Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘केशरा’ने ठेवा रक्तदाब आणि हृद्यविकार नियंत्रणात !

$
0
0

केशर हे जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक ! पूर्वीच्या काळात राजे-महाराजे केशर दूधात मिसळून आंघोळ करत असे. केशराचा रंग, त्याचा सुवास पदार्थांची चव तर वाढवतेच पण सोबतीला आरोग्य सुधारण्यासही मदत करते. गरोदर स्त्रियांनादेखील आरोग्यदायी कारणांसाठी केशरयुक्त दूध दिले जाते. केशरातील काही घटक हृद्याचे कार्य सुधारण्यास मदत करतात. ( नक्की वाचा : गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज !)

कसे ठरते केशर फायदेशीर ?  

केशर हे कॅरॉटेनॉईड्सयुक्त तसेच दाहशामक आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट असते. केशरातील सेरोटीन घटक आरोग्यदायी असते. हृद्याचे आरोग्य सुधारण्यासाठी सेरोटीन फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. यामुळे हृद्यरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. रक्तातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत होते. तसेच रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस होण्याची शक्यता कमी होते. यामुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी होतो. रक्तप्रवाह सुधारतो तसेच रक्तदाबाची समस्यादेखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे स्वास्थ्यवर्धक केशर तुमच्या आहारात नक्कीच असायला हवे.

कसे घ्याल आहारात ‘केशर’ ? 

केशर अतिशय महाग असल्याने ते सर्रास प्रत्येक घरात वापरलेच जाते असे नाही. परंतू सणासुदीच्या काळात गोड पदार्थांमध्ये केशर आवर्जून वापरले जाते. दुधामध्ये केशर मिसळून प्यायल्याने हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. तसेच कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात राहिल्यास रक्तदाबाचा त्रासही कमी होतो. त्यामुळे गोडाच्या पदार्थांसोबतच मोगलाई पदार्थांमध्येदेखील केशर मिसळले जाते.  मात्र एकाचवेळी अति प्रमाणात केशर खाणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

संबंधित दुवे - 

हृद्याचं आरोग्य सुधारणारी ’11′ हेल्दी ड्रिंक्स !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - Control blood pressure, cholesterol and prevent heart diseases with saffron

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>