness ही समस्या असू शकते.केस मोठ्या प्रमाणावर पातळ झाल्यामुळे स्कॅल्प दिसू लागतो.संपूर्ण केस गळणे क्वचितच घडते.तुम्हाला वयाच्या विशीमध्ये तुमचे केस पातळ झाल्याचा अनुभव येईल पण चाळीशी अथवा नंतर तसा अनुभव येईलच असे नाही कारण नंतर केस हळूहळू वाढू शकतात.यासाठी वाचा या कारणांमुळे केस विरळ होण्यावर घरगुती उपाय फायदेशीर ठरत नाहीत !

Patchy Hair Loss

जर तुमच्या लहान अथवा तरुण मुलांच्या स्कॅल्पवर केसगळतीमुळे एक किंवा दोन गुळगुळीत गोलाकार पॅच दिसत असतील तर त्यांना Alopecia Areata  किंवा Patchy Hair Loss ही समस्या असते.या प्रकारातील केसगळती भुवया,हात व पाय किंवा चेह-यावरच्या केसांवर देखील दिसू शकते.यामध्ये अचानक केस गळू लागतात व पुन्हा सहा महिने अथवा एक वर्षाने केस वाढू लागतात.पण जेव्हा त्या भागात नवीन केस उगवतात तेव्हा दुस-या भागामधील केस गळू लागतात.काही लोकांमध्ये या समस्येमध्ये कोणताही पॅच अथवा टक्कल न पडता केस पातळ होतात.काही लोकांचे केस वाढतात व तुटतात.Alopecia Areata ही एक ऑटोइम्युन स्थिती आहे.ज्यामध्ये शरीर आपल्याच हेअर फॉलिकल्सवर हल्ला करते.Alopecia Totalis मध्ये मोठ्या प्रमाणावर केस गळून टक्कल पडते.

 Tinea Capitis-

Tinea Capitis हे एक फंगल इनफेक्शन असून ते सहसा शालेय विद्यार्थी व पौगंडावस्थेतील मुलांना होते.निरोगी प्रौढांमध्ये ते क्वचितच आढळते.हे इनफेक्शन स्कॅल्पच्या काही भागाला अथवा संपूर्ण स्कॅल्पला होऊ शकते.यामुळे संक्रमित त्वचे जवळील केस तुटतात व त्या जागी टक्कल पडून तो भाग काळसर पडतो.त्वचेवर सूज येऊन पू सह फोड येतात ज्यांना Kerions असे म्हणतात.अशा मुलांना सौम्य ताप व गळ्याभोवती सूजलेल्या गाठी येतात.हे इनफेक्शन सांसर्गिक असून कंगवा अथवा टोपीच्या माध्यमातून इतरांना होऊ शकते.इनफेक्शन बरे झाल्यास केस पुन्हा वाढू लागतात.यासाठी वाचा हेल्मेट, टोपीचा वापर पुरूषांमध्ये केसगळती वाढवते का ?

Traction alopecia-

केसांवर दाब आल्यास देखील केस गळतात.काही हेअर स्टाईलमुळे देखील केस तुटू शकतात.अशा प्रकारच्या केसगळतीला Traction Alopecia असे म्हणतात.

Trichotillomania-

काही लोकांना स्वत:चेच केस अथवा पापण्या ओढून काढायची सवय असते.या समस्येला Trichotillomania किंवा Hair Pulling Disorder असे म्हणतात.बहुतेक वेळा हा मनोविकार लहान मुलांमध्ये दिसून येतो.तुटलेल्या केसांमुळे त्यांच्या डोक्यामध्ये पॅच दिसतात.यासाठी वाचा हीना- मोहरीच्या तेलाचे मिश्रण दूर करेल ‘केसगळती’ची समस्या !

एकदा तुम्हाला तुमच्या केसगळतीचा प्रकार लक्षात आला की तज्ञांकडून त्यावर उपचार करणे सोपे जाते.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>