उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांमध्ये रक्तवाहिन्यांमधून वाहणार्या रक्ताचा वेग सामान्य रक्तप्रवाहापेक्षा अधिक असतो. तुमचा रक्तदाब 120/80 – असल्यास तो सामान्य समजला जातो. 139/89 – हा रक्तदाब Pre-hypertension समजला जातो तर 140/90 – हा उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेंशनची समस्या म्हणून ओळखली जाते. हायपरटेंशनचे शरीरावर हे १० दुष्परिणाम होतात. हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
उच्च रक्तदाबाचा त्रास असणारे रक्तदान करू शकतात का ? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर फोर्टीस हॉस्पिटल्स, बॅंगलोरचे diabetologist and Consultant, Internal Medicine, चे DrAmbannaGowda यांचा हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, उच्च रक्तदाबाचा त्रास असणारे रुग्ण नक्कीच रक्तदान करू शकतात.मात्र रक्तदानाच्या वेळेस त्यांचा रक्तदाब नियंत्रणात असणं गरजेचे आहे.रक्तदानाच्या वेळेस रुग्णाचा रक्तदाब हा 180 /100 पेक्षा कमी असणं गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाचे रुग्ण नियमित औषध गोळ्या घेत असले तरीही हा रक्तदानाबाबतचा अडथळा नाही.पण त्याचा रुग्णाच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम नसल्यास तो रक्तदान करण्यास पात्र आहे. तसेच उच्च रक्तदाबासोबत co-morbid च्या समस्या उच्च रक्तदाबासोबत नसल्यास रुग्ण रक्तदान करू शकतो. तुमचा रक्तदाब अनियंत्रित असल्यास रक्तदान करू नका. उच्च रक्तदाबासंबंधीचे हे ’10′ गैरसमज आजच दूर करा
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी रक्तदान करण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
- तुम्ही पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे.
- संतुलित आणि पोषक आहार घेणं आवश्यक आहे.
- मुबलक पाणी प्या.
नक्की वाचा : रक्तदानाबाबत हे ’10′ गैरसमज आजच दूर करा !
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी रक्तदानानंतर कोणती काळजी घ्यावी ?
- मुबलक फ्युईड तुमच्या आहारात असणं आवश्यक आहे. हा नियम रक्तदानापूर्वी आणि नंतरही पाळणं गरजेचे आहे.
- मुबलक आयर्नयुक्त पदार्थआहार घ्यावेत. हायपरटेंशनचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील ही १० फळं आणि भाज्या
- फार कष्टाची कामं, थकवणारे व्यायाम करू नका
- तुम्हांला थकल्यासारखं वाटत असेल तर आरामदायी स्थितीमध्ये पडून रहा.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असले तरीही रक्तदानाच्या पात्रतेसाठी तुम्ही शारिरीकदृष्ट्यादेखिल सक्षम असणं गरजेचे आहे. 18 वर्षांहून अधिक वयातील कोणीही सुदृढ आणि निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. तसेच रक्तदात्याचे वजन किमान 110 पाऊंड म्हणजेच 50 किलो असणं गरजेचे आहे. तसेच एकदा रक्तदान केल्यानंतर सुमारे 56 दिवसांनंतर पुन्हा रक्तदान करण्यास ती व्यक्ती पात्र असते.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock