डरमॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने तुम्ही नियमित त्वचेच्या कर्करोगावर लक्ष ठेऊ शकता, मॅमोग्राफीने तुम्ही स्तनांच्या कर्करोगाचे वेळीच निदान करू शकता पण कितीजण थायरॉईडच्या कर्करोगाकडेही तितकेच लक्ष देतात ? मूळातच कर्करोग या आजाराच्या भीतीने अनेकजण डॉक्टरांपासून लांब राहतात पण वेळीच लक्ष न दिल्यास हा धोका अधिक बळावू शकतो म्हणूनच या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला Calcutta Oncology Clinicचे डॉ. कौशिक चॅटर्जी यांनी दिला आहे.
गिळताना त्रास होणं - अनेकदा घशातील खवखव किंवा सोअर थ्रोटमुळे पदार्थ खाल्ल्यानंतर तो गिळताना त्रास जाणवतो.पण थायरॉईड ग्रंथीमध्ये कॅन्सरची वाढ होत असताना देखील गिळताना त्रास जाणवू शकतो. अन्नपदार्थ खाताना,गिळताना होणारा त्रास काही आठवडे चालल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घशाच्या खवखवीवर घरगुती उपाय ! नक्कीच फायदेशीर ठरेल.
बोलताना किंवा खाताना त्रास होणं - थायरॉईच्या कर्करोगाची वाढ अति प्रमाणात झाली असल्यास श्वास घेण्यास किंवा बोलताना त्रास जाणवतो. त्यामुळे तुम्हांला अशाप्रकारचा त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय घेणं गरजेचे आहे.
घोगरा आवाज - थायरॉईडच्या वरच्या बाजूला स्वरयंत्र असते. त्यामुळे थायरॉईड ग्रंथीमध्ये झालेले बदल सहाजिकच तुमच्या स्वरयंत्रावरही परिणाम करतात. त्यामुळे आवाज घोगरा होतो. त्यामुळे तुमच्या आवाजात होणार्या बदलांकडे वेळीच लक्ष द्या. त्यामागील कारणं दुर्लक्षित करू नका.
गळ्याजवळ गाठ जाणवणं - गळ्याच्या समोरच्या बाजूला थायरॉईडच्या ग्रंथी असतात.त्यामुळे त्यामध्ये होणारे बदल पटकन दिसून येतात. कॅन्सरची वाढ होऊन ते लिम्फ नॉडपर्यंत पोहचल्यास गळ्याच्या उजव्या बाजूला तुम्हांला फुगवटा,गाठ जाणवेल. पुरूषांमधील थायरॉईडच्या समस्येबाबत ’4′ खास गोष्टी नक्की जाणून घ्या
उपचार -
थायरॉईड कॅन्सरचे उपचार तुमच्या लिम्फच्या आकारावर अवलंबून असते. एका सेंटीमीटरपेक्षा तुमचे लिम्फ लहान असेल तर काही औषधं आणि दर सहा महिन्यांनी अल्ट्रासाऊंड करण्याचा देतील. यामुळे लिम्फच्या बदलत्या आकारावर नियंत्रण ठेवता येते. ट्युमरचा आकार मोठा असेल तर ताबडतोब काढला जातो. यानंतर तुम्हांला आयुष्यभर थायरॉईड हार्मोन्सची मदत घ्यावी लागते. केमोथेरपीला प्रतिसाद न देणार्या कॅन्सरवर कसे केले जातात उपचार ? हेदेखील नक्की जाणून घ्या
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock