Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बीफ वरील बंदी या ’7′कारणांसाठी उत्तम निर्णय !

$
0
0

बीफ म्हणजेच गोमांस खाण्यावर बंदी घालावी का ? या मुद्द्यावर प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका आणि मतं आहेत. राजकारण, धर्म या गोष्टीला बाजूला ठेवून केवळ आरोग्याचा विचार केला तरीही बीफ खाणं हे आरोग्याला त्रासदायकच आहे.रेड मीट प्रकाराचे हे मांस खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या वाढण्याचा धोका अधिक आहे. म्हणूनच आहारतज्ञ आकांक्षा जालनी यांनी सुचवलेले हे मांस खाण्याचे दुष्परिणाम तुम्ही नक्की जाणून घ्या.आणि पहा  बीफ बॅन आरोग्याच्या दृष्टीने कसा फायदेशीर आहे.

#1 बीफ मध्ये सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक आहे. यामुळे बीफच्या नियमित सेवनाने हृद्यविकाराचा धोका बळावू शकतो.

#2 बीफच्या सेवनाने colorectal cancer चा धोका अधिक वाढतो.  असा अहवाल University of California ने उंदरांवर केलेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षातून समोर आला आहे.

#3 बीफ मध्ये carnitine असते. यामुळे रक्तवाहिन्या अधिक जाड होतात आणि atherosclerosis चा धोका बळावतो. यामुळे धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढण्याचा धोका अधिक वाढतो.

#4 बीफ़मधील घातक घटक आरोग्याच्या अनेक समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, गाऊट या आजारांचा धोका बळावतो.

#5 बीफ खाऊन वजन घटवण्याचे प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हांला खूप परिश्रम घेणं गरजेचे आहे. कारण बीफ उत्तमप्रकारे शिजण्यासाठी तेलाचा अतिवापर करावा लागतो.

#6 नेहा चंदना या आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार, आजकाल गाईंनादेखील हार्मोन्स आणि अ‍ॅन्टीबायोटिक्सची इंजेक्शन दिली जातात. यामुळे बीफ खाणार्‍यांमध्येही हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण होऊ शकतो. दुषित मांस खाल्ल्याने MAD COW disease चा धोका वाढतो परिणामी मेंदूच्या सेल्सचेदेखील नुकसान होते.

#7 बीफ खाल्ल्याने अल्झायमरचा धोकाही वाढतो. कारण बीफच्या सेवनाने मेंदूच्या पेशींमध्ये आयर्न अधिक वाढते.  असा सल्ला डॉ. नेहा यांनी दिला आहे.

  • कटाक्षाने बीफ खाणं कोणी टाळावे ?

अ‍क्षनाच्या सल्ल्यानुसार, हृद्यविकाराचा त्रास असणारे आणि गरोदर स्त्रियांनी कटाक्षाने बीफ खाणं टाळावे. याप्रमाणेच PCOS चा त्रास असणार्‍या स्त्रिया, मधूमेही, मेनोपॉजच्या टप्प्यावरील स्त्रिया यांनी बीफ टाळण्याचा सल्ला आहारतज्ञ नेहा चंदना यांनी दिला आहे. तुम्हांला बीफ खाण्याची इच्छा असेल तर त्याचे लहान तुकडे ग्रील करून खावेत. तेही महिन्यातून केवळ एकदा खावेत. बीफमधून व्हिटॅमिन बी 12, प्रोटीन, झिंक, आयर्न यांचा पुरवठा होतो. पण म्हणून बीफवर ताव मारणे त्रासदायक ठरू शकते.

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>