Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्री-डायबेटीसची लक्षणे,निदान,आहार व उपचार

$
0
0

प्री-डायबेटीस ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मधूमेह होण्यापूर्वी अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.या स्थितीमध्ये Impaired Glucose Tolerance, impaired fasting glycemia, gestational diabetes mellitus, polycystic ovarian disease व लठ्ठपणा या त्या समस्या निर्माण होतात.प्री-डायबेटीस ही स्थिती केवळ मधूमेह होण्याचेच संकेत देते असे नाही तर त्यामुळे ह्रदयविकार व स्ट्रोक देखील होऊ शकतो.पण दिलासा देणारी एक बाब म्हणजे ही स्थिती वेळीच नियंत्रणात आणता येऊ शकते.यासाठी जाणून घ्या घरातील मधूमेहींची काळजी कशी घ्याल?

मुंबईतील फोर्टीस एस.एल रहेजा हॉस्पिटलचे कन्सल्टंट आणि डायबेटीस स्पेशलीस्ट डॉ.अनील बोरस्कर यांच्यामते या स्थितीमधील काही संकेत ओळखून या स्थितीला नियंत्रणात नक्कीच आणता येऊ शकते.

यासाठी ही स्थिती सविस्तरपणे जाणून घेऊयात-

प्री-डायबेटीसची प्रमुख लक्षणे-

या स्थितीचे निदान करण्याचा कोणताही मार्ग नाही.दुर्देवाने केवळ रुग्नाच्या नियमित केलेल्या ब्लड टेस्टमधून या स्थितीचे निदान करता येते.ही एक अशी शांत स्थिती आहे जी केवळ रक्तचाचणीमधूनच निदान करता येते. तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ? हे देखील जरुर वाचा.

प्री-डायबेटीसचे प्रमुख निदान-

chemical diagnosis of diabetes च्या व्याख्येनूसार मधूमेहाचे निदान फास्टींग ब्लड ग्लूकोजचे प्रमाण १२६ mg% पेक्षा अधिक व जेवणानंतर ग्लूकोजचे प्रमाण २००mg% पेक्षा अधिक असेल तर केले जाते.पण आजकाल जर एखाद्या व्यक्तीचे फास्टींग ग्लूकोजचे प्रमाण १०० mg% पेक्षा अधिक आढळले तर त्याला जेवणानंतर ग्लूकोजची पातळी तपासण्याचा सल्ला देण्यात येतो.जर जेवणानंतर त्या व्यक्तीच्या ग्लूकोजची पातळी १४० mg% पेक्षा जास्त पण २०० mg% पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला Impaired Glucose Tolerance असल्याचे गृहीत धरुन मधूमेह होणार असल्याप्रमाणे उपचार केले जातात.प्री-डायबेटीज असलेल्या लोकांना मधूमेहींप्रमाणेच व्हॅस्क्युलर विकार होण्याची किंवा विकसित मधूमेह होण्याची शक्यता असते.Gestational diabetes गरोदरपणामध्ये निर्माण होतो व प्रसूतीनंतर बरा होतो.गर्भवती महिलांमध्ये रक्तातील साखरेची पातळी तपासण्याचे निकष फार काटेकोर असतात.गर्भवती महिलामध्ये फास्टींग ब्लड शूगर ही ९० mg% पेक्षा कमी व जेवणानंतरची ब्लड शूगर ही १२० mg% पेक्षा कमी असावी.या प्रमाणामध्ये थोडासा जरी फरक अाढळला तर त्या  गर्भवती स्त्रीला GDM (gestational diabetes mellitus) असल्याचे गृहीत धरण्यात येते.जे रुग्ण त्यांच्या आहार व वजनावर नियंत्रण ठेवत नाहीत त्यांना पुढे देखील मधूमेहाची समस्या विकसित होऊ शकते.PCOD ही आजकाल एक सामान्य समस्या असून ती insulin resistance मुळे निर्माण होणारा विकार म्हणून गृहीत धरण्यात येते व या स्थितीत भविष्यातील आरोग्य समस्या टाळण्यासाठी त्वरीत उपचार करणे गरजेचे असते.तसेच मधूमेहींनो ! Insulin घेण्यापूर्वी हा सल्ला नक्की जाणून घ्या

जीवनशैलीमध्ये योग्य बदल करुन प्री-डीयबेटीसवर कसे उपचार करावेत-

या स्थितीवर उपचार करण्यासाठी त्या स्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन जीवनशैलीमध्ये योग्य बदल करण्याची गरज आहे.यासाठी सतुंलित आहार,व्यायाम व कधीकधी आरोग्य स्थितीनूसार मेडीटेशन करण्याची आवश्यक्ता असते.तसेच यासाठी पोटाच्या भागातील लठ्ठपणावर लक्ष देण्याची गरज असून यासाठी कंबरेचा घेर महिलांमध्ये ८५cm पेक्षा कमी व पुरुषांमध्ये ९०cm पेक्षा कमी असावा.

मधूमेहींच्या आहारात हे प्रमुख घटक असावेत-

  • मधूमेहींचा आहार हा प्रमुख घटक आहे.यासाठी मधूमेहींनी लो-फॅट लॅक्टो व्हेजेटेरियन डाएट घ्यावा.तसेच ओमेगा ६ फॅट कमी करावे व ओमेगा ३ फॅट वाढवून,कॅलरिज कमी  प्रमाणात घेतल्यास पोटाच्या लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते.तसेच यासाठी मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !
  • आठवड्यातून पाच दिवस दररोज कमीतकमी ४५ मिनीटे हाय रेसिस्टंट एक्सरसाइज करणे गरजेचे आहे.
  • आहार संतुलित असावा व जंकफूड खाणे टाळावे.
  • दिवसभरात दोन तासांपेक्षा कमी वेळ टिव्ही पहावा.
  • दररोज कमीतकमी ६ तास पुरेशी झोप घ्यावी.
  • योगा व मेडीटेशन करावे.यासाठी जाणून घ्या योगासनांनी करा ‘मधुमेहा’वर मात !

 

Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock   


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles