Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ताणतणाव उच्च रक्तरक्तदाबाचा त्रास वाढवतो का ?

$
0
0

मी ६० वर्षांचा असून माझे जीवनमान अॅक्टिव्ह आहे. परंतु, गेल्या २-३ महिन्यांपासून मी घरीच आहे आणि तणावात आहे. ताणतणावामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास वाढतो का?मग ताण ताणावापासून दूर कसे रहावे?  

मुंबईच्या अशियन हार्ट इन्स्टिटयूटचे Senior Cardiac Electro Physiologist, डॉ. संतोष कुमार डोरा यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले.

हे खरे आहे की तणावग्रस्त वातावरणात किंवा परिस्थितीत रक्तदाब तात्पुरता वाढतो. परंतु, उच्च रक्तदाब आणि ताण यांचा असलेला संबंध तितकासा स्पष्ट झालेला नाही. कारण उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यासाठी ताण कारणीभूत ठरतो. तर दुसरीकडे ताणाचा परिणाम उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांवर होतो आणि परिस्थिती अधिक बिघडते. ‘केशरा’ने ठेवा रक्तदाब आणि हृद्यविकार नियंत्रणात !

उदारणार्थ, जर तुम्ही स्ट्रेस असाल तर तुमचे ब्लड प्रेशर वाढते. ताणामध्ये काही वेळेस अधिक खाल्ले जाते त्यामुळे स्थूलता येण्याची शक्यता असते. तसंच व्यायाम करावासा वाटत नाही. धूम्रपान किंवा दारूचे व्यसन लागते. या सगळ्यामुळे भविष्यात उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो आणि परिस्थिती अधिक बिकट होते. या ’6′ लक्षणांमधून मिळतात ‘उच्च रक्तदाबा’चे संकेत !

  • तुम्ही ताणताणावात असताना नेमके काय होते?

तुम्ही जेव्हा स्ट्रेस असता तेव्हा शरीरातून स्ट्रेस हार्मोन cortisol ची निर्मिती होते. त्यामुळे शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होऊन रक्तदाब तात्पुरता वाढतो. परंतु, असे अनेक वेळा झाल्यास त्यामुळे रक्तदाबाचा धोका वाढतो. ताण तणाव सांभाळून डीप्रेशनवर मात करण्यासाठी खास टीप्स !

कालांतराने उच्च रक्तदाबामुळे हृदयाची गती वाढते. तसंच हृदयविकारांचा धोका वाढतो. इतकंच नाही तर जर तुमच्यात कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक असेल तर रक्तवाहिन्या देखील आकुंचित होतात. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात नसल्यास या ’5′ समस्यांंचा धोका वाढतो‍ !

  • ताण कसा टाळावा?

ताण हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. ताणावर मात करण्याचा उत्तम उपाय म्हणजे तुमचा छंद जोपासा. त्यामुळे तुमचे मन दुसरीकडे रमेल व तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या रिलॅक्स व्हाल. तुळशीचं पान चघळा आणि तणावमुक्त व्हा !

दुसरा परिणामकारक उपाय म्हणजे योगसाधना व ध्यान करणे. जर तुम्ही फिटनेस बद्दल जागरूक असाल तर व्यायाम केल्याने ताण नक्कीच दूर होईल. म्हणून  तुम्हाला शांतता देणाऱ्या, रिलॅक्स करणाऱ्या म्हणजेच वाचन, लेखन, नृत्य  किंवा स्विमिंग इतर कोणत्याही गोष्टीत तुमचे मन रमवा. ‘भुजंगासन’ करा आणि ताण-तणाव हटवा

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>