Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

धूम्रपानाच्या सवयीचे आरोग्यावर होतात हे ’10′गंभीर परिणाम !

$
0
0

धुम्रपान करणे हानिकारक आहे हे तुम्हाला माहितच असेल.पण धूम्रपान करणे शरीरासाठी का हानिकारक आहे हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली १० कारणे अवश्य वाचा.कारण धूम्रपानामुळे केवळ निरनिराळे आजार होतात असे नाही तर तुम्हाला मृत्यु देखील येऊ शकतो.तसेच धुम्रपानाची सवय सोडल्यानंतर पुढील 20 मिनिटंं ते वर्षभराच्या काळात शरीरात होतात हे बदल ! देखील जरुर वाचा.

जाणून घ्या धूम्रपान टाळण्याची १० कारणे -

१.धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो-

तुम्हा सर्वांना धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो हे नक्कीच माहित असेल तर पण तुम्हाला जर असे वाटत असेल की धूम्रपानामुळे केवळ फुफ्फुसांचा कर्करोग होतो तर हे पुर्ण सत्य नाही.कारण धूम्रपानामुळे नाक,तोंड,स्वरयंत्र,श्वासनलिका,अन्ननलिका,पोट,स्वादूपिंड,मूत्रपिंड,मूत्राशय,गर्भाशय,अस्थीमज्जा व रक्त या अवयवांचा कर्करोग होऊ शकतो.जर तुम्ही असे कसे घडू शकते याचा विचार करीत असाल ? तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सिगारेट ओढता तेव्हा सिगारेट पेटवल्यापासून ती ओढून धूर तोंडाबाहेर काढेपर्यत तुमच्या संपूर्ण शरीरावर या प्रक्रियेचा दुष्परिणाम होत असतो.सिगारेट मध्ये ४१००० केमिकल्स असतात त्यापैकी Carcinogenic चे प्रमाण अधिक असून त्यामुळे कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.धुरासह या केमिकलमुळे अनियंत्रित प्रमाणात शरीरातील पेशींमध्ये परिवर्तन होते ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.तसेच तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका ! देखील जरुर वाचा.

२.धूम्रपानामुळे अकाली वृद्धत्व व सुरकुत्या येतात-

आपण वृधत्वावर मात करण्यासाठी अनेक सौदर्यप्रसाधने वापरतो कधीकधी तर यासाठी काहीजण शस्त्रक्रिया देखील करुन घेतात.पण तुम्हाला हे माहित आहे का? धूम्रपान सोडल्यामुळे तुमची वृधत्वाची लक्षणे मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात.कारण धूम्रपानामुळे तुम्हाला फाइन लाइन्स,एज स्पॉट्स येतात,डोळे सूजतात व त्वचा कोरडी,निस्तेज व निर्जीव दिसू लागते.असे घडते कारण सिगारेटमधील केमिकल्समुळे तुमच्या त्वचेखालील Fine capillaries रक्तपुरवठ्या अभावी संकुचित व आकुंचित होतात.अपु-या रक्त व ऑक्सिजनच्या पुरवठयामुळे तुमची त्वचा कोरडी व निस्तेज होते.तसेच Elastin व Collagen या कनेक्टिव्ह फायबर्सचे नुकसान झाल्यामुळे चेह-यावर फाइन लाइन व सुरकुत्या येतात.

३.ह्रदय कमजोर झाल्यामुळे तुम्हाला हार्टअटॅक व स्ट्रोकचा धोका असू शकतो-

सीडीसी(सेंटर फॉर डिसीज कंट्रोल)नूसार धुम्रपान न करणा-या लोकांपेक्षा धूम्रपान करणा-या लोकांना Coronary artery disease होण्याचा दुप्पट ते चौपट धोका असतो.तसेच धूम्रपान करणा-या लोकांना फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका पंचविसपट अधिक असतो.कारण सिगारेटच्या धूरामध्ये असणारी केमिकल्स तुमच्या शरीरातील रक्ताची संपूर्ण रचनाच प्रभावित करतात.या केमिकल्समुळे तुमचे रक्त घट्ट होऊन त्याचा गुठळ्या होण्याची अधिक शक्यता असते.तसेच यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होऊन रक्तदाब वाढतो(त्यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो).त्यामुळे अशा रुग्णांना कार्डिओव्हॅस्क्युलर व ह्रदय विकार वाढण्याची शक्यता अधिक असते.

४.फुफ्फुसांचा स्टॅमिना व क्षमता कमी होते-

सिगारेटमध्ये अनेक केमिकल्स असतात जी सिगारेट ओढल्यामुळे तुमच्या फुफ्फुसे,श्वसनमार्ग व शरीरामध्ये राहतात.या केमिकल्सच्या अवशेषांमुळे तुमच्या फुफ्फुसांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊन श्वाच्छोश्वासाच्या समस्या व फुफ्फुसांच्या कार्यात बिघाड निर्माण होतो.त्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक अवयवांना रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.ज्यामुळे तुम्हाला थकवा येऊन धाप लागते.काही संशोधनात असे आढळले आहे की धूम्रपानामुळे COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease),Emphysema, Chronic bronchitis,न्युमोनिया,लंग इनफेक्शन,अस्थमा व टीबी(Tuberculosis) होऊ शकतो.तसेच यासाठी जाणून घ्या फुफ्फुसाच्या कॅन्सरची ’8′ लक्षणं

