मी ५५ वर्षांची महिला असून मी कॅल्शियमच्या फ्लेवर्ड चावण्याच्या/चोखण्याच्या गोळ्या घेते. (५००mg/tablet) गेल्या काही वर्षांपासून मी या गोळ्या नियमित घेते. माझी हाडे ठिसूळ झाल्याने २०१२ मध्ये मला osteoporosis चे निदान झाले. तेव्हा मला कोणीतरी या गोळ्या घेण्याचे सुचवले. त्यानंतर सातत्याने माझे सांधे आणि पाठ दुखत असते. रोज मी कॅल्शियमच्या दोन गोळ्या घेते आणि तो डोस वाढवून ३-४ गोळ्या घ्याव्या असा विचार माझ्या मनात येतो. पण खरंच त्यामुळे माझी परिस्थिती सुधारेल? कृपया यावर सल्ला द्या.
या प्रश्नाचे उत्तर बंगलोरच्या फोर्टीज हॉस्पिटलचे चीफ डायटिशन शालिनी अरविंद यांनी दिले.
शरीरात कॅल्शियमचे अति प्रमाण देखील हानिकारक ठरते. दिवसाला १००० mg पेक्षा अधिक कॅल्शियम घेऊ नये. जर तुम्ही दिवसाला ५०० mg च्या दोन गोळ्या घेताय म्हणजे तुम्ही RDA च्या नुसार पुरेशा प्रमाणात कॅल्शियम घेताय. जर तुम्ही आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ, पालक घेत असाल तर त्यातूनही तुम्हाला पुरेसं कॅल्शियम मिळतं. तसंच हाडं एकदा सच्छिद्र (porous) झाल्यावर कोणतीही कॅल्शियमची गोळी ती कमी भरून काढू शकत नाही. म्हणून तुम्ही ओव्हरडोस घेण्यापेक्षा शरीरातील कॅल्शियमची पातळी योग्य राखण्याकडे अधिक लक्ष द्या. कॅल्शियम सप्लीमेंटची तुम्हाला खरंच गरज आहे का?
कॅल्शियमच्या अति प्रमाणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्यामुळे त्याचा ओव्हरडोस न घेण्याचा सल्ला दिला जातो. स्नायू दुखणे हा शरीरात कॅल्शियमचे प्रमाण अधिक झाल्याचे लक्षण आहे. तसंच त्यामुळे तोंड कोरडे पडणे, अशक्तपणा, थकवा यांना सामोरे जावे लागते.
काही लोकांना खूप काळ डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. बद्धकोष्ठता होण्यास देखील कॅल्शियम कारणीभूत ठरते. कॅल्शियमच्या ओव्हरडोसचा सगळ्यात गंभीर परिणाम म्हणजे किडनीस्टोन होणे. कारण काही लोक कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतल्यानंतर पुरेसं पाणी पित नाहीत. दुधातून नाही या ’5′ भाज्यांमधून मिळवा ‘कॅल्शियम’
कॅल्शियम सप्लिमेंट्स मर्यादीत स्वरूपात घ्या आणि दिवसभराची कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी आहारात पालक, बदाम, दूध, चीज, ब्रोकोली, भेंडी, काजू, इत्यादी कॅल्शियमचे स्त्रोत असलेल्या पदार्थांचा समावेश करा. खरंतर आपल्याला अन्नपदार्थातून पुरेसं कॅल्शियम मिळतं. त्यामुळे absorption problem असल्याखेरीज आपल्याला कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही. कॅल्शियमची कमतरता भरून काढेल हा खास ‘डाएट प्लॅन’ !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock