Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदरपणात सुरक्षित प्रवासासाठी या ’26′टीप्स लक्षात ठेवा !

$
0
0

गरोदरपणात काहीही काम करताना तुम्ही फार सावध असणे गरजेचे आहे.लक्षात ठेवा घसरणे,पडणे किंवा ड्रायव्हींग करताना अचानक ब्रेक लावणे यामुळे तुमचे गरोदरपण धोक्यात येऊ शकते.गर्भधारणेपूर्वी या गोष्टींची तुम्ही कधीच काळजी घेतली नसली तरी आता मात्र तुम्हाला याबाबत फार सावध रहाणे गरजेचे आहे.यासाठी आता तुम्ही घरी असा अथवा प्रवासात प्रत्येक पाऊल टाकताना दक्षता बाळगा.

प्रेगन्सीमध्ये कोणताही अपघात टाळण्यासाठी व तुमची व तुमच्या बाळाची योग्य काळजी घेण्यासाठी या टीप्स जरुर वाचा.

रस्त्यावरुन प्रवास करताना-

प्रेगन्सीमध्ये प्रवासादरम्यान सावध रहाणे व लांबच्या पल्ल्याचा प्रवास टाळणे गरजेचे असले तरी काही दक्षता कटाक्षाने पाळून तुम्ही रोडवरील प्रवास करु शकता.

१. कारमधून प्रवास करताना नेहमी पोटाखाली सीट बेल्ट जरुर लावा.अनेक महिला पोटावर दाब येऊन बाळाला त्रास होऊ नये यासाठी सीट बेस्ट लावण्यास घाबरतात.पण खरेतर कारमधून प्रवास करताना अपघातापासून सुरक्षित रहाण्याचा हा एक उत्तम मार्ग असतो.

२.तुमच्या रक्ताभिसरणावर परिणाम होऊ नये यासाठी सीट बेल्ट घट्ट बांधू नका.

३.सीट बेल्ट लावल्यावर पाठ टेकवून आरामात बसा व खांदे सरळ ठेवा.प्रवासादरम्यान कारमध्ये चुकीच्या स्थितीमध्ये बराच काळ बसून राहील्याने तुमच्या पाठीवर ताण येऊन रक्ताभिसरणावर देखील त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

४.गरोदरपणामध्ये दुचाकीवरुन प्रवास करणे टाळा.जर तसे करणे शक्य नसेल तर सुरक्षेसाठी हेल्मेट घाला,कमी वेगाने गाडी चालवा व कडेला पाय टाकून बसू नका.गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये ड्रायव्हींग करताना तोल सांभाळणे शक्य नसल्याने दुचाकी वाहन चालवणे टाळा.

५.जर तुम्हाला सतत रिक्षासारख्या तीन चाकी वाहनांमधून प्रवास करावा लागत असेल तर आपल्या भारतीय रस्त्यांची स्थिती पहाता तुमच्या पोटाला धक्का बसू नये यासाठी मधल्या सीट वर बसून प्रवास करा.

६.काहीही असले तरी दुचाकी अथवा तीन चाकी गाड्यांपेक्षा बस अथवा ट्रेनने प्रवास करणे हा नेहमीच योग्य पर्याय असू शकतो.बस व ट्रेन मधील गर्दी टाळण्यासाठी तुमच्या कामाच्या वेळा कमी गर्दीच्या वेळेप्रमाणे निवडणे फायदेशीर ठरु शकेल.

७.गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यात दगदग कमी करण्यासाठी प्रवास करणे टाळा.

८.नेहमीचा दगदगीचा बसुन प्रवास केल्यावर पायाचे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी काही वेळ चाला.गाडीतून खाली उतरताना सावकाश उतरा कारण घाई केल्याने तुम्हाला धक्का लागून त्रास होऊ शकतो.

विमान प्रवास करताना-

जर तुम्हाला सतत विमानाने प्रवास करण्याची सवय असेल तर पहिल्या व तिस-या तिमाहीमध्ये विमाने प्रवास करणे टाळा.यासाठी विमानातून प्रवास करताना या गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

९.नेहमी मध्यभागीची आसन व्यवस्था निवडा कारण तिथे पायांची हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा असते.

१०.पोटाला आराम मिळेल अशा रितीने सीट बेल्ट लावा.

११.डिहायड्रेशन टाळण्यासाठी प्रत्येक तासानंतर थोडेसे पाणी प्या.

१२.दर तासाने पायाचे घोटे क्लॉकवाइज व अॅन्टीक्लॉकवाइज गोलाकार फिरवा.

१३.अंगठयाची हालचाल करा.

१४.रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तुमची मान व खांदे गोलाकार फिरवा.

बाहेर फिरताना-

गरोदरपणी चालणे हा प्रवास करण्याचा सुरक्षित पर्याय असला तरी त्यामुळे पाय घसरुन अथवा पडून त्रास होण्याची शक्यता देखील अधिक असते.यासाठी घराबाहेर चालताना या गोष्टींची काळजी जरुर घ्या.

१५.व्यायामासाठी अथवा कुठेतरी जाण्यासाठी असे कशासाठी चालत असाल तरी धीम्या गतीने व फूटपाथवरुन चाला.

१६.चांगल्या दर्जाचे फूटवेअर वापरा व हिल्स घालणे टाळा.कारण पोट पुढे आल्यामुळे हिल्स घालून तोल सांभाळणे तुम्हाला कठीण जाऊ शकते.

१७.घसरुन पडणे टाळण्यासाठी लेदर सोल पेक्षा टेनिस सोल चे शूज वापरा.

१८.चालताना खांदे सरळ ठेवा ज्यामुळे पोट पुढे आलेले असले तरी शरीराचा संपूर्ण तोल सांभाळणे तुम्हाला सहज शक्य होईल.यामुळे तुम्ही घसरुन पडणार देखील नाही.

१९.पाय-यांवरुन चढता उतरताना रेलींग धरुन चढा अथवा उतरा जेणे करुन तुम्ही पडणार नाही.पाय-यांवरुन उड्या मारत चढू अथवा उतरु नका.

२०.रोड क्रॉस करताना लाल सिग्नल येण्याची वाट पहा.रोड वर गर्दी कमी असली तरी रस्त्यावरुन धावू नका.

बेड रेस्टचा सल्ला दिलेल्या महिलांसाठी खास टीप्स

 

घरामध्ये चालताना-

२१.घरामध्ये ओल्या फरशीवरुन अथवा चालणे टाळा.

२२.पोट पुढे आल्यामुळे कदाचित तुम्हाला जमिनीवरील गोष्टी दिसणार नाहीत ज्यामुळे तुम्ही पडू शकता.यासाठी घरी चालताना देखील हळूवार पणे चाला.

२३.दरवाजा अथवा कपाटाच्या बाजूला उभे रहाणे टाळा कारण जर ते अचानक उघडले तर तुमच्या पोटाला धक्का लागू शकतो.

२४.सोफ्यावर बसताना व उठताना सावकाश हालचाल करा नाहीतर तुमच्या पोटाला हिसका बसू शकतो.अचानक हिसका बसल्यास तुम्हाला चक्कर येऊ शकते ज्यामुळे तुम्ही पडून तुम्हाला त्रास होऊ शकतो.

२५.डायनिंग टेबल,किचन टेबल व ऑफिस डेस्कच्या कडांपासून दूर रहा.कारण या कडांचा तुमच्या पोटाला धक्का लागू शकतो.

२६.घरच्या अथवा बाहेरच्या लोकांचा धक्का नकळत तुमच्या पोटाला लागू शकतो यासाठी त्याबाबतीत काळजी घ्या.

तसेच गरोदर बायकांनी पाठीवर का झोपू नये हे देखील अवश्य वाचा.

तुम्हाला याबाबत काळजी करण्याची केव्हा गरज असू शकते-

जर तुमच्या पोटाला धक्का लागला तर तुमच्या डॉक्टरांना कळवा अथवा त्यानंतर लगेच चेकअप साठी जरुर जा.जर घसरल्यामुळे,पडल्यामुळे अथवा धक्का लागल्यामुळे खालील गोष्टी जाणवल्या तर तुमच्या डॉक्टरांना जरुर कळवा.

  • व्हर्जायल ब्लिडींग
  • पोटातून तीव्र कळा येणे
  • प्रसूती कळा येणे
  • धाप लागणे
  • गर्भाची हालचाल कमी होणे
  • योनीमार्गातून येणारा चिकट स्त्राव

यासाठी वाचा गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये कोणती काळजी घ्याल

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>