पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात रिमा लागू व विक्रम गोखले अभिनित ‘दिल अभी भरा नही’ या नाटकादरम्यान अचानक पडदा पडला… आणि अभिनेते विक्रम गोखले यांच्या डोळ्याला दुखापत झाल्याची घोषणा झाली. अचानक झालेल्या या जखमेमुळे नाटक तेथेच थंबवले जाईल असे सार्यांना वाटत होते. मात्र तसे न करता विक्रम गोखलेंनी डोळ्याला पट्टी बांधून तो प्रयोग पूर्ण केला. ( नक्की वाचा : डोळ्यांच्या आरोग्याविषयक ’5′ रंजक अन महत्त्वपूर्ण गोष्टी ! )
मराठी, हिंदी सिनेसृष्टीत अतिशय चोखंदळ काम करणारे विक्रम गोखले यांनी ‘शो मस्ट गो ऑन’ ही उक्ती सार्थ ठरवत आपले काम पूर्ण केले. या प्रयोगादरम्यान अचानक जखम झाल्याने ते बॅकस्टेजला गेले. त्यानंतर उपस्थितांपैकी कोणी डॉक्टर असल्यास त्यांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार डॉक्टरांनी समोर येऊन त्यांच्यावर तात्पुरते उपचार केले. (डोळ्यांवरील ताण हलका करणारे घरगुती उपाय )
डॉ. अरविंद नवरे या नाटकाच्या प्रयोगादरम्यान तेथे उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांनी तब्बल पाऊणतास डोळ्यावर पट्टी बांधून नाटकाचा प्रयोग पूर्ण केला. ‘स्वतःचा वेळ खर्च करून प्रेक्षक नाटक पहायला येतात. अशावेळी मला झालेल्या जखमेत त्यांचा दोष नसताना त्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. त्यामुळे प्रयोग रद्द करणे मला चुकीचे वाटते’ अशी भावना अभिनेते विक्रम गोखले यांनी महाराष्ट्र टाईम्सकडे व्यक्त केली.
संबंधित दुवे -