Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पोटात गॅस निर्माण होण्यामागची ही १० कारणे !

$
0
0

प्रत्येकाला एकदा तरी पोटात गॅस होण्याच्या समस्येचा अनुभव आला असेल.विशेषत: जेव्हा आपण जड जेवण घेतो तेव्हा आपल्याला ही समस्या हमखास होते.दररोज या समस्येला तोंड द्यावे लागणे हे जितके लाजिरवाणे असते तितकेच ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील असते.अनेकांना वाटतं की उशीरा जेवल्यामुळे  त्यांना ही समस्या निर्माण होते पण प्रत्यक्षात यामागे तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न खाता किंवा तुम्हाला एखादा असलेला विशिष्ट विकार किंवा अगदी तुमची धूम्रपानाची सवय देखील कारणीभूत असू शकते.यासोबत वाचा या घरगुती मिश्रणाने पचनाचे विकार आणि वजन घटवा

जाणून घेऊयात पोटात गॅस निर्माण होण्यामागची ही १० सामान्य कारणे व या समस्येला नियंत्रित ठेवण्यासाठी काही टीप्स-

१.हाय-फायबर डाएट-ओट्स,ब्रेड,ब्रान फ्लेक्स,शिजवलेली बार्ली,स्पॅगेटी (अगदी अख्खे गहू सुद्धा),डाळ,सोयाबीन,मटार,सालीसकट सफरचंद अथवा पिअर,केळं व इतर काही खाद्यपदार्थ आरोग्यासाठी चांगले असून त्यामुळे गॅस्ट्रोइनटेस्टीनल समस्या टाळल्या जातात.मात्र या पदार्थांचे अति सेवन केल्यास तुमच्या पोटात गॅस निर्माण होऊ शकतो.

कारण-मानवी आतडे फायबर पचवू शकत नाहीत.भरपूर प्रमाणात फायबर असलेले पदार्थ खाल्लास गॅस होतो कारण मोठ्या आतड्यामधील बॅक्टेरिया काही प्रमाणात फायबर पचवतात.या पचनक्रियेमुळे गॅस निर्माण होतो.

उपाय- आपल्या शरीरासाठी फायबर अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्ही फायबरयुक्त पदार्थ खाणे टाळू शकत नाही.यासाठी लक्षात ठेवा जर भरपूर प्रमाणात फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅस होत असेल तर तुमच्या आहारातील फायबरचे प्रमाण कमी करा.विशेषत: जर तुम्ही जेवणामध्ये भरपूर सलाड खाण्यास सुरुवात केली असेल तर ते कमी करा.सुरुवातीला काही दिवस थोड्या प्रमाणात फायबरयुक्त पदार्थ खा व हळूहळू तुमचे पोट भरेल इतक्या प्रमाणात त्यामध्ये वाढ करा.त्यामुळे तुम्हाला तुमचे पोट फुगण्याच्या पातळीचा अचूक अंदाज येईल व तुमची समस्या आपोआप कमी होईल.यासाठी वाचा आहारात फायबर्सचा अधिक समावेश झाल्यास वाढतील हे ’5′ त्रास !

२.साखरेचे पदार्थ-पेस्ट्री,कुकीज,फळांचा रस,स्विटेंडेड सोडा,मिठाई या गोड पदार्थांमुळे देखील पोट फुगू शकते.

कारण-हाय-फायबर डाएट प्रमाणेच गोडपदार्थांमुळे देखील पोट फुगू शकते पण या स्थितीत छोट्या आतड्यांमधील बॅक्टेरिया साखरेच्या पदार्थांचे पचन करतात व गॅस निर्माण होतो.

उपाय- साखरेचे पदार्थ खाल्ल्यामुळे गॅस होत असेल तर यावर हाय-फायबर डाएट प्रमाणेच उपाय करावेत.

.बद्धकोष्टता-बद्धकोष्टतेमुळे तुमचे पोट फुगते व त्यात वाढ झाल्यास काही दिवसांनी तुम्हाला पोटात वेदना जाणवू लागतात.

