आपल्याकडे अनेक प्रकारे चटण्या बनवल्या जातात. इडली, डोसा, वडा आणि अगदी चपाती सोबत देखील चटणी आवडीने खाल्ली जाते. टोमॅटो चटणी- आपण पण बनवतो परंतु, ही तेलगू स्टाईलची चटणी काही ठराविक साहित्यात आणि काही कमी तेलात झकास बनते. जाणून घेऊया याची खास रेसिपी.
साहीत्य:
- टोमॅटो: २ (मध्यम आकाराचे)
- हिरव्या मिरच्या: २-३ (जर तुम्हाला तिखट खाण्याची सवय असेल तर तुम्ही त्यानुसार मिरच्यांचे प्रमाण वाढवू शकता.)
- लसूण: थोडं
- चिंच: थोडी या आरोग्यदायी फायद्यांसाठी जेवणानंतर नक्की खा चिंचेची गोळी !
- तेल: २ चमचे
- मीठ: चवीनुसार. नक्की वाचा: कोणते मीठ आणि किती प्रमाणात खाणे आरोग्यासाठी हितकारी ?
चटणी बनवण्याची पद्धत:
१. टोमॅटो धुवून पुसून घ्या आणि बारीक, उभे चिरा. हिरव्या मिरच्या बारीक चिरा म्हणजेच एका मिरचीचे ४ तुकडे करा.
२. पॅनमध्ये २ चमचे तेल घ्या आणि तेल तापल्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या घ्याला. त्याचा रंग बदल्यांनंतर त्या एका भांड्यात काढा. मग पॅनमध्ये टोमॅटो घाला आणि ७-१० मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवा. मधूनमधून ढवळत रहा. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. हळूहळू पॅनच्या बाजूने तेल सुटू लागेल. टोमॅटो रसमची हेल्दी टेस्टी रेसिपी
३. टोमॅटो काही प्रमाणात शिजल्यानंतर त्यात थोडी चिंच घाला किंवा चिंच पाण्यात भिजत घाला आणि इतर पदार्थांबरोबर वाटून घ्या. टोमॅटो खरचं वाढवते ‘किडनी स्टोन’ची समस्या ?
४. जिरं, आलं, लवंग, हिरव्या मिरच्या, चिंच आणि टोमॅटो यात चवीनुसार मीठ घाला आणि एकत्रितपणे ग्रँड करा. त्याची मऊसर पेस्ट बनवा. टोमॅटो – त्वचेचे आरोग्य सुधारणारे घरगुती टोनर
५. गरम भात किंवा पराठ्या सोबत तुम्ही टोमॅटो चटणी खाऊ शकता. तसंच सॅन्डविच आणि चपातीला लावून देखील तुम्ही खाऊ शकता. फ्रेंच फ्राईज किंवा नॅचोज सोबत देखील ही चटणी छान लागते. घरच्या घरी कसा बनवाल टॉमॅटो केचअप
नोट:
१. यात तुम्ही सुकं खोबरं देखील घालू शकता. त्यासाठी त्याचे बारीक काप करा. तव्यावर भाजा आणि चटणीत घाला. त्यामुळे चटणी अधिक काळ टिकेल व त्याची चव पण सुधारेल.
२. चटणी तिखट झाल्यास त्यात अजून थोडा टोमॅटो आणि खोबरं घाला.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock