Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

तंबाखूच व्यसन फुफ्फुसांप्रमाणेच या ’10′अवयवांचे नुकसान करते !

$
0
0

तंबाखूचे सेवन केल्याने फुफ्फुसांवर दुष्परिणाम होतो हे सर्वांना माहित आहेच पण तुम्हाला हे माहित आहे का? तंबाखूची पाने जाळल्यामुळे त्यातून ४००० केमिकल्स निर्माण होतात.तंबाखूपासून निर्माण होणा-या धूराच्या मिश्रणात निकोटीन, Formaldehyde,बेन्झिन,कार्बन मोनोक्साइड,टार व Carcinogens चे घातक घटक असतात.या घटकांचा तुमच्या संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम होतो व त्याची सुरुवात फुफ्फुसांपासून होते.तंबाखू सेवनामुळे सर्दी किंवा COPD पासून ते अगदी न्युमोनिया ते कॅन्सर पर्यंत भयंकर व प्राणघातक विकार होऊ शकतात.अगदी क्वचित धूम्रपान करणा-या लोकांनाही यापासून तितकाच धोका असू शकतो.

जर तुम्हाला तंबाखू सेवनामुळे होणारे नुकसान केवळ फुफ्फुसांपर्यंतच मर्यादीत आहे असे वाटत असेल तर हा तुमचा एक फार मोठा गैरसमज आहे.कारण धूम्रपानामुळे तुमच्या श्वसनक्रियेतील अवयवांपासून शरीरातील इतर सर्व अवयवांपर्यत सर्वांनेच नुकसान होऊ शकते.

यासाठी जाणून घेऊयात सिगारेट ओढल्यामुळे अथवा तंबाखू सेवन केल्यामुळे तुमच्या या १० अवयवांवर काय परिणाम होतो.

१.त्वचा-धूम्रपानाचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम दीर्घकाळ टिकतात.धूम्रपान करणा-या महिलांमध्ये सोयरासिस सारखे ऑटोइम्यून त्वचा विकार आढळतात.तर टीनएज मध्ये धूम्रपान करणारे त्यांच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे शरीरावरील डागांना बळी पडतात.धूम्रपान व प्युबर्टल अॅक्ने यांचा सबंध वैद्यकीय पुराव्यांमध्ये आढळतो.तसेच तंबाखूच्या सेवनामुळे lupus सारखे त्वचाविकार होतात.जर तुम्हाला सुरकुत्या व लाफींग लाइची चिंता सतावत असेल तर सर्वात आधी धूम्रपान करणे सोडा.तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण धूम्रपानामुळे तुम्ही वयाआधीच वृद्ध दिसू शकता.तसेच यासाठी जाणून घ्या कसा ओळखाल त्वचेच्या कॅन्सरचा धोका !

२.फेलोपाइन ट्युब्स-धूम्रपानामुळे गर्भधारणा गर्भाशयात होण्याऐवजी फेलोपाइन झाल्यामुळे  Tubal Ectopic Pregnancy होण्याचा धोका वाढतो असे अनेक वैद्यकीय पुराव्यांमध्ये सिद्ध झाले आहे.पहिल्या तिमाहीमध्ये गर्भवती महिलांचा मृत्यु होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.Culprit या अतिप्रमाणात निर्माण होणा-या PROKR1 प्रोटीनमुळे फेलोपाइन ट्युबला झालेली गर्भधारणा गर्भाशयामध्ये पाठवणे कठीण जातेयासाठी जाणून घ्या गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?

३.गर्भाशय-निकोटीन महिलांमध्ये Oestrogen ची पातळी कमी करणे व मेल हॉर्मोन वाढवण्यासाठी जबाबदार असते.ज्यामुळे ओव्हूलेशन वेळेत होत नाही व मासिकपाळी अनियमित होते.एका अभ्यासानूसार गर्भधारणे दरम्यान तंबाखू सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्या व गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा यामध्ये अडथळा निर्माण होतो.

४.गर्भाशयाचे मुख-Human Papilloma Virus मुळे सर्व्हायकल कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.जे या व्हायरसचे संक्रमित असतात त्यांनी जाणिवपूर्वक धूम्रपानापासून दूर रहावे.संशोधनात असे आढळले आहे की या व्हायरसचे संक्रमण झालेल्या महिलांनी धूम्रपान केल्यास त्यांना Invasive cervical cancer धोका वाढतो.

५.पेनिस-जर पुरुषांना धूम्रपानामुळे त्यांच्या पेनिसवर दुष्परिणाम होतो हे समजले तर ते नक्कीच त्वरीत धू्म्रपान सोडण्याचा वितार करतील.संशोधमामध्ये असे  आढळले आहे की धूम्रपानाचा पुरुषांमध्ये इरेक्शनसाठी पेनिसमध्ये होणा-या रक्तपुरवठयामध्ये अडथळा निर्माण होतो.सहाजिकच याचा पुरुषांच्या सेक्सलाईफवर विपरित परिणाम होतो.

६.अंडकोष-२०११ मध्ये झालेल्या संशोधनानूसार धूम्रपानाचा पुरुषांच्या प्रजनन हॉर्मोन्सवर परिणाम होतो असे आढळले आहे.या संशोधनानूसार इन्डोक्राइन बिघाड होतो ज्यामुळे पुरुषांमध्ये वंधत्व निर्माण होते.तसेच यामुळे शुक्राणूंची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर कमी होते.

७.किडनी-धूम्रपान करणा-या लोकांना गंभीर किडनी विकार होऊ शकतात.कारण धूम्रपानामुळे मूत्रामध्ये अॅल्युमिनीयमचे प्रमाण वाढते ज्यामुळे किडनीला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्या अरुंद होतात व किडनीचे कार्य कमी होते.

८.डोळे-धूम्रपान केल्यामुळे त्यातील विषारी घटकांमुळे डोळ्यांवर ऑक्सिडेटिव्ह ताण येतो.एवढेच नाही तर धूम्रपानातील धूरामुळे धूम्रपान करणा-या लोकांच्या डोळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.तसेच संशोधकांना टाइप १ मधूमेह असणा-या लोकांमध्ये मोतिबिंदू व धूम्रपानाचा सबंध आढळून आला आहे.यासाठी जाणून घ्या कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?

९.अन्ननलिका-धूम्रपानामुळे जेवणानंतर छातीत जळजळ होऊ लागते.धूम्रपानामुळे अन्ननलिकेतीचा खालील भाग शिथील होतो ज्यामुळे तिथले स्नायू आकुंचन पावल्याने स्टमक अॅसिड प्रवेश करु शकत नाही.जेव्हा हे स्नायू सैल होतात तेव्हा अॅसिड वरच्या दिशेने ओढले जाते ज्यामुळे अन्ननलिकेचे नुकसान होते.यामुळे peptic ulcer diseases व gastric cancer होण्याचा धोका वाढतो.तसेच या ’10′ लक्षणांनी पोटाचा कॅन्सर वेळीच ओळखा !

१०.ह्रदय-धूम्रपानाचा तुमच्या कार्डिओ व्हॅस्क्युलर हेल्दवर परिणाम होतो.अल्प प्रमाणात म्हणजे अगदी ४ मिग्रॅ निकोटीन सेवनाने देखील कोरोनरी धमन्या आकुंचन पावतात व रक्त पुरवठा कमी होतो.

संदर्भ-

  1. Vander Martin, R. V., Cummings, S. R., Coates, T. J., Vickers Jr, R. R., Conway, T. L., Hervig, L. K., … & Manolio, T. A. (1992). US Environmental Protection Agency. Respiratory Health Effects of Passive Smoking: Lung Cancer and Other Disorders. Washington (DC): US Environmental Pro-tection Agency, Office of Research and Development, Office of Air and Radiation. EPA/600/5-90/006F, 1992. Public Health, 82(8), 1173.
  2. Behnam SM, Behnam SE, Koo JY. Smoking and psoriasis. Skinmed. 2005 May-Jun;4(3):174-6. Review. PubMed PMID: 15891254.
  1. Capitanio, B., Sinagra, J. L., Ottaviani, M., Bordignon, V., Amantea, A., & Picardo, M. (2009). Acne and smoking. Dermato-endocrinology, 1(3), 129-135.
  2. Minkin, S. J., Slan, S. N., Gilkeson, G. S., & Kamen, D. L. (2014). Smoking and secondhand smoke among patients with systemic lupus erythematosus and controls: associations with disease and disease damage. Arthritis research & therapy, 16(S1), 1-23.
  3. Morita A. Tobacco smoke causes premature skin aging. J Dermatol Sci. 2007 Dec;48(3):169-75. Epub 2007 Oct 24. Review. PubMed PMID: 17951030.
  1.  Horne AW, Brown JK, Nio-Kobayashi J, Abidin HB, Adin ZE, Boswell L, Burgess S, Lee KF, Duncan WC. The association between smoking and ectopic pregnancy: why nicotine is BAD for your fallopian tube. PLoS One. 2014 Feb 20;9(2):e89400. doi: 10.1371/journal.pone.0089400. eCollection 2014. PubMed PMID: 24586750; PubMed Central PMCID: PMC3930728
  2. Shaw, J. L., Oliver, E., Lee, K. F., Entrican, G., Jabbour, H. N., Critchley, H. O., & Horne, A. W. (2010). Cotinine exposure increases fallopian tube PROKR1 expression via nicotinic AChRα-7: a potential mechanism explaining the link between smoking and tubal ectopic pregnancy. The American journal of pathology177(5), 2509-2515.
  3. Jin, Z., & Roomans, G. M. (1997). Effects of nicotine on the uterine epithelium studied by X-ray microanalysis. Journal of submicroscopic cytology and pathology29(2), 179-186.
  4.  Xiao D, Huang X, Yang S, Zhang L. Direct effects of nicotine on contractility of the uterine artery in pregnancy. J Pharmacol Exp Ther. 2007 Jul;322(1):180-5. Epub 2007 Apr 2. PubMed PMID: 17403992.2.
  5. Castle, P. E., Wacholder, S., Lorincz, A. T., Scott, D. R., Sherman, M. E., Glass, A. G., … & Schiffman, M. (2002). A prospective study of high-grade cervical neoplasia risk among human papillomavirus-infected women. Journal of the National Cancer Institute, 94(18), 1406-1414.3.
  6. Xie, Y., Garban, H., Ng, C., Rajfer, J., & Gonzalez-Cadavid, N. F. (1997). Effect of long-term passive smoking on erectile function and penile nitric oxide synthase in the rat. The Journal of urology, 157(3), 1121-1126.4.
  7. Blanco-Muñoz, J., Lacasaña, M., & Aguilar-Garduño, C. (2012). Effect of current tobacco consumption on the male reproductive hormone profile. Science of the total environment, 426, 100-105.5.
  8. Jana, K., Samanta, P. K., & De, D. K. (2010). Nicotine diminishes testicular gametogenesis, steroidogenesis, and steroidogenic acute regulatory protein expression in adult albino rats: possible influence on pituitary gonadotropins and alteration of testicular antioxidant status. Toxicological Sciences, 116(2), 647-659.
  9. Jaimes, E. A., Tian, R. X., Joshi, M. S., & Raij, L. (2009). Nicotine augments glomerular injury in a rat model of acute nephritis. American journal of nephrology, 29(4), 319-326

Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock   

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>