मेष-(२१ मार्च ते २० एप्रिल)- तुमच्या ग्रहांची स्थिती आरोग्यामध्ये काहीतरी गंभीर बिघाड होण्याचे संकेत देत आहे.यासाठी तुमच्या आरोग्य लक्षणांबाबत सावध रहा व त्वरीत वैद्यकीय मदत घ्या.ज्यामुळे आरोग्य समस्या अधिक बळावणार नाही.तुमची आरोग्य समस्या मुळापासून बरी करण्यासाठी पर्यायी थेरपीचा वापर करा.
वृषभ-(२१ एप्रिल ते २१ मे)-मधूमेहींची ब्लड शूगर वाढण्याचा धोका आहे.यासाठी योग्य ती दक्षता घ्या व डॉक्टरांच्या सल्लानूसारच आहार घ्या.तसेच रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी नियमित चेक-अप करा.इतरांना या आठवड्यामध्ये आरोग्याबाबत काळजी करण्याची गरज नाही.तुमचे आरोग्य चांगले राहील.
मिथुन-(२२ मे ते २१ जून)-ज्या लोकांना कॅलशियमच्या अभाव ही समस्या असेल त्यांना काही प्रमाणात सांधे व पाठदुखीची समस्या होईल.यासाठी आहारात योग्य तो बदल करा व कॅलशियम सप्लीमेंट घ्या.दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या व फळे खा.मधूमेहींनी नियमित चेक-अप करा व आहाराबाबर काळजी घ्या.
कर्क-(२२ जून ते २२ जुलै)-कदाचित पूर्वीचा बरा झालेला एखादा आजार पुन्हा होण्याची शक्यता आहे.आजारपणाला टाळण्यासाठी तशी लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.एखादे मशिन हाताळताना अथवा गाडी चालवताना सावध रहा एखादी शारीरिक दुखापत होण्याची शक्यता आहे.
सिंह-(२३ जुलै ते २२ ऑगस्ट)-ज्यांना सांध्याची समस्या आहे त्यांना सांधेदुखी होण्याची शक्यता आहे.गंभीर दातदुखीमुळे डेंटीस्टकडे जाणे अपरिहार्य असेल.कॅलशियमचा अभाव आजारी पडण्याचे मुख्य कारण असेल.यासाठी कॅलशियमयुक्त भाज्या व फळे खा.
कन्या-(२३ ऑगस्ट ते २२ सप्टेबर)-सुर्य व शनीच्या ग्रहदिशेमुळे आरोग्याबाबत एखादी वाईट बातमी मिळू शकते.एखादा अनपेक्षित त्रास होण्याची शक्यता आहे.याबाबत छोट्याश्या लक्षणाकडे देखील सावधपणे पहा व जाणिवपूर्वक आरोग्यदायी आहार घ्या.
तूळ-(२३ सप्टेबर ते २२ ऑक्टोबर)-ग्रहांची दिशा मधूमेहींना समस्या होणार असल्याचे दर्शविते.यासाठी मधूमेहींनी डॉक्टरांच्या सल्लानूसारच आहार घ्यावा.तसेच नियमित ब्लड शूगर देखील तपासावी.रक्तदाबामध्ये बदल झाल्यास त्याबाबत देखील सावध रहावे.
वृश्चिक-(२३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर)-या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील.याचाच अर्थ तुम्हाला शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभेल.जर तुम्हाला पूर्वी काही आरोग्य समस्या झाल्या असतील तर त्यातून आता तुम्हाला आराम मिळेल.पर्यायी औषधे तुम्हाला लाभदायक ठरतील.
धनु-(२३ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर)-ग्रहदिशा मधूमेंहींसाठी हा आठवडा त्रासदायक असल्याचे दर्शविते.साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित औषधे घ्या.यावर दुसरा कोणताच उपचार नाही.इतर बाबतीत तुमचे आरोग्य चांगले राहील.निरोगी व फीट राहण्यासाठी जीमला जाणे सुरु करा.
मकर-(२२ डिसेंबर ते २० जानेवारी)-ग्रहांच्या दिशेमुळे या आठवड्यामध्ये तुमचे शारीरिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.एखादी अनपेक्षित आरोग्य समस्या होण्याची शक्यता आहे.आरोग्य सांभाळण्यासाठी अशा लक्षणांबाबत सावध रहा व योग्य ती काळजी घ्या.
कुंभ-(२१ जानेवारी ते १८ फेब्रुवारी)-हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी चांगला असला तरी एखादी पचनसमस्या होण्याची शक्यता आहे.तुमच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी तुम्हाला त्रासदायक ठरु शकतात.अॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे.निरोगी राहण्यासाठी आहारामध्ये भरपूर प्रमाणात कच्च्या भाज्या व फारबर असलेली तृणधान्ये यांचा समावेश करा.
मीन-(१९ फेब्रुवारी ते २० मार्च)-जर तुम्हाला श्वसनसमस्येबाबत एखादा त्रास झाला तर त्यावर त्वरीत उपचार करा.जर तुम्ही यावर लगेच उपचार केले नाहीत तर तुमची आरोग्य समस्या बळावू शकते.आहाराबाबत योग्य काळजी घ्या.अति तेलकट,स्पाइसी व प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.