उन्हात बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही चेहर्यावर, हाता-पायावर सनस्क्रीन लावून बाहेर पडता. यामुळे घातक सूर्यकिरणांपासून त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी मदत होते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे सनस्क्रीनचा अतिवापरही घातकच. म्हणूनच त्वचेवर सनस्क्रीनच्या वापराचा त्रास होऊ शकतो का ? याबाबतचा खास सल्ला जाणून घेण्यासाठी Jaslok Hospital & Research Centre चे Director of Dermatology Dr I K Ramchandani यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
डॉ. रामचंदानी यांच्या सल्ल्यानुसार, सूर्यकिरणांमुळे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी सनस्क्रीनचा अवश्य वापर करा. यामुळे थेट त्वचेवर घातक परिणाम होत नाही. सूर्यकिरणामधील युव्ही रेजपासून त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी मदत होते. मात्र ज्यांची त्वचा संवेदनशील असते, अॅक्नेचा त्रास होतो तसेच सनस्क्रीनपैकी काही घटकांची अॅलर्जी असेल तर अशा सनस्क्रीनच्या वापरामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अॅक्नेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी तुमच्या चेहर्याला आणि त्वचेला योग्य ठरेल अशाच सनस्क्रीनची निवड करा.
सनस्क्रीनमध्ये titanium dioxide (TiO2), kaolin, talc, zinc oxide (ZnO), calcium carbonate, and magnesium oxide घटक असतात. तर यासोबतच bemotrizinol, avobenzone, bisoctizole, benzophenone-3 (BZ-3, oxybenzone), and octocrylene हे घटकही आढळतात. सनस्क्रीनचा इफेक्टीव्ह नेस म्हणजेच प्रभाव त्यामधील घटकांवर अवलंबून असतो.
जर तुम्हांला कॉस्मॅटीक कम्पाऊंडची अॅलर्जी नसेल तर तुम्ही SPF factor of 30 ची सनस्क्रीन वापरू शकता. भारतीय त्वचेसाठी SPF 30 पुरेसा फायदेशीर आहे. तुम्ही यापैक्षा अधिक SPF चीदेखील निवड करू शकता. पण अधिक SPF म्हणजे अधिक फायदे असा तुमचा समज असेल तर तो केवळ पैशांचा अपव्यय आहे. असे डॉ.रामचंदानी सांगतात.
काही सनस्क्रीनचा वापर केल्याने तुमची त्वचा अधिक शुष्क होऊ शकते. कारण काही सनस्क्रीनमध्ये ड्राईंग एजंट असतात. तुमची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी मॉईश्चरायझरचा वापर करा. सनस्क्रीन लावण्यापूर्वी त्वचेवर मॉईश्चरायझर लावा म्हणजे त्वचेची शुष्कता आटोक्यात ठेवण्यास मदत होते. असे डॉ. रामचंदानी सांगतात. व्हिडिओ: कशी कराल योग्य सनस्क्रिनची निवड ?
सनस्क्रीनमुळे त्वचेचा युव्ही रे पासून बचाव करण्यास मदत करतात. पण यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी शोषून घेण्याची क्षमता कमी होते. परिणामी अनेकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते. त्यामुळे सनस्क्रीन निवडताना त्यामध्ये व्हिटॅमिन डीचा देखील मुबलक समावेश आहे की नाही ते तपासून पहा. त्यानुसार निवड करा. म्हणजे तुम्हांला व्हिटॅमिन डीच्या गोळ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock