Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या 5 टीप्सने कामाच्या ठिकाणी ढीगभर कामही वेळेत पूर्ण कराल !

$
0
0

कामाचा व्याप अधिक आणि वेळ कमी असेल तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित करणं कठीण असते. काम उरकण्याच्या घाईमध्ये अनेकदा चूका होतात. त्यामध्ये कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. मग तुमचे मन इकडे तिकडे भरकत राहते आणि दिवसागणिक काम  वाढत जाते. मग पहा अशी पेंडीग कामांची लिस्ट वाढू नये म्हणून नेमके काय करायला हवे ?

  • भरपूर पाणी प्या - तुमच्यावर ताण असेल तर सहाजिकच तुमची काम करण्याची क्षमता कमी होते. Journal of Nutrition मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, शरीरात डीहायड्रेशन वाढल्यास त्याचा परिणाम तुमच्या एकाग्रतेवर तसेच बौद्धिक क्षमतेवरही होतो. त्यामुळे दिवसभरात मुबलक पाणी नक्की प्या. या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !
  • एसीचे तापमान योग्य राखा - अनेकदा एसीमुळे खूपच थंडावा निर्माण होत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही दिसून येतो.  journal Building and Environment च्या अहवालानुसार, खूपच गरम किंवा थंड वातावरण असल्यास त्याचा परिणाम कार्यक्षमतेवर होतो. खूपच थंड वातावरण असल्यास बौद्धिक ताण वाढतो तर खूपच उष्ण वातावरणात आळस वाढतो. यामुळे कार्यक्षमता ढासळते.
  • अस्ताव्यस्त टेबल - तुम्ही काम करत असलेले टेबल टापटीप ठेवणं गरजेचे आहे. तेथे खूप वस्तू बेशिस्त पद्धतीने ठेवणं तुमचं लक्ष विचलित करू शकतात. म्हणूनच तुमचे टेबल आणि ड्रॉवर नीट ठेवा.
  • वेळ पाळा - एखादे काम किती वेळात पूर्ण झाले पाहिजे याबाबत स्वतःला शिस्त लावा. त्या वेळेतच कटाक्षाने काम पूर्ण करा आणि त्यानुसार तुमची कामं संपवा. हळूहळू तुम्ही त्या वेळेतच काम पूर्ण होईल याकडे तुमचे लक्ष राहील.
  • वर्डमध्ये काम करताना  ‘Focus View’ चा वापर करा - तुम्ही कम्प्युटरवर काम करत असाल तर डाव्या बाजूला दिसणार्‍या  ‘Focus View’  या आयकॉनवर क्लिक करा. यामुळे इतर विंडो बंद होतील आणि तुमचे लक्ष केवळ तुम्ही करत असलेल्या कामावर राहेल. म्हणजे सहाजिकच सोशल मिडियावर अपटेस पहात राहणं, मेसेजेच वाचणं याकडे दुर्लक्ष होईल.

या टीप्ससोबतच कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करतील ही ’8′ योगासनं नक्कीच फायदेशीर ठरतील

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock

References:
[1]. Lawrence E. Armstrong, Matthew S. Ganio , Douglas J. Casa, Mild Dehydration Affects Mood in Healthy Young Women, The Journal of Nutrition, jn.111.142000v1 142/2/382
[2]. Li Lana, Zhiwei Liana, , , Li Pana, Qian Yeb, Neurobehavioral approach for evaluation of office workers’ productivity: The effects of room temperature, Building and Environment, https://doi.org/10.1016/j.buildenv.2008.10.004


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>