गरोदरपणाचे नऊ महिने म्हणजे स्त्रीला स्वतःसोबतच बाळाची काळजी घेणंदेखील गरजेचे असते. या दिवसात फार दगदग करून चालणार नाही. असा सल्ला घरातील वडीलधारी मंडळी सतत देतात. पण नुसता आराम करणं तुम्हांला अजूनच कंटाळवाळं बनवतय का ? गरोदरपणाच्या काळातही तुम्ही सेक्सचा आनंद घेऊ शकता का ? याबाबतचा खास एक्सपर्ट सल्ला फोर्टीस हॉस्पिटल दिल्लीच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. बंदना गुप्ता दिला आहे. मग जाणून घ्या गरोदरपणाच्या काळात सेक्स करणं गर्भपाताचा धोका वाढवते का ?
डॉ. गुप्ता यांच्या सल्ल्यानुसार, गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये गर्भपाताची शक्यता सामान्यतः अधिक असते.पण या काळातही केवळ सेक्समुळे गर्भपात झाला अशी शक्यता नसते. हा केवळ तुमचा गैरसमज आहे.गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?त्यामुळे गरोदरपणातही सेक्सचा आनंद तुम्ही निश्चितच घेऊ शकता.मात्र सेक्श्युअल अॅक्टिव्हिटी दरम्यान रक्तस्त्राव होत असेल किंवा स्पॉटिंग होत असेल तर मात्र सेक्श्युअल अॅक्टिव्हिटी टाळा. कारण हे भविष्यात त्रासदायक ठरू शकते.मासिकपाळी की गर्भपात – नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ? गरोदरपणाच्या काळात स्पॉटींग होणं हे गंभीर असल्याने अशावेळेस तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच प्रिमॅच्युअर लेबरचा त्रास होत असल्यास सेक्स करणं टाळा. या 7 कारणांमुळे वाढते Preterm Labour ची शक्यता ! मात्र तुम्हांला कोणताही त्रास होत नसल्यास गरोदरपणात तुम्ही सहाजिकच सेक्सचा आनंद घेऊ शकता. यामुळे कोणत्याही टप्प्यावर गर्भपाताचा धोका कमी होईल.
अनेकांना गरोदरपणात सेक्स करताना पेनिट्रेशन (संभोग) करताना पेनिज म्हणजेच शिश्न गर्भाला इजा पोहचवेल असे तुम्हांला वाटत असले तरीही काळजीचे कारण कारण नाही. कारण गर्भ आणि योनिमार्गाच्या दरम्यान इतरही काही अवयव असतात. त्यामुळे गर्भ सहाजिकच सुरक्षित असते. गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यावर म्हणजेच शेवटच्या काळातही सेक्स करणे सुरक्षित आहे. गरोदरपणामध्ये सेक्सचा आनंद घेण्यासाठी ’5′ सोप्या पोजिशन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तसेच अचानक झालेल्या गर्भपातानंतर नेमके काय करावे ? याबाबतचा हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock