गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा आहे.पण सिनेमात दाखवल्याप्रमाणे किंवा इतरांकडून ऐकल्याप्रमाणे “प्रेगन्सी ग्लो” किंवा “गरोदरपणातील तेज” या संकल्पनांमध्ये फार काही तथ्य आढळत नाही.याउलट गरोदरपणात तुमच्या त्वचेमध्ये त्रासदायक बदल जरुर घडतात.
यासाठी गरोदरपणात स्त्रीच्या त्वचेमध्ये घडणा-या काही त्रासदायक बदलांबद्दल अधिक जाणून घेऊयात Dermatologist डॉ.नीपा गुप्ता यांच्याकडून. ऐवढंच नाही तर डॉक्टरांनी गरोदरपणात होणा-या या त्वचा समस्यांना कमी करण्यासाठी दिलेल्या काही टीप्सचा देखील तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकेल.
१.अॅक्ने-गर्भधारणेदरम्यान येणारा ताण कमी करणे फारच आव्हानात्मक असू शकते.विशेषत: जेव्हा तुम्हाला फार थकवा व मळमळल्यासारखे होत असते.जेव्हा तुम्ही सतत अतिताणामध्ये असता तेव्हा तुमच्या त्वचेखालील तैलग्रंथी मोठ्या प्रमाणावर तेल निर्माण करतात.त्यामुळे त्वचेच्या pH मध्ये बदल घडतात व तुम्हाला अॅक्नेची समस्या निर्माण होते.
उपाय-शरीरातील टॉक्सिन्स व टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जावेत यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या.तसेच आहारामधून साखरेचे पदार्थ कमी करा ज्यामुळे तुम्हाला अॅक्नेची समस्या होणार नाही.जर तुम्हाला पिंपल्स आले असतील तर त्यांना हाताळणे किंवा फोडणे टाळा.लॅक्टिक-बेस क्लिनसरने दिवसभरात दोन वेळा चेहरा स्वच्छ धुवा व चेह-यावर टी-ट्री ऑइल लावा.
२.कोरडी त्वचा-तुमच्या बाळाच्या विकासासाठी त्याला योग्य पोषण व हायड्रेशनची गरज असते.या सर्व गोष्टी बाळाला तुमच्या शरीरातूनच मिळत असतात.यामुळे तुमचे डी-हायड्रेशन होते व त्वचा कोरडी पडते.
उपाय-यासाठी दिवसभर पुरेसे पाणी व द्रवपदार्थ घेण्यासोबतच तुमची त्वचा देखील लॅक्टिक-बेस क्लिनसरने धुवा ज्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये पुरेशी आर्द्रता टिकून राहील.हे क्लिनसर तुमची त्वचा पुरेशी हायड्रेट व मऊ ठेवण्यास मदत करेल.यासाठी वाचा त्वचा मॉश्चराइज करण्याचे घरगुती उपाय
३.पोटाला येणारी खाज-पोटावरील त्वचा ताणली गेल्यामुळे ती कोरडी होऊन पोटाला खाज येऊ लागते.
उपाय-पोट,नितंब व मांड्याच्या त्वचेवर आर्द्रता राखण्यासाठी तिथल्या त्वचेला ऑर्गेनिक तेलाने मसाज करा.तसेच त्वचेमधील कोरडेपणा कमी करुन त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या.
४.संवेदनशील त्वचा-गरोदरपणामुळे तुमची त्वचा अतिसंवेदनशील झाली असल्याचे तुमच्या लक्षात आले असेलच.गर्भधारणेपुर्वी वापरलेल्या स्क्रबमुळे तुमच्या त्वचेवर आता दाह होऊ शकतो.किंवा तुम्ही वापरत असलेल्या Deodorant मुळे देखील तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.यासाठी जाणून घ्या त्वचा अचानक संवेदनशील होण्याची ही आहेत ५ कारणे
उपाय-गरोदरपणात नवीन सौदर्यप्रसाधनांचा प्रयोग करु नका.जितके शक्य असेल तितक्या नैसर्गिक गोष्टी वापरा.तसेच लक्षात ठेवा बदललेल्या हॉर्मोन्समुळे सुर्यप्रकाशात तुमच्या त्वचेवर लगेच सर्नबर्नची समस्या होऊ शकते.यासाठी दैनंदिन जीवनामध्ये चांगल्या सनस्क्रीन व मॉश्चरायझरचा नियमित वापर करा.यासाठी वाचा स्किनकेअर प्रॉडक्स सतत बदलणे योग्य आहे का?
५.हायपरपिगमेंटेशन-बदललेल्या हॉर्मोन्समुळे तात्पुरती मेलॅनीनची निर्मिती वाढते ज्यामुळे कधीकधी हायपरपिगमेंटेशन होण्याची शक्यता असते.यामुळे तुमच्या हात व मानेवर गदड चट्टे दिसू लागतात.Melasma या हायपरपिगमेंटेशनच्या प्रकारामध्ये त्वचेवर गडद चट्टे व टॅन दिसू लागते.यासाठी हा सनबर्नची समस्या हटवण्याचा घरगुती उपाय जरुर करा.
उपाय-हायपिगमेंटेशनवर काही करणे शक्य नसले तरी सुर्यप्रकाशामध्ये जाणे कमी केल्यामुळे चांगला बदल आढळू शकतो.तसेच जर काही कारणात्सव सुर्यप्रकाशामध्ये जाण्याची वेळ आल्यास चांगल्या प्रतीचे SPF असलेले सन प्रोटेक्शन वापरा.तसेच जाणून घ्या प्रसूतीनंतर दिसणारे स्ट्रेच मार्क्स लेझर उपचारांनी दूर करता येतात का?
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock