Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पुरुषांमध्ये Estrogen ची पातळी का वाढते?

$
0
0

Estrogen हे हॉर्मोन स्टिरॉइड हॉर्मोन्सचा संच असून ते एक फिमेल हॉर्मोन म्हणून ओळखण्यात येते.पुरुषांमध्ये ब-याचदा बीएमआय काउंट अधिक असल्यास किंवा अतिवजन असल्यास हे हॉर्मोन आढळते.पुरुषांवर Testosterone या हॉर्मोन्सचा फार प्रभाव होत असतो.या हॉर्मोन्सच्या अनियमितपणाचा दुष्परिणाम त्यांच्या हाडांचे आरोग्य,मेंदू,कार्डिओ व्हॅस्क्युलर आणि सेक्शुअल कार्यावर होत असतो.तसेच जाणून घ्या टेस्टिकल्सचा आकार वाढण्याची ही आहेत ‘३’ कारणे !

नॉएडा मधील जयपी हॉस्पिटलच्या Urology & Renal Transplant Department चे सिनीयर कन्सल्टंट डॉ.अमीत कुमार देवरा यांच्याकडून जाणून घेऊयात पुरुषांमध्ये Estrogen  ची पातळी वाढण्याचे काय कारण अाहे.

पुरुषांमधील Estrogen या हॉर्मोन्सचे कार्य-

Testosterone (Androgen) हे एक प्रमुख मेल हॉर्मोन आहे.जे पुरुषांमधील सेक्शुअल फंक्शन व सेकेंडरी सेक्शुअल फिचर्स साठी महत्वाचे असते.पुरुषांमध्ये Androgen हे हॉर्मोन मोठ्या प्रमाणावर वृषणामध्ये तर किरकोळ प्रमाणात अॅडर्नल ग्रंथीमध्ये तयार होते.Androgen चा एक भाग काही फॅटी टिश्यूजमुळे Estrogen मध्ये रुपांतरीत होतो.पुरुषांमध्ये Estrogen हे प्रामुख्याने Estradiol या स्वरुपात जैविक दृष्या सक्रिय असते.या प्रकियेला Aromatization असे म्हणतात. Aromatization म्हणजे ज्यामध्ये Testosterone चे रुपांतरण estradiol मध्ये होते.वयोमानानूसार Gonads आणि Adrenals पासून Androgen चे उत्पादन कमी प्रमाणात होऊ लागते.असे असले तरी Testosterone चे Estradiol मध्ये होणारे Aromatization हे नियंत्रणात असते.पण प्रौढवयातील अनेक गोष्टींमुळे फॅटी टीश्यूजमध्ये होणारे या Aromatization मध्ये वाढ होते.त्यामुळे पुढे Testosterone ते estradiol या प्रमाणात असंतुलन निर्माण होते.थोडक्यात यामुळे estradiol चे अतिप्रमाण व Testosterone चे कमी प्रमाण होते.Aromatization क्रियेमधील या वाढीचे प्रमुख कारण शरीरात असणारी अतिरिक्त चरबी अथवा लठ्ठपणा हे असते. जाणून घ्या पुरुषांना देखील मोनोपॉजला सामोरे जावे लागते का?

पुरुषांमध्ये हाय Estrogen असण्याची काही लक्षणे-

मसल मास कमी होणे-

Testosterone चे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरात मसल मास कमी होतात.वाढते वय व अनेक मेटाबॉलिक डिसॉर्डर हे याचे प्रमुख कारण असतात.इथे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे फॅट टिश्यू मध्ये Aromatase असतात ज्याची Testosterone चे रुपांतरण estradiol मध्ये करण्यात मदत होत असते.

Gynecomastia अथवा पुरुषांच्या स्तनामध्ये वाढ होणे-

या समस्येला वैद्यकीय भाषेत Gynecomastia असे म्हणतात. Estrogen च्या वाढीमुळे पुरुषांच्या स्तनांच्या आकारात बदल होतो. Estrogen मुळे चरबी जमा झाल्याने पुरुषांचे स्तन मोठे होतात.पौगंडावस्थतील मुलांमध्ये ही स्थिती सामान्यत: आढळते.पण पुढे  देखील ही स्थिती तशीच असेल तर ते हाय Estrogen चे एक लक्षण असू शकते.

कार्डिओ व्हॅस्क्युलर समस्या वाढू लागणे-

काही संशोधने व अभ्यासावरुन असे सिद्ध झाले आहे की हाय Estrogen मुळे पुरुषांमध्ये हार्टअॅटेक व स्ट्रोकचा धोका वाढतो.

शरीरात झिंकचा अभाव असणे-

झिंक शरीरातील Aromatese ची पातळी नियंत्रित ठेवत असते.पण जर शरीरातील झिंकची पातळी नेहमीपेक्षा कमी झाली तर Aromatese ची पातळी देखील वाढू लागते व यामुळे पिट्यूटरी ग्रंथीच्या कार्यात अडथळा येतो. झिंकच्या योग्य प्रमाणाशिवाय पिट्यूटरी ग्रंथी Follicle आणि Luteiniz हे उत्तेजक हॉर्मोन्स निर्माण करु शकत नाही.ज्या हॉर्मोन्समुळे वृषणाला Testosterone हे हॉर्मोन निर्माण करणे सोपे होते. या ’3′ कारणांंसाठी पुरुषांनी अवश्य प्यावा डाळींबाचा रस

चुकीचा अभिप्राय-

जर पुरुषाच्या शरीरात अधिक प्रमाणात Estrogen निर्मिती झाली तर मेंदूला Testosterone कमी प्रमाणात निर्माण करण्याचा संदेश मिळून शरीरात चुकीची अभिप्राय प्रणाली निर्माण होते.

पुरुषांमध्ये हाय Estrogen असल्यास यावर काय उपाय कराल -

हेल्दी डाएट,नियमित व्यायाम व ताण-तणाव कमी असे जीवनशैलीत योग्य बदल करुन यावर उपचार करता येतात.रक्तामधील Testosterone ची पातळी कमी झाल्यास हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी करण्यात येते. हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीसाठी तुम्हाला औषधे,जेल अथवा इंजेक्शन देण्यात येतात.प्रोस्टेट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरु करण्यापूर्वी स्क्रिनींग करणे आवश्यक असते.

 Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock   

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>