कारण-बद्धकोष्टतेच्या तीव्र त्रासामुळे शौच बाहेर पडण्याची प्रक्रिया मंदावते.पचन क्रियेवर परिणाम होऊन गॅस निर्माण होतो व सहाजिकच त्यामुळे तुमचे पोट फुगते.

उपाय-तुमच्या खाण्याच्या सवयी व आहार यामध्ये योग्य व हळूहळू बदल करा.यासाठी हळूहळू तुमच्या आहारामध्ये फळे,भाज्या व सुकामेवा यासारख्या विघटनशील फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा व भरपूर प्रमाणात पाणी प्या.

४.धूम्रपान-पोट फुगणे हा धूम्रपानामुळे होणारा एक साईड इफेक्ट देखील आहे.यामागचे कारण धूम्रपान करणारी व्यक्ती अति प्रमाणात हवा आत घेते ज्यामुळे त्यांच्या अन्ननलिका,पोट किंवा मोठ्या आतड्यामध्ये गॅस निर्माण होतो.तसेच जाणून घ्या धूम्रपान सोडल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होतो का ?

उपाय-तुमच्या व्यसनावर नियंत्रण ठेवा किंवा धूम्रपानाची सवय सोडण्याचा प्रयत्न करा.त्यामुळे तुमची पोट फुगण्याची समस्या आपोआप कमी होईल.

५. अॅसिड रिफ्लक्स-जर तुम्हाला जेवणानंतर पोटाच्या वरच्या भागात गोळा येणे,जेवल्यावर मळमळणे किंवा जेवल्यावर एक तासामध्ये ढेकर येण्यास सुरुवात होणे या समस्या होत असलील त तुम्हाला अपचन अथवा Acid reflux ही समस्या असू शकते.

अॅसिड रिफ्लक्स म्हणजे तुमच्या पोटातील अन्न,पोटातील अॅसिड व पाचक रस अन्ननलिकेच्या माध्यमातून पुन्हा वर येणे.पोट व अन्ननलिकेच्या खालील टोकाच्या मधील झडप योग्य पद्धतीने बंद न झाल्यास अथवा चुकीच्या वेळी उघडल्यास असे घडते.अति अन्न ग्रहण केल्यामुळे देखील ही समस्या निर्माम होते.तसेच या समस्येमागचे कारण धूम्रपान,मद्यपान,लठ्ठपणा,पस्तिशीनंतरचे वय व गरोदरपण हे देखील असू शकते.

उपाय-सौम्य अपचनाचा त्रास होत असल्यास तुम्ही एखादे कार्बोहायड्रेड पेय घेऊन पोटावरचा हा दाब कमी करु शकता किंवा एखादे अॅन्टासाइड घेतल्याने देखील या समस्येमधून आराम मिळू शकतो.मात्र जर अपचनाची समस्या तीव्र असेल तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

६.Splenic-flexure syndrome- प्लीहेच्या(Spleen) पूढील मोठ्या आतड्यामध्ये गॅस अडकल्यास त्या समस्येला Splenic-flexure syndrome असे म्हणतात.या समस्येमुळे भयंकर वेदना होतात व या वेदना प्रामुख्याने पोटाच्या वरच्या भागात डावीकडे जाणवतात.या समस्येमुळे त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यासारखे वाटू लागते.या विकाराचे पोट फुगणे हे देखील एक सामान्य लक्षण आहे.

उपाय-हा विकार टाळण्यासाठी पोटात गॅस निर्माण करणारे खाद्यपदार्थ खाणे टाळा.ब्रोकोली,कोबी,प्रक्रिया केलेले पदार्थ,प्रून्स,मटार व सफरचंद यामुळे देखील पोट फुगू शकते.

७.Irritable bowel syndrome (IBS)-इरीटेबल बोवल सिन्ड्रोम मुळे पोटात वेदना होणे,क्रॅम्प येणे व पोट फुगण्याची लक्षणे आढळतात.

संभाव्य कारण- आतड्यामध्ये इनफेक्शन झाल्यास अथवा अति ताणामुळे देखील ही समस्या निर्माण होते.यासाठी जाणून घ्या इरीटेबल बोवल सिन्ड्रोमचा धोका वाढवणारे घटक

उपाय-एकाचवेळी भरपूर जेवणे टाळा.तसेच कॅफेनयुक्त व कोलासारखे पदार्थ टाळल्यामुळे देखील आराम मिळू शकतो.ही आतडयाची एक सामान्य समस्या असली तरी सतत त्रास झाल्यास त्वरीत तुमच्या Gastroenterologist (Bowel Specialist) चा सल्ला घ्या.तज्ञ तुमच्या काही टेस्ट करुन तुम्हाला Crohn’s disease किंवा Ulcerative colitis, Celiac disease व Colon cancer या समस्या झाल्या आहेत का ते पहातील.

८.Celiac disease-हा विकार सामान्यत: पाश्चिमात्य देश व अाफ्रिकेमध्ये आढळत असून तो गहू अथवा धान्यातील ग्लूटन या घटकाच्या अॅलर्जीमुळे होऊ शकतो.

संभाव्य कारण-हा एक मल्टी-सिस्टिम विकार असून तो परिवर्तनशील असून कोणत्याही वयात होऊ शकतो.भारतात देखील त्याचे प्रमाण आढळत आहे.

उदा.Indian Journal of Medical Research मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये बी.एस.रामकृष्ण यांच्या मते या विकारामध्ये डायरिया,वजन कमी होणे,स्टंटींग,पोटदुखी,पोट फुगणे,Distension, Anorexia,उलटी बद्धकोष्टता ही लक्षणे आढळतात.तसेच यामुळे आतड्याशी संबधित नसलेल्या समस्या जसे की आर्यनची कमतरता,अॅनिमिया,Osteoporosis,व्हिटॅमिनची कमतरता थकवा देखील जाणवतो.या विकाराचा व स्त्रीयांमध्ये वंधत्व,टाईप १ मधूमेह,तोंडाचा अल्सर,Thyroiditis,डिप्रेशन,Epilepsy या समस्यांचा संबध असू शकतो.

उपाय-भारतीय संशोधकांच्या मते यासाठी गहू व इतर धान्याचा वापर न करणे सुरक्षित ठरेल.

९.Crohn’s disease-Chronic Inflammatory Bowel Disease (IBD) हा विकार पूर्ण जठरमार्गावर होतो पण त्यामानाने आतड्यांवर फार प्रभाव करीत नाही.पोटदुखी,डायरिया,वजन कमी होणे ही या विकाराची प्रमुख लक्षणे आहेत.पण काही रुग्णांमध्ये तीव्र डायरिया,पोट फुगणे,थकवा,ताप,मळमळ,उलटी व अॅनिमिया ही लक्षणे देखील आढळतात.

संभाव्य समस्या-या विकारामुळे आकुंचनामुळे मोठे आतडे अरुंद होणे, Perforation किंवा मोठ्या आतड्यामध्ये जखम, Colon cancer, Sepsis (रक्तामधील इनफेक्शन), Osteoporosis, Gallstones, यकृतामध्ये बिघाड,ब्लड क्लॉट अशा अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.

उपाय-वरील लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करु नका त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

१०.Diverticulosis-या समस्येमध्ये आतड्याच्या अस्तराला फुगवटा येतो.हा फुगवटा संपूर्ण आतड्याला कुठेही येऊ शकतो पण ब-याचदा तो मोठ्या आतड्यामध्ये आढळतो.जरी याची कोणतीही लक्षणे आढळली नाही तरी ही समस्या इरीटेबल बोवल सिन्ड्रोम सोबत होते.Diverticulosis हा विकार जरी गंभीर नसला तरी जर तुम्हाला आतड्यामध्ये रक्तस्त्राव अथवा जखम झाली तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.

कधीकधी पोट फुगण्यामागचे कारण स्पष्ट करता येत नाही.Alvarez’s syndrome या एका मनोविकारामध्ये पोटामध्ये गॅस निर्माण न होताच पोट फुगते.आहार व इतर गोष्टींबाबत योग्य ती काळजी घेऊनही जर तुमचे पोट फुगत असेल तर तुम्ही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.आपल्याला असे वाटत नसले तरी कधीकधी पोट फुगणे ही एक गंभीर समस्या असू शकते.

 

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>