सहा महिन्यानंतर बाळाला स्तनपानासोबत इतर अन्न पदार्थ खाण्याची सवय लावल्यामुळे मुलांना नवनवीन चवी समजू लागतात व त्यांचे योग्य पोषण देखील होते.यासाठी तुमच्या लहान बाळाला तुम्ही घरीच सुकामेवा,विविध डाळी, ओट्स,नाचणी,विविध धान्ये तूपात भाजून त्यापासून तयार केलेले पौष्टिक सत्व देऊ शकता.तसेच शक्य तितक्या पौष्टिक भाज्या घालून तयार केलेली मऊ खिचडी देखील बाळासाठी पोषक ठरते.मीठ न घातलेली ही मऊ खिचडी तुमच्या बाळाला नक्कीच आवडू लागते.पण जसजसे तुमचे बाळ मोठे होऊ लागते ते हे पदार्थ खाण्याचा कंटाळा करु लागते.त्यामुळे त्यानंतर तुमच्या मुलांना पौष्टिक अन्न देण्यासाठी तुम्ही घरीच पौष्टिक भाज्या व चिकनचा स्टॉक तयार करुन ठेऊ शकता.यासाठी वाचा मुलांच्या हेल्दी टेस्टी पदार्थांसाठी व्हेजीटेबल स्टॉक कसा तयार करुन ठेवाल ?
मुलांचे जेवण अधिक पौष्टिक करण्यासाठी स्टॉक तयार करताना भाज्यांसोबत त्यात चिकन वापरणे नक्कीच फायद्याचे ठरेल.पण ही कल्पना अधिक फायद्याची होईल जेव्हा तुम्ही तो स्टॉक आधीच करुन ठेवाल.कारण त्यामुळे तुमचा स्वयंपाकाचा वेळ देखील वाचेल.त्यामुळे मुलांच्या पोषणाची विनाकारण चिंता करीत बसण्यापेक्षा हा चिकन स्टॉक घरीच कसा करुन ठेवावा याची रेसिपी जरुर वाचा.
चिकन स्टॉकसाठी लागणारे साहित्य-
- एका चिकनचे चिकन बोन्स.यासाठी तुम्ही चिकनमधील मांस वेगळे केल्यावर उरणारी हाडे वापरु शकता.
- अर्धा कप लसणाच्या पाकळ्या
- दोन सोललेले कांदे
- एक कप सोललेल्या गाजराचे मोठे तुकडे
- एक कप स्टार्च नसलेल्या तुमच्या आवडीच्या भाज्या
- एक सॉस पॅन पाणी
- चवीनूसार मीठ व मिरपूड
चिकन स्टॉक बनविण्याची कृती-
- मंद गॅसवर पाणी उकळत ठेवा.
- पाण्यामध्ये सर्व साहित्य टाका व एक तास मंद गॅसवर ते उकळू द्या.
- एक तासानंतर गॅस बंद करा व हे मिश्रण सामान्य तापमानापर्यंत थंड होऊ द्या.
- त्यानंतर मिश्रण गाळून त्यातीस चिकनबोन्स व भाज्या वेगळ्या करा.
- त्यानंतर तुमच्या गरजेनूसार ते एखाद्या रेसिपी साठी वापरा अथवा साठवून ठेवा.तसेच हेल्दी चिकन सूपची टेस्टी रेसिपीची देखील जरुर वाचा.
घरी केलेला चिकन स्टॉक साठवून कसा ठेवावा?
तुम्ही हा चिकन स्टॉक एखाद्या भांड्यामध्ये भरुन फ्रीजमध्ये ठेऊ शकता.पण दोन चमचे चिकन स्टॉक वापरण्यासाठी प्रत्येक वेळी स्टॉक फ्रीजबाहेर काढणे योग्य नाही.यासाठी तुम्ही चिकन स्टॉक आइस क्युब्स ट्रे मध्ये भरुन ठेऊ शकता.त्यामुळे जेव्हा तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा तुम्ही तुम्हाला हव्या तितक्या आइस क्युब्स वापरु शकता. मुलांचे जेवण करताना एखाद्या रेसिपीसाठी तुम्ही प्रत्येकी दोन क्युब्स वापरु शकता.चिकन व भाज्यांमुळे चिकन स्टॉक चविष्ट व पौष्टिक होतो.तुम्ही मुलांच्या खिचडी अथवा सूप मध्ये याचा वापर नक्कीच करु शकता.चिकन स्टॉक फ्रीज मध्ये ठेवण्यापूर्वी त्यापासून तयार केलेले चिकन सूप देखील फारच स्वादिष्ट लागते.यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही चिकन स्टॉक बनवाल तेव्हा ताजा चिकन स्टॉक देखील मुलांना जरुर पिण्यासाठी द्या किंवा त्यापासून बनविलेले चिकन सूप द्या.तसेच वाचा डाळीचे पाणी की पातळ डाळ बाळासाठी काय योग्य ठरेल ?
जर तुमची मुले खाताना फारच नखरे करीत असतील तर त्यांच्या नकळत जेवणात हा चिकन स्टॉक वापरुन तुम्ही त्यांचे योग्य पोषण नक्कीच करु शकता.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock