Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

तुम्हाला कार्ब्सची अधिक गरज असल्याचे संकेत देतात या ‘३’गोष्टी !

$
0
0

आजकाल सगळेच आपल्या फिटनेसच्या बाबतीत जागरूक झाले आहे. जिमला जाणे, योगासन करणे, संतुलित आहार घेणे याकडे अनेकजण जाणीवपूर्वक लक्ष देतात. पण काही महत्त्वाच्या गोष्टी खूप जणांना ठाऊक नसतात. उत्तम स्वास्थ्यासाठी शरीरात सगळ्या पोषकघटकांचे संतुलित प्रमाणात आवश्यक आहे. त्याच्या अति किंवा कमी प्रमाणामुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.  म्हणून जर तुम्हाला खालीलपैकी काही लक्षणे आढळल्यास तुम्हाला अधिक कार्ब्स घेण्याची गरज आहे, हे जाणा. असा सल्ला स्पोर्ट्स न्यूट्रीशियनिस्ट Akansha Chaddha यांनी दिला.

१. तुम्हाला सारखी सर्दी होत असल्यास: सर्दीचा त्रास होणे सामान्य आहे. परंतु, सारखी सर्दी होत असेल तर मात्र ते चिंतेचे कारण ठरू शकेल. आजारांवर मात करणाऱ्या अँटीबॉडीजच्या निर्मितीत कार्ब्स मोलाचे कार्य करतात. कमी प्रमाणात कार्ब्स घेतल्याने अँटीबॉडीजची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत नाही. जर तुम्ही दिवसाला १०० ग्रॅम पेक्षा कमी कार्ब्स घेत असाल तर तुम्ही सारखे आजारी पडता. रिफाईंड नसलेले कार्ब्स म्हणजेच रताळे यांसारख्या पदार्थांमुळे हेल्दी राहण्यास मदत होते. बटाटा अशाप्रकारे खाल्ल्यास नाही वाढणार तुमचं वजन !!

२. हलका व्यायामानंतर देखील दमल्यासारखे वाटते: व्यायामानंतर सगळेच दमतात किंवा थकतात. परंतु, हलक्या व्यायामानंतर देखील दुसऱ्या दिवशी जिमला जावेसे वाटत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि तुम्हाला अधिक ऊर्जेची गरज आहे. म्हणून ऊर्जा वाढवण्यासाठी जिमला जाण्यापूर्वी एक तास आधी एक केळ किंवा सफरचंद अवश्य खा.  जाणून घ्या: लोकल अॅपल्स की इंपोर्टेड अॅपल्स- कोणते अधिक आरोग्यदायी आहेत ?

३. जिमला गेल्यानंतर डोके दुखू लागणे: ऊर्जा मिळवण्यासाठी जेव्हा फॅट बर्न होतात तेव्हा शरीरात ketones या मॉलिक्युल्सची निर्मिती होते. परंतु, लघवी केल्यानंतर शरीरातून सोडियमसोबत ketones देखील शरीराबाहेर पडतात. त्यामुळे डिहायड्रेशन आणि डोकेदुखी होते. म्हणून पुरेशा प्रमाणात कार्ब्स घ्या आणि दिवसभरात भरपूर पाणी प्या. नक्की वाचा: मातीच्या माठातून पाणी पिण्याचे ‘७’ फायदे !

यापैकी कोणतेही लक्षण तुम्हाला जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता आहारात कार्ब्सचे प्रमाण वाढावा. तुम्हाला दिवसाला १५० ग्रॅम कार्ब्सची गरज असते. त्यामुळे जास्तीत जास्त कार्ब्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. जाणून घ्या, कोणते पीठ आहे अधिक पौष्टिक ??

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>