फ्रिझी किंवा शुष्क केस असलेल्या प्रत्येक मुलीला नेहमीच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अशा मुली त्यांचे केस काहीही करुन चांगले दिसावेत यासाठी अनेक उपाययोजना करीत असतात.केसांवर अॅन्टी-फ्रिझ प्रॉडक्टस वापरुन देखील त्यांच्या केसांवर हवा तसा चांगला परिणाम दिसून येत नाही.अशा मुलींकडे केस स्ट्रेट करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले सर्व स्ट्रेटनर असतात.लोकांना जरी तुमचे केस चांगले वाटत असले तरी केसांची योग्य निगा राखणे फार कठीण काम असते.जगभरात अनेकजणींना फ्रिझी केसांची समस्या जाणवत असते.तुमचे केस देखील जर फ्रिझी असतील तर तुम्हाला दररोज या त्रासदायक गोष्टी सहन कराव्या लागतात.
यासाठी एरंडेल तेल – केसांच्या सार्या समस्या दूर करणारा रामबाण उपाय ! जरुर करा.
फ्रिझी केस असल्यास तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागते-
१.केस धुतल्यावर तुमचे केस सिंहाची आयाळ असल्यासारखे दिसू लागतात.
२.केस धुतल्यावर तिस-या दिवशी तुमचे केस जरी नीट दिसू लागले तरी तोपर्यंत तुमची पुन्हा केस धुण्याची वेळ जवळ आलेली असते.
३.केस चांगले दिसावेत यासाठी त्यांच्यावर जवळजवळ ४५ मिनीटे खर्च केल्यावर जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा पाच मिनीटांमध्येच तुमचे केस एखाद्या घरट्याप्रमाणे दिसू लागतात.
४.केस बांधताना अनेकदा केस तुटून तुमच्या हातात येतात.
५.तुम्हाला तुमचे केस सतत बांधून ठेवावे लागतात.
६.एखाद्या दिवशी केस काही करुन व्यवस्थित दिसावेत यासाठी ते विंचरताना तुम्हाला कमीतकमी १५ पेक्षा जास्त हेअर पिन केसांमध्ये लावाव्या लागतात.
७.हेअर स्टाइल केल्यावर केसांना हेअर स्प्रे लावणे बंधनकारक असते.
८.प्रत्येक वेळी केसांना शॅम्पु केल्यावर तुम्हाला केसांना कंडीश्नर लावावेच लागते.
९.केसांवर निरनिराळ्या प्रकारची विविध सौदर्यसाधने वापरुन देखील तुमचे केस निर्जीव दिसू लागतात.
१०.पावसाळ्यात प्रत्येक सकाळी केस धुण्याआधी तुम्हाला एकप्रकारची भीती वाटू लागते.
१२.तुम्ही सतत केस बांधून ठेवत असल्यामुळे लोकांना तुमचे केस फ्रिझी आहेत हे आपोआप समजू लागते.
१३.नेहमी तुम्ही तुमचे केस कसे बांधता यावर तुमचे केस कसे दिसतात हे अवलंबून असते.
१४.केस बांधून ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमी बाजारातून जाडे हेअरबॅन्ड खरेदी करावे लागतात.
१५.एखादा सुंदर हेअर कट केल्यावर तुमचे केस कितीही चांगले दिसत असले तरी त्यानंतर जेव्हा तुम्ही केस धुता तेव्हा तुम्हाला पुन्हा तुमच्या फ्रिझी केसांना सामोरे जावेच लागते.
संबधित दुवे-
केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !
पावसाळ्यात ‘शुष्क केस’ असणार्यांनी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे !
Read this in English
छाया चित्र सौजन्य : Shutterstock