५.धूम्रपानामुळे लवकर वीर्य उत्सर्ग(Premature Ejaculation)होतो व लिबीडो कमी होतो-

वृद्ध पुरुषामध्ये आढळणारी वीर्य उत्सर्ग(Premature Ejaculation) ही समस्या धूम्रपान करणा-या तरुण पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.याचे प्रमुख कारण रक्तप्रवाहाचा अभाव,पेनिसमध्ये असलेली असंवेदनशीलता,ह्रदयविकार व स्टॅमिना कमी असणे ही असू शकतात.या सर्व बाबींमुळे अशा पुरुषांची प्रजनन व्यवस्था अकार्यक्षम होते व लवकर वीर्य उत्सर्ग होतो.University of Arizona मध्ये केलेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की धूम्रपानाचा पुरुषांच्या लैगिंक इच्छा,स्टॅमिना व संपूर्ण सेक्सलाईफवर थेट परिणाम होतो.तर University of Kentucky मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की धुम्रपान न करणा-या लोकांपेक्षा धूम्रपान करणा-या लोकांना वयाच्या २० ते ३० या वयातच सेक्स करण्याची इच्छा कमी प्रमाणात निर्माण होते.

यासाठी #सेक्स टीप 1 – उत्तम सेक्स लाईफसाठी धुम्रपान सोडा !जरुर वाचा.

६.धूम्रपानामुळे Erectile dysfunction ही समस्या निर्माण होते-

जर तुम्हाला उशीरापर्यंत इरेक्शन रोखणे कठीण जात असेल तर ही समस्या तुमच्या धूम्रपानामुळे निर्माण झालेली आहे.NHS द्वारा प्रकाशित करण्यात आलेल्या एका पेपरमध्ये धूम्रपान व Erectile dysfunction चा जवळचा सबंध आढळून आला आहे.धूम्रपानामध्ये असलेल्या केमिकल्समुळे पुरुषांच्या पेनिसमधील रक्तवाहिन्यांमध्ये बदल घडून अडथळे निर्माण होतात ज्यामुळे त्यांच्या या अवयवाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.तसेच निकोटीन मुळे पेनिसला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतो.त्यामुळे इरेक्शन रोखून धरणे कठीण जाते.

७.धूम्रपानामुळे हाडे ठिसूळ होतात- 

अनेक संशोधनामध्ये असे आढळले आहे की धुम्रपानामुळे हाडांमधील कॅलशियम कमी झाल्यामुळे हाडांची घनता कमी होते.हाडांची घनता कमी झाल्यामुळे Osteroporosis ही समस्या निर्माण होते.(धूम्रपानामुळे विशेषत: महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजनच्या प्रमाणावर प्रभाव पडतो) जबड्यामधील हाडांची घनता कमी झाल्यामुळे सांधेदुखी व दात कमी होण्याची समस्या होते.या समस्यांमुळे सतत फॅक्चर किंवा दुखापत होण्याची देखील शक्यता अधिक असते.

८.धूम्रपानामुळे दातांवर डाग पडतात-

सिगारेटमधील Tar या केमिकल घटकामुळे तुमच्या दातांवर पिवळा थर जमा होतो.हा थर ब्रश करुन कमी होत नसल्याने धूम्रपान करणा-या लोकांच्या दातांवर कायमस्वरुपी डाग पडतात.त्याचप्रमाणे या व्यसनामुळे तुमच्या तोंडातील चांगले बॅक्टेरिया मरुन जातात,लाळेचे प्रमाण वाढते व तुमच्या दातांवर टार्टर वाढू लागतात.यासाठी दात पिवळे होण्याची कारणं जाणा, भविष्यातील धोका टाळा.

९.धूम्रपानामुळे तोंडाला दुर्गंधी येते-

धूम्रपानामुळे केवळ तोंडाला धूम्रपानाचा वासच येत नाही तर सतत एक प्रकाराचा तीव्र दुर्गंध येऊ लागतो.धूम्रपानामुळे तोंडातील चांगले बॅक्टेरिया तर मारले जातातच पण त्याचसोबत अशा लोकांना पचनसमस्या,घशाचे इनफेक्शन,तोंडाच्या इतर समस्या निर्माण होतात.यासाठी तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे ९ घरगुती उपाय जरुर करा.

१०.धूम्रपानामुळे तुम्हाला अंधत्व येऊ शकते-

धूम्रपानामुळे फक्त तुमच्या फुफ्फुसांवरच नाही तर तुमच्या दृष्टीवर देखील परिणाम होतो.सीडीसी(सेंटर फॉर डिसीज कंट्रोल)नूसार धूम्रपानामुळे मोतिबिंदू,ऑप्टिक नर्व्हज चे नुकसान व पूर्ण अंधत्व येऊ शकते.

संदर्भ-

  • NHS - http://www.sct.nhs.uk/_documentbank/pd6039_SmokingErectileDysfunction1.pdf
  • CDC - http://www.cdc.gov/tobacco/data_statistics/fact_sheets/health_effects/effects_cig_smoking/
  • How stuff works – http://health.howstuffworks.com/skin-care/beauty/skin-and-lifestyle/smoking-affect-skin.htm

 

Read this in English
Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock   


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>