जर तुम्हाला मातृत्वाचा अनुभव असेल तर तुम्हाला ठाऊकच असेल की बाळाला दात येण्याचा काळ बाळासाठी आणि तुमच्यासाठी देखील कठीण असतो. दुखणे, चिडचिड करणे. सतत रडणे या सगळ्यामुळे तुम्ही हैराण होता. टीथर्स आणि हिरड्यांना मसाज केल्याने बाळाला थोडे बरे वाटते. परंतु, जोपर्यंत दात नीट येत नाहीत तोपर्यंत बाळाचे चिडणे, रडणे चालूच असते. या व्यतिरिक्त या काळात मुलांमध्ये काही लक्षणे दिसून येतात. जाणून घेऊया त्या लक्षणांबद्दल.
१. भूक न लागणे: लहान मुलांना दात येताना भूक न लागणे हे अत्यंत सामान्य लक्षण आहे. हिरड्या दुखत असल्यामुळे काही खाणे मुलांना त्रासदायक ठरते. मग अगदी तुम्ही त्यांचा आवडता पदार्थ त्यांना दिला तरी ते खाण्यास नकार देतात. अशावेळी त्यांना हळूहळू भरवा. मुलांना खायला २० मिनिटे लागत असतील तर १०-१० मिनिटांचे दोन भाग करा. त्या वेळात मुलांना भरवा. त्यामुळे बाळाला खाण्यास मदत होईल, खाताना त्रास कमी होईल आणि पोट पण भरलेले राहील.
२. सतत झोप मोड होणे: सहा महिन्यांनंतर बाळाची झोप नियमित होईल, असे डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले असेलच. परंतु, रात्री झोपेतून अनेकदा उठून बाळ तुमची झोप मोड करत असेल. दात येताना हिरड्या दुखत असल्यामुळे लहान मुलं झोपेतून रडत उठतात आणि शांत झोप त्यांना मिळत नाही.
३. डायरिया: याचा दात येण्याची काही थेट संबंध नाही आणि सगळ्याच मुलांना या काळात डायरियाचा त्रास होतोच असे नाही. परंतु, इन्फेकशनमुळे तुमच्या बाळाला लूज मोशन्स होण्याची शक्यता असते. कारण दात येताना मुलं दिसेल ती वस्तू तोंडात टाकून चावतात. त्यामुळे इन्फेकशन होण्याची शक्यता असते व त्यातूनच पुढे लूज मोशन्सची बाधा होते. म्हणून घर, बाळाची खेळणी स्वच्छ ठेवा. सगळ्याच मुलांना हा त्रास होतो असे नाही, तरीही काळजी घेणे गरजेचे आहे.
४. ताप: ताप आणि डायरिया हे इन्फेकशनमुळे होणारे त्रास आहेत. काही वेळा इन्फेकशनमुळे ताप येण्याची शक्यता असते. पण हा ताप औषधांनी बरा होतो. हा त्रास देखील सगळ्याच मुलांना होतो असे नाही.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
५. चिडचिड करणे: सारखे डोळे चोळणे, केस ओढणे, विनाकारण ओरडणे, रडणे या सगळ्यावरून बाळ चिडचिडे झाल्याचे कळते. दात येताना बाळाला असा त्रास होतोच. दात येण्याचा हा काळ संपल्यानंतर मुलं शांत, नेहमीसारखं होतं.