आजकाल डिस्पोजल उत्पादनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.अशी उत्पादने व प्लॅस्टिकच्या वापरातून होणारा कचरा यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.तुम्ही पर्यावरणप्रेमी असा अथवा नसा पण हे प्रदुषण करण्यामध्ये तुमचा सहभाग असावा असे तुम्हाला नक्कीच वाटत नसेल.तसेच यासोबत एक सृजनशील पालक या नात्याने मुलांना देखील याबाबत जाणिवपूर्वक जबाबदार नागरिक करणे हे तुमचे कर्तव्यच आहे.यासाठी मुलांची लहानपणापासूनच या दृष्टीने मनाची तयारी करणे आवश्यक आहे.तुम्ही मुलांना दैनंदिन जीवनामध्ये कचरा कमी प्रमाणात निर्माण करणे व कच-याचा पुर्नवापर करणे शिकवू शकता.ज्याप्रमाणे आपण मुलांना विनयशील व नम्र होणे शिकवतो अगदी त्याचप्रमाणे त्यांना पर्यावरण प्रेमी होणे देखील शिकवणे आवश्यक आहे.जर लहानपणीच मुलांच्या मनावर असे संस्कार झाले तर मोठेपणी तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल नक्कीच अभिमान वाटेल.तुमच्या मुलांवर हे संस्कार करण्यासाठी आधी त्यांची जीवनशैली पर्यावरणाला पूरक करा.
यासाठी या काही टीप्सचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
१.लहान बदल करा- जीवनशैली पर्यावरण पूरक करण्यासाठी तुम्हाला फार मोठे बदल करण्याची मुळीच गरज नाही.उलट मोठे बदल अचानक केल्यामुळे परिस्थितीसोबत जुळवून घेणे कदाचित कठीण जाऊ शकते.यासाठी मुलांच्या जीवनामध्ये लहान-लहान बदल करा.जसे की यासाठी तुम्ही मुलांना बाथ टब अथवा शॉवरखाली अंघोळ करण्यापेक्षा बादलीमध्ये पाणी घेऊन अंघोळ करणे शिकवा.पुर्नवापर करण्यासारखा कचरा त्यांना त्यासाठी योग्य अशा कच-याच्या डब्ब्यामध्ये टाकण्यास सांगा.मुलांच्या पॅक फूड व प्लॅस्टिक बॉटलवर नियंत्रण ठेवा.उलट त्यांना घरातून पाण्याची बाटली घेऊन जाण्यास शिकवा.यासाठी जाणून घ्या या ’5′ पॅकेजिंग मटेरियलमुळे बिघडू शकतं आरोग्याचं गणित
२.मुलांना कंपोस्ट बाबत ज्ञान द्या-आपण टाकून देत असलेला बराचसा कचरा पुर्नवापर करण्यासाठी योग्य असतो.आपण टाकून देत असलेला बराच कचरा हा आपल्या भारतीय किचन मधून येत असतो.यासाठी मुलांना या कच-यापासून योग्य पद्धतीने कंपोस्ट खत बनवणे शिकवा.ज्यामुळे आपल्या घरातील कचरा बागेसाठी खत म्हणून वापरता येऊ शकेल.हे खत झाडांसाठी किती महत्वाचे आहे व झाडे जीवन जगण्यासाठी किती महत्वाची आहेत हे मुलांना पटवून द्या.
३.वस्तूंचा पुर्नवापर करण्यास शिकवा- आपल्यांपैकी अनेक पालक मोठ्या भावंडानी वापरलेली पुस्तके,कपडे व खेळणी वापरुन मोठे झाले असतील.कच-याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आजही अनेक पालकांनी या गोष्टीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.कदाचित आज आपण हे विसरुन गेलो आहोत की साधे जीवन जगण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.मुलांचे जुने कपडे चांगले असताना तरी देखील गरज नसताना नवीन कपडे खरेदी करण्याची काहीच गरज नाही.असे न वापरलेले कपडे ब-याचदा वायाच जातात.यासाठी मुलांना कपडे,खेळणी व पुस्तकांचा पुर्नवापर करण्यास शिकवा.तसेच या 9 चांगल्या सवयी पुढच्या पिढीला नक्की शिकवा.
४.मुलांना वस्तू शेअर करण्यास अथवा इतरांना देण्यास शिकवा-मुलांच्या खेळणी व पुस्तकांसाठी लायब्ररी असेल तर पालकांची फार मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते.अशा लायब्ररीमध्ये सर्व प्रकारच्या मुलांसाठी वस्तू असाव्यात.जर मुलांना अशा वस्तू शेअर करणे अथवा गरजवंताला देणे शिकवल्यामुळे पालकांचा कमी प्रमाणात खर्च होऊ शकतो.
५.मुलांना साधी जीवनशैली जगणे शिकवा-मुलांना गरज नसताना अनेक प्रकारची खेळणी दिल्यामुळे ती बुद्धीमान होतील असे मुळीच नाही.उलट मुलांना साधी जीवनशैली व गरजे पुरत्याच गोष्टींचा वापर करणे शिकवल्यामुळे त्यांचे भविष्य उज्जल होऊ शकते.तसेच यासोबतच जाणून घ्या मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल ?
